एम.पी.एस.सी. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेत तसेच यू.पी.एस.सी. पूर्वपरीक्षेत भूगोलासंबंधित अभ्यासात खालील घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत-
दैनिक तापमान कक्षा- दिवसाच्या २४ तासांतील कमाल व किमान तापमानातील फरकास दैनिक तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना दैनिक तापमान कक्षाही वाढत जाते. सागर किनाऱ्यांपेक्षा खंडांतर्गत प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते, तसेच वाळवंटी प्रदेशात दैनिक तापमान कक्षा जास्त असते.
वार्षकि तापमान कक्षा – उन्हाळ्यातील कमाल तापमान व हिवाळ्यातील किमान तापमान यामधील तापमानाच्या फरकाला वार्षकि तापमान कक्षा असे म्हणतात. विषुववृत्ताजवळ वार्षकि तापमान कक्षेत फारसा फरक आढळत नाही. समुद्र किनाऱ्यापेक्षा खंडांतर्गत प्रदेशात वार्षकि तापमान कक्षा जास्त असते.
समताप रेषा- समान तापमान असणारी स्थळे नकाशात ज्या रेषेने जोडतात, तिला ‘समताप रेषा’ असे म्हणतात. या रेषा सर्वसाधारणपणे पूर्व-पश्चिम दिशेने जातात. या रेषा अक्षवृत्तास समांतर असतात.
भूपृष्ठावरील हवेच्या दाबाचे पट्टे
१) विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा (Equatorial Low  Pressure Belt) – विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस ५० उत्तर ते ५० दक्षिण अंशांच्या दरम्यान हा कमी दाबाचा पट्टा पसरलेला आहे. या अक्षवृत्तांच्या दरम्यान वर्षभर सूर्यकिरणे जवळजवळ लंबरूप पडतात. त्यामुळे तापमान जास्त असते व हवेचा दाब कमी असतो, कारण तापलेली हवा हलकी होऊन वर जात असते. या पट्टय़ात बराच काळ हवा ही शांत असल्याने तेथे वारे वाहत नाहीत, म्हणून त्याला विषुववृत्तीय शांत पट्टा (DOLDRUM) असे म्हणतात.
विषुववृत्तीय पट्टय़ात व्यापारी वारे एकत्र येऊन नंतर त्यांना ऊध्र्वगामी हालचाल प्राप्त होते. ज्या प्रदेशात हे वारे एकत्र येतात. त्यास आंतर उष्णकटिबंधीय केंद्रीभवन पट्टा (ITCZ) असे म्हणतात.
२) उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाचा पट्टा (Sub-tropical High  Pressure Belt) – दोन्ही गोलार्धात २५० ते ३५० अंश या अक्षवृत्तांच्या दरम्यान जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. जास्त दाबाच्या निर्मितीचे कारण म्हणजे पृथ्वीच्या गतिशील शक्तीमुळे आणि हवेच्या अधोगामी प्रवाहामुळे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो, विषुववृत्तापासून तापलेली हवा उंच जाते. तेथे ती थंड होते व खालून येणाऱ्या हवेच्या प्रवाहामुळे बाजूला फेकली जाते. नंतर ही हवा २५० ते ३०० अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली येते व तेथे जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो.
अश्व अक्षांश (Horse Latitude) – कर्कवृत्त व मकरवृत्ताच्या २५० ते ३५० उत्तर व दक्षिणदरम्यानच्या जास्त दाबाच्या पट्टय़ात हवा ही शांत असते, म्हणून या पट्टय़ाला अश्व अक्षांश असे म्हणतात.
३) उपध्रुवीय कमी दाबाचे पट्टे (Subpolar Low Pressure Belt) –  ५०० ते ६०० अक्षवृत्ताच्या दरम्यान दोन्ही गोलार्धात कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे तेथील हवा ऊध्र्व दिशेला लोटली जात असल्याने तेथे कमीचा पट्टा निर्माण होतो. दक्षिण गोलार्धात उत्तर गोलार्धाच्या मानाने पाणी जास्त असल्याने उत्तर गोलार्धापेक्षा दक्षिण गोलार्धात हा कमी वायुभाराचा प्रदेश अधिक स्थिर स्वरूपाचा असतो.
४) ध्रुवीय अधिक दाबाचा पट्टा (Polar High – Pressure Belt) – हे पट्टे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशात पसरलेले असतात. ध्रुवीय प्रदेशात तापमान कमी असल्याने तेथे अधिक दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे.
वारे
वारे प्रामुख्याने जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे स्थितिसमांतर दिशेने वाहतात. पृथ्वीवर जे वारे निर्माण होतात, त्यांचे पुढील चार प्रकारांत विभाजन करता येते.
१) ग्रहीय वारे/ नित्य वारे – पृथ्वीवरील नित्य वाहणारे व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे व ध्रुवीय वारे यांचा यात समावेश होतो.
२) नियमित काळात वाहणारे वारे – ठरावीक वेळी किंवा ठरावीक ऋतूमध्ये हे वारे वाहतात, म्हणून त्यांना नियमित काळात वाहणारे वारे असे म्हणतात. उदा. खारे वारे, मतलई, मोसमी वारे
३) अनियमित वारे – वातावरणाच्या अनुकूल परिस्थितीत हे वारे वाहू लागतात, म्हणून अशा वाऱ्यांना अनियमित वारे असे म्हणतात.
४) स्थानिक वारे – काही विशिष्ट प्रदेशांत तेथील स्थानिक परिस्थितीनुसार हे वारे वाहू लागतात. उदा. फॉन, चिनुक, मिस्ट्रल, बोरा इ.
ग्रहीय वारे – पृथ्वी या ग्रहाच्या प्रदेशात हे वारे नियमितपणे वाहतात, म्हणून यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. ग्रहीय वाऱ्यांचे वर्गीकरण पुढील प्रकारांत करतात-
अ) व्यापारी वारे  ब) प्रतिव्यापारी वारे  क) ध्रुवीय वारे
अ) व्यापारी वारे – उत्तर आणि दक्षिण गोलार्धातील उपउष्णकटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५० ते ३५० अक्षवृत्त) विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे ५० उत्तर ते ५० दक्षिण जे वारे वाहतात त्यांना ‘व्यापारी वारे’ असे म्हणतात.
पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे सरळ विषुववृत्ताकडे वाहत येत नाहीत. उत्तर गोलार्धात ते स्वत:च्या उजव्या बाजूस तर दक्षिण गोलार्धात ते स्वत:च्या डाव्या बाजूस वळल्याने त्यांची दिशा बदलते. ते सामान्यत: पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागतात. त्यामुळे त्यांना पूर्वीय वारे (Easterlies) असे म्हणतात. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून नर्ऋत्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयकडून वायव्येकडे वाहतात. हिवाळ्यात हे वारे अधिक नियमित व जोरदार असतात. उन्हाळ्यात इतरत्र निर्माण होणाऱ्या भारप्रदेशामुळे हे वारे थोडे कमकुवत होतात. व्यापारी वाऱ्यांचा वेग दर तासाला सुमारे १६ ते २४ किमी इतका असतो. व्यापारी वारे हे उष्ण प्रदेशाकडून वाहतात. त्यांच्यामध्ये बाष्पधारण शक्तीही वाढलेली असते, त्यामुळे खंडाच्या पूर्व भागात योग्य परिस्थिती निर्माण झाल्यास पाऊस पडतो. जसजसे हे वारे पश्चिमेकडे जातात तसतसा त्यांच्यापासून पाऊस पडत नाही.
प्रतिव्यापारी वारे/ पश्चिमी वारे – उपउष्ण कटिबंधीय अधिक दाबाच्या पट्टय़ाकडून (२५ ते ३५ अंशवृत्ताच्या दरम्यान) उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६०) अक्षवृत्त यादरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना प्रतिव्यापारी वारे असे म्हणतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या मूळ दिशेपासून विचलित होतात. त्यामुळे प्रतिव्यापारी वारे साधारणत: पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात, म्हणून त्यांना पश्चिमी वारे असेदेखील म्हणतात. उत्तर गोलार्धात हे वारे नर्ऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयकडे वाहतात. हे वारे उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे वाहत असल्याने वर्षभर खंडाच्या पश्चिम भागात पाऊस पडतो. या वाऱ्यांची गती व दिशा अगदीच अनिश्चित स्वरूपाची असते. कधी हे वारे मंद पद्धतीने वाहतात, तर कधी हे वारे भयानक वादळी स्वरूपात असतात. दक्षिण गोलार्धात जास्त जलभार असल्याने प्रतिव्यापारी वारे हे नियमित वाहतात.
दक्षिण गोलार्धात ४०० दक्षिण अक्षवृत्ताच्या पलीकडे भूप्रदेशाचा फारसा अडथळा नसलयाने हे वारे वेगाने वाहतात व ते विशिष्ट आवाजाची निर्मिती करतात म्हणून त्यांना गर्जणारे ४० असे म्हणतात, तर ५० अंश दक्षिणपलीकडे संपूर्ण सागरी प्रदेश असल्याने वाऱ्यांना कोणताही अडथळा राहत नाही. या भागात वाऱ्यांचा वेग वाढतो. ते उग्र स्वरूप धारण करतात, म्हणून त्यांना खवळलेले ५० वारे Furious fifty असे म्हणतात.
प्रतिव्यापारी वाऱ्यांमुळे पश्चिम कॅनडा, पश्चिम युरोप या देशांत वर्षभर नियमित पाऊस पडतो.
ध्रुवीय वारे – ध्रुवाजवळील जास्त दाबाच्या पट्टय़ाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्टय़ाकडे (५० ते ६० अक्ष वृत्त) यांकडे जे वारे वाहतात, त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. ध्रुवीय वारे हे साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, त्यांना Pollar Easterlies) असे म्हणतात.
आवर्त आणि प्रत्यावर्त
आवर्त – एखाद्या प्रदेशात केंद्रस्थानी अत्यंत कमी भार निर्माण झाल्यास व त्याभोवती सर्व दिशांनी वायुभार वाढल्यास सभोवताच्या भागातून वारे हे कमी दाबाच्या मध्यवर्ती केंद्राकडे चक्राकार गतीने वाहू लागतात, त्यांना ‘आवर्त वारे’ म्हणतात. उत्तर गोलार्धात आवर्त वारे घडय़ाळाच्या काटय़ाच्या विरुद्ध दिशेने वाहतात, तर दक्षिण गोलार्धात ते घडय़ाळाच्या काटय़ांच्या दिशेने वाहतात. आवर्तच्या केंद्रस्थानी असलेल्या कमी भाराच्या पट्टय़ाला चक्रीवादळाचा डोळा असे म्हणतात.
आवर्त ज्या ठिकाणी निर्माण होतात त्यावरून त्यांचे दोन प्रकार पडतात- अ) समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त
ब) उष्णकटिबंधीय आवर्त
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्त (Temperate Cyclones – या पट्टय़ात या आवर्ताची निर्मिती होते, म्हणजे ३५० ते ६५० यादरम्यान दोन्ही गोलार्धात या आवर्ताची निर्मिती होते. या आवर्ताना मध्यकटिबंधीय आवर्त (Mid Latitude Cyclones) किंवा उष्णकटिबंधीय अतिरिक्त आवर्त (Extra Tropical Cyclones) असे म्हणतात.
वैशिष्टय़- समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होणारी ही आवर्त जमिनीचा एखादा भाग अत्यंत तप्त झाल्यास तेथील हवेचा भार कमी होतो व या कमी भाराच्या केंद्राकडे वारे आकर्षलेि जाऊन समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते. समशीतोष्ण कटिबंधातील आवर्त हिवाळ्यात जास्त प्रमाणात निर्माण होतात.
े विस्ताराच्या बाबतीत हे आवर्त विशाल असतात. या आवर्ताचा विस्तार २००० किमी इतका असू शकतो.
े समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तात केंद्रभागाजवळील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांच्यात फारसा फरक नसतो. हा फरक १० ते २० मि.बा. इतका आढळतो. यातील समभार रेषा एकमेकांपासून दूर गेलेल्या असतात.
े या आवर्तातील केंद्राकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग तुलनेने कमी असतो. त्यामुळे यातून विध्वंस करणारी चक्रीवादळे निर्माण होत नाहीत. हवा एकसारखी वर ढकलली जात असलयाने ढगांची व आवर्तपर्जन्यांची निर्मिती मोठय़ा प्रमाणात होते.
े या आवर्ताच्या प्रवासाची दिशा ठरलेली असते. हे आवर्त पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करतात. प्रवासाचा वेग मात्र वेगवेगळ्या ऋतूंमध्ये बदललेला असतो.
े हे आवर्त साधारणत: लंबवर्तुळाकार असतात. या आवर्तात अग्रभागात (पूर्व भागात) पश्चिम भागापेक्षा अधिक पाऊस पडतो.
े या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येतात. तसेच हे आवर्त प्रामुख्याने प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात वाहतात.
समशीतोष्ण कटिबंधीय आवर्ताचा प्रदेश
० उत्तर अटलांटिक क्षेत्र – हा समशीतोष्ण आवर्ताचा मुख्य प्रदेश आहे. येथे ग्रीनलंडकडून येणाऱ्या शीत वायू राशी व दक्षिणेकडून येणाऱ्या उबदार वायू राशी एकमेकांशी भिडतात. हे आवर्त उत्तर अटलांटिकमधून पश्चिम युरोपकडे वाहतात.

० उत्तर पॅसिफिक क्षेत्र – अटलांटिकप्रमाणेच येथेही अ‍ॅल्युशियनकडून पूर्वेकडे वाहणारे व कॅनडा व संयुक्त संस्थानात शिरणारे आवर्त आढळतात.
० भूमध्य सागरी क्षेत्र – आल्प्सवरील शीत हवा आणि भूमध्य समुद्रामधील उबदार हवा यामुळे या भागात समशीतोष्ण आवर्ताची निर्मिती होते.
० चीन समुद्र – हिवाळ्यात या भागात आवर्ताची निर्मिती होते. यामुळे चीनचा मध्य भाग तसेच उत्तर भाग या ठिकाणी या आवर्ताचा प्रभाव जाणवतो.
उष्णकटिबंधीय आवर्त Tropical Cyclones)
विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे ६० ते ३०० अक्षवृत्ताच्या प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त आढळतात. समशीतोष्ण कटिबंधीय आवर्तापेक्षा उष्णकटिबंधीय आवर्ताचे स्वरूप भिन्न असते. त्यांचा विस्तार तुलनेने कमी असतो. मात्र त्यांचे स्वरूप प्रलयकारी असते. या आवर्ताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.
पश्चिम पॅसिफिकमध्ये टायफून (Typhoon), अटलांटिकमध्ये हरिकेन (Hurricane), पूर्व पॅसिफिकमध्ये बिग िवड (Big wind), फिलिपाइन्समध्ये बागुइओ (Baguio), ऑस्ट्रेलिया विली विलीस (Willy – Willies), भारतात या वादळांना चक्रीवादळे असे म्हणतात.
वैशिष्टय़े – उष्णकटिबंधीय आवर्त बहुधा ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये जास्त प्रमाणात निर्माण होतात.
० उष्णकटिबंधात निर्माण होणाऱ्या आवर्ताचा विस्तार तुलनेने कमी असतो. यांचा व्यास साधारणत: ८० ते ३२० किमी इतका असतो.
० केंद्रभागावरील हवेचा दाब व कडेच्या भागातील हवेचा दाब यांमध्ये खूप फरक असतो. या प्रकारच्या आवर्तातील समभार रेषा अगदी जवळजवळ असतात.
० चक्रीवादळांचा वाहण्याचा वेग अतिप्रचंड असतो. समुद्रावर या वादळांचा वेग जमिनीच्या मानाने जास्त असतो.
० हे आवर्त वर्तुळाकार असतात.
० या आवर्त प्रकारात तापमानात फारशी भिन्नता नसते. या आवर्तामध्ये पाऊस सर्वत्र पडतो.
० या आवर्ताच्या पाठोपाठ प्रत्यावर्त येत नाहीत.
० हे आवर्त प्रामुख्याने व्यापारी वाऱ्यांच्या क्षेत्रात म्हणजे हे आवर्त पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवास करतात.
उष्ण कटिबंधीय आवर्ताचे क्षेत्र
अटलांटिक समुद्रात (वेस्ट इंडिज) व संयुक्त संस्थानात फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर निर्माण होतात, ती हरिकेन या नावाने ओळखली जातात. जपान, चीन व फिलीपाइन्स बेटांच्या समूहांत पॅसिफिकमध्ये ही आवत्रे निर्माण होतात, त्यांना टायफून म्हणतात. िहदी महासागरात, ऑस्ट्रेलियाचा उत्तर किनारा, आफ्रिकेचा पूर्वकिनारा आणि भारताच्या पूर्व-पश्चिम किनाऱ्यावरही अशी आवर्ती वादळे निर्माण होतात.
प्रत्यावर्त
एखाद्या ठिकाणी जास्त भाराचा प्रदेश असेल तर त्याच्या केंद्रभागाकडून त्याच्या सर्व दिशेला वारे वाहू लागतात. या प्रकारच्या वायुभार वितरणास प्रत्यावर्त असे म्हणतात. प्रत्यावर्त हे प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात म्हणजे ३५० ते ६५० दरम्यान निर्माण होतात. समशीतोष्ण कटिबंधीय पट्टय़ात हिवाळ्यात भूभाग अत्यंत थंड होत असल्याने तेथे जास्त भाराचा प्रदेश निर्माण होतो व तेथील वारे बाहेर वाहू लागतात.
खारे वारे आणि मतलई वारे
खारे वारे – दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन लवकर तापते, त्या मानाने पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रालगतच्या जमिनीवर हवेचा दाब कमी असतो, तर समुद्रावर हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहतात. त्यांना खारे वारे म्हणतात.
मतलई वारे – रात्री समुद्राच्या मानाने जमीन लवकर थंड होते आणि समुद्रातील पाणी मात्र उबदार असते. त्यामुळे सागरावर कमी वायुभार व जमिनीवर जास्त वायुभार असतो. परिणामी, जमिनीकडून पाण्याकडे वारे वाहतात. या वाऱ्यांना मतलई वारे असे म्हणतात. हे वारे थंड आणि कोरडे असतात व त्यांचा वेगदेखील मंद असतो.                                             ल्ल
ॠ१स्र्ं३्र’2020@ॠें्र’.ूे

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
cop 29 climate change conference in baku capital of azerbaijan
विश्लेषण : ‘कॉप २९’ची एवढी चर्चा का?