म हाराष्ट्र हे खनिज साधनसंपत्तीसाठी फारसे प्रसिद्ध राज्य नाही, राज्याच्या एकूण क्षेत्रफळापकी फक्त १२.३३ टक्के क्षेत्रात खनिज संपत्ती आढळते. महाराष्ट्राची खनिज संपत्तीही प्रामुख्याने बेसॉल्ट खडकाच्या बाह्य़ क्षेत्रात स्फटिकयुक्त व रूपांतरित खडकात पाहायला मिळते. महाराष्ट्रात दगडी कोळसा मँगनिज, लोह खनिज, बॉक्साइट, इ. खनिजे आढळतात.
महाराष्ट्रातील खनिज संपत्तीचे मुख्य क्षेत्र पूर्व विदर्भ असून यात चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ इ. जिल्हे येतात. याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इ. ठिकाणीदेखील खनिजे आढळतात.

मँगनिज
भारतातील एकूण मँगनिज साठय़ापकी ४० टक्के साठा एकटय़ा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात मँगनिजचे प्रमुख साठे भंडारा, नागपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आढळतात.
०     भंडारा –  या जिल्ह्य़ात आढळणारे मँगनिजचे साठे हे गोंडाइट मालेच्या खडकाशी निगडित असून ते प्रामुख्याने तुमसर तालुक्यात आढळतात.
०     नागपुर – या जिल्ह्य़ात मँगनिज हे सावनेर तालुक्यात खापा या गावापासुन पूर्वेस रामटेक तालुक्यातून भंडारा जिल्ह्य़ातील भंडारा तालुक्यापर्यंत आढळतात. हा पट्टा पुढे मध्य प्रदेशात जातो. नागपूर जिल्ह्य़ात कांदी, मनसळ, रामडोंगरी, कोदेगाव, खापा या भागांत मँगनिजचे साठे आढळतात.
०    सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात मँगनिजचे साठे आढळतात. याशिवाय कणकवली तालुक्यातही मँगनिजचे साठे आढळतात.
लोहखनिज
भारतातील एकूण लोहखनिजांच्या साठय़ांपकी २० टक्के लोहखनिजाचे साठे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर व सिंधुदुर्ग या जिल्ह्य़ांत आढळतात.
 पूर्व विदर्भात जलजन्य खडकात लोहखनिज आढळतात. यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सुरजागड लोहखनिजाचे साठे चांगल्या प्रतीचे आहेत.
०     चंद्रपूर – चिमुर तालुक्यात िपपळगाव, भिसी, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात रत्नापूर व लोहारडोंगरी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत.
०     गडचिरोली – गडचिरोली व देऊळगाव परिसर हा लोहखनिजासाठी प्रसिद्ध आहे. येथे उच्च प्रतीची लोहखनिजे आढळतात.
०     गोंदिया – गोरेगाव तालुक्यात मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज आढळते. गोंदिया जिल्ह्य़ात अग्निजन्य खडकात लोहखनिज आढळते.
०     सिंधुदुर्ग – या जिल्हय़ात वेंगुर्ला तालुक्यात रेडी, आसोली येथे तर सावंतवाडी तालुक्यात काही ठिकाणी लोहखनिजाचे साठे आढळतात. रेडीनजीक टेकडय़ांत दोन किमी लांबीपर्यंत लोहखनिजाचे साठे आहेत.
०     कोल्हापुर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी व राधानगरी तालुक्यात लोहखनिजाचे साठे आढळतात.
बॉक्साइट
याचा उपयोग प्रामुख्याने अ‍ॅल्युमिनियम निर्मितीसाठी केला जातो. भारतातील सुमारे २१ % बॉक्साइटचे उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील बॉक्साइटचे साठे उच्च प्रतीचे आहेत, ते कोल्हापुर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, सातारा व सांगली या जिल्ह्य़ांत आढळतात.
०     कोल्हापूर – या जिल्ह्य़ात शाहुवाडी, राधानगरी व चंदनगड तालुक्यात बॉक्साइटचे साठे आढळतात. येथील बॉक्साइटचा उपयोग इंडियन अ‍ॅल्युमिनियम कंपनीच्या बेळगाव येथे अ‍ॅल्युमिनियम कारखान्यात धातू निर्मितीसाठी उपयोगात आणले जाते.
० रायगड – या जिल्ह्य़ात बॉक्साइटचे साठे प्रामुख्याने     मुरुड,   रोहा व श्रीवर्धन या तालुक्यांत केंद्रित आहेत.
० ठाणे – या जिल्ह्य़ात सालसेट बेट व तुगार टेकडय़ांच्या प्रदेशात बॉक्साइटचे साठे आहेत. येथील साठे कनिष्ठ प्रकारचे आहेत. या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त मुंबई उपनगर (बोरिवली, जोगेश्वरी, गोरेगाव), सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आंबोली घाटाच्या प्रदेशात तसेच रत्नागिरी जिल्ह्य़ात (दापोली व मंडणगड तालुक्यात) बॉक्साइटचे साठे आढळतात. बॉक्साइटचे साठे हे मुख्यत: जांभ्या खडकात आढळतात.
चुनखडी
बांधकामात जोडण्यासाठी लागणारा चुना हा चुनखडकापासुन तयार केला जातो. महाराष्ट्रात चुनखडीचे फक्त दोन टक्के साठे आहेत. महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्य़ात आढळतात.
०     यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्य़ात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आढळतात. याशिवाय धुळे, नंदुरबार, नांदेड, इ. ठिकाणीही चुनखडीचे साठे आढळतात. मात्र हे साठे कनिष्ठ दर्जाचे आहेत.
०     चंद्रपूर – या जिल्ह्य़ात बरोडा व नाजोरा तालुक्यात चुनखडीचे साठे आढळतात.
डोलोमाइट
याचा उपयोग प्रामुख्याने लोहपोलाद निर्मितीसाठी तसेच खत कारखान्यात केला जातो. डोलोमाइट व डोलोमाइटयुक्त चुनखडीचे साठे प्रामुख्याने यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्य़ांत आढळतात. याशिवाय रत्नागिरी व नागपूर जिल्ह्य़ांतही थोडे साठे आढळतात. भारतातील डोलोमाइटच्या एकूण साठय़ांपकी एक टक्का साठा महाराष्ट्रात आढळतो.
कायनाइट व सिलीमनाइट
हिऱ्यांना पलू पाडण्याच्या उद्योगात तसेच काचकाम रसायन उद्योग, सिंमेट उद्योग, इ. ठिकाणी कायनाइटचा उपयोग होतो. महाराष्ट्रात भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ात कायनाइटचे साठे आढळतात.
मीठ
महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत विशेषत: रायगड, ठाणे, मुंबईलगतच्या भागात मीठ तयार केले जाते. मिठाचा उपयोग खाण्याव्यतिरिक्त रासायनिक उद्योगातही केला जातो.
महाराष्ट्रातील ऊर्जा साधनसंपत्ती
 १. दगडी कोळसा – महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्य़ांत आढळतात. भूर्गभीय शास्त्राच्या दृष्टीने महाराष्ट्रातील दगडी कोळसा हा गोंडवनी संघाच्या व दामुदा मालेतील बाराकार समुदायातील खडकात आढळतो. भारताच्या दगडी कोळशाच्या एकूण साठय़ांपकी सुमारे चार टक्के कोळशाचा साठा महाराष्ट्रात आढळतो. महाराष्ट्रात दगडी कोळसा हा पुढील तीन क्षेत्रांत आढळून येतो-
 वैणगंगा खोरे, वर्धा खोरे, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्य़ाचा सीमावर्ती भाग.
जिल्हावार दगडी कोळशाचे वितरण – महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्य़ात बल्लारपूर तालुक्यात आढळतात.
चंद्रपूर – चंद्रपूर तालुक्यात चंद्रपूर व घुगुस, राजुरा तालुक्यात सास्ती, वरोडा, भदावती तालुक्यात मांजरी येथे दगडी कोळशाचे साठे आहेत.
यवतमाळ – या जिल्हय़ात वणी, राजुरा, मोरेगाव व उंबरखेड तालुक्यांत दगडी कोळशाच्या खाणी आहेत.
नागपूर – नागपूर जिल्ह्य़ात उमरेड, सावनेर व कामढी तालुक्यात दगडी कोळशाचे साठे आहेत. उमरेड तालुक्यातील दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे.
औष्णिक विद्युत केंद्र
महाराष्ट्रात प्रामुख्याने औष्णिक वीज निर्माण केली जाते, ही केंद्रे प्रामुख्याने कोळशाच्या खाणीजवळ किंवा रेल्वे मार्गाजवळ उभारली जातात. याचे कारण असे की, औष्णिक विद्युत निर्मितीसाठी वेळेवर कोळशाचा पुरवठा व्हावा.
०    कोकणातील औष्णिक विद्युत केंद्रे – चोला ( ठाणे ), मध्य रेल्वेचे कल्याणजवळ उल्हास नदीच्या खाडीजवळ औष्णिक केंद्र आहे. यापासून मुंबई, मुंबई उपनगर, कल्याण, पुणे, मुंबई – कल्याण, इगतपुरी याकरता विद्युत पुरवठा केला जातो. या केंद्रास झारखंडमधील कोळसा रेल्वे मार्गाने उपलब्ध होतो तर पाणी हे उल्हास नदीने मिळते.
तुभ्रे येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
०     पश्चिम महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र –
 एकलहरे (नाशिक) – नाशिकजवळील एकलहरा येथे औष्णिक विद्युत केंद्र आहे. याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी झाला आहे.
०     खान्देशमधील औष्णिक विद्युत केंद्र – फेकरी (भुसावळ) जळगाव जिल्ह्य़ातील भुसावळजवळ फेकरी येथे हे औष्णिक विद्युत केंद्र आहे.
०     मराठवाडय़ातील औष्णिक विद्युत केंद्र – परळी (बीड) मराठवाडय़ात बीड जिल्ह्य़ात परळी येथे हे औष्णिक केंद्र उभारले आहे.
०     विदर्भातील औष्णिक विद्युत केंद्र – विदर्भात पाच औष्णिक केंद्रे आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे औष्णिक विद्युत केंद्रास लागणारा कोळसा स्थानिक स्तरावर उपलब्ध होतो.
     पारस –  अकोला जिल्ह्य़ात पारस औष्णिक विद्युत केंद्र आहे.
     कोराडी – महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे औष्णिक विद्युत केंद्र नागपूरजवळ कोराडी येथे आहे.
खापरखेडा – नागपूरच्या वायव्येस खापरखेडा हे औष्णिक केंद्र आहे.
दुर्गापूर – चंद्रपूर जिल्ह्य़ात दुर्गापूर औष्णिक केंद्र आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्य़ात चंद्रपूरच्या दक्षिणेस बल्लारपूर येथेही औष्णिक विद्युत केंद्र आहे.
जलविद्युत केंद्रे
महाराष्ट्रात पुढील महत्त्वाची जलविद्युत केंद्रे आहेत-
०    कोयना जलविद्युत केंद्र – महाराष्ट्र औद्योगिकदृष्टय़ा अग्रणी राज्य आहे, या अग्रणी राज्यात या विकासात कोयना जलविद्युत केंद्राचा महत्त्वाचा वाटा आहे. कोयनेचा चौथा टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर जगातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्पात कोयनेचे स्थान अग्रेसर राहील. कृष्णा नदीची उपनदी कोयना असून तिचा उगम महाबळेश्वरमधून होतो. हेळवाकजवळील देशमुखवाडी येथे कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडवले आहे. या धरणामुळे विस्तृत जलाशय निर्माण झालेला असून हा जलाशय शिवसागर म्हणून ओळखला जातो.
०     लेक टॅिपगचा यशस्वी प्रयोग – कोयना जलाशयात लेक टॅिपगचा यशस्वी प्रयोग १३ मार्च १९९९ रोजी झाला. अत्याधुनिक तंत्रावर आधारित या प्रकारचा हा प्रयोग आशिया खंडात पहिल्यांदा यशस्वी झाला. अशाच प्रकारचा प्रयोग पुन्हा एप्रिल २०१२ मध्ये झाला.
०     महाराष्ट्रातील इतर जलविद्युत प्रकल्प – कोकणात रायगड जिल्ह्य़ात टाटा वीज मंडळाचे भिरा, खोपोली व भिवपुरी येथे जलविद्युत प्रकल्प आहेत.
०     जायकवाडी पठण जलविद्युत प्रकल्प – मराठवाडय़ात गोदावरी नदीवर पठणजवळ धरण बांधलेले आहे. त्या आधारे वीज निर्मिती करण्यात येते.
०     येलदरी जलविद्युत प्रकल्प – मराठवाडय़ात पूर्णा नदीवर परभणी जिल्ह्य़ात जिंतूर तालुक्यात येलदरी गावाजवळ हे धरण बांधले आहे. या प्रकल्पाच्या पायथ्याशी वीज केंद्र आहे. याचा फायदा मराठवाडय़ातील परभणी, जिंतूर, िहगोली, इ. भागांतील उद्योगधंद्यांना होतो.
खनिज तेल व नसíगक वायू
०     बॉम्बे हाय – मुंबईजवळ पश्चिमेला अरबी समुदात ३ फेब्रु. १९७४ रोजी ‘सागर सम्राट’ने पहिली विहीर खोदली. या तेल क्षेत्रालाच ‘बॉम्बे हाय’ म्हणतात. बॉम्बे हाय क्षेत्रात खनिज तेल व नसíगक वायू उपलब्ध होतात.
०     उरण औष्णिक विद्युत केंद्र – उरण बंदराजवळ नसíगक वायू साठवला जातो व तेथे हे औष्णिक केंद्र आहे.
०     अणु ऊर्जा – अणुऊर्जा निर्मितीसाठी युरेनियम, थोरियम, लिथियम व प्लॅटिनम यासारख्या औण्विक इंधनांचा वापर केला जातो. यापकी भारतात थोरियमचे साठे मोठय़ा प्रमाणात आढळतात.
०     १० ऑगस्ट १९४८ रोजी भारतीय अणुशक्ती मंडळाची स्थापना करण्यात आली, महाराष्ट्रात मुंबई (तुभ्रे) येथे तारापूर आण्विक केंद्र आहे.
 १. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर (ट्रॉम्बे) – मुंबईला तुभ्रे येथे ही संस्था असून या ठिकाणी खालील अणुभट्टय़ा आहेत.
 अप्सरा, सायरस , झरलिना, पूर्णिमा- १, पूर्णिमा- २, ध्रुव
२. तारापूर अणू केंद्र – ऑकटोबर १९६९ मध्ये अमेरिकेच्या मदतीने हे अणू केंद्र उभारले. या केंद्रामधून महाराष्ट्र व गुजरात या राज्यांना वीजपुरवठा केला जातो.
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने
०     ताडोबा राष्ट्रीय उद्यान – चंद्रपूर जिल्ह्य़ातील हे महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याचे एकूण क्षेत्र ११५.१४ चौ.किमी इतके आहे. ताडोबा अभयारण्यात वाघ, बिबळे, नीलगाय, सांबर, चितळ, चिंकारा, इ. वन्यप्राणी आढळतात. सर्व प्राण्यांमध्ये वानरे व माकडांची संख्या जास्त आहे.
०     नवेगाव राष्ट्रीय उद्यान (गोंदिया) – सातपुडा पर्वतरांगेत हे राष्ट्रीय उद्यान आहे. या अभयारण्यात नवेगाव बांध नावाचे एक विशाल सरोवर आहे, याचा सारा परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. हिवाळ्यात अनेक पाहुणे पक्षी या सरोवरात उतरतात. नवेगाव सरोवरात अनेक प्रकारचे लहान-मोठे मासे आढळतात.
०     पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, पेंच (नागपूर) – नागपूरपासून काही अंतरावर पवनी हे गाव आहे. त्यापासून २० किमी या अंतरावर पेंच हे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प आहे. पेंच नदीवर तोतला डोह या ठिकाणी विशाल धरण बांधले आहे. हिवाळ्यात तोतला डोह येथे अनेक स्थलांतरित पक्षी दिसतात.
०     संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (मुंबई उपनगर व ठाणे) –  मुंबईच्या उत्तरेस मुंबई उपनगरात ४० किमी अंतरावर बोरिवली येथे घनदाट राजीचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या उद्यानाचा काही भाग ठाणे जिल्ह्य़ात येतो. या उद्यानात सदाहरित, निमसदाहरित व खारफुटी अशी तीन प्रकारची वृक्षवने आहेत. वसईच्या खाडीला लागून या उद्यानाचे २५ किमी क्षेत्र हे खारफुटी जंगलाने व्यापलेले आहे. त्यात अनेक प्रकारच्या जलवनस्पती आहेत. यात कोळंबी, बांगडा या माशांचे प्रजोत्पादन होते.
०     गुगामल राष्ट्रीय उद्यान (अमरावती) – या राष्ट्रीय उद्यानात रानमांजर, रानउंदीर, हरणांची पिल्ले, तसेच सांबर, रानगवे, पक्ष्यांमध्ये बगळे, बुलबुल, निळकंठ, इ. दिसतात.
०     चांदोली राष्ट्रीय उद्यान (सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी) – वारणा नदीवर चांदोली येथे एक धरण बांधण्यात आले आहे, त्याला चांदोली धरण असे म्हणतात. सांगली जिल्ह्य़ातील बत्तीस शिराळा या ठिकाणी हे धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नसíगक जंगले आहेत. या ठिकाणी अनेक वन्यप्राणी आढळतात. नुकताच याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.
०     मालवण सागरी राष्ट्रीय उद्यान – सिंधुदुर्ग हे महाराष्ट्राचे पहिले सागरी उद्यान आहे. तर देशातील हे तिसरे सागरी राष्ट्रीय उदयान आहे, यात सर्जेकोट खाडीपासून मालवण बंदर, सिंधुदुर्ग किल्ला ते देवबागेपर्यंतच्या जल क्षेत्राचा समावेश होतो.                                                       

Maharashtra debt, Maharashtra elections,
महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबविल्या जातात, त्यामुळे राज्यावर ९ लाख कोटींचे कर्ज – जयंत पाटील
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Story About Manavat Murder Case
Manavat Murders : महाराष्ट्राला हादरवणारं मानवत हत्याकांड नेमकं होतं काय?
Union Minister Amit Shah set to visit Navi Mumbai
नवी मुंबईतील दौऱ्यात अमित शहांची ‘संघ’वारी
amit shah in kolhapur
महाराष्ट्रात यश मिळाल्यास देश जिंकल्याचा संदेश- अमित शहा
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
Maharashtra Rain Alert
Maharashtra Rain : कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधारेचा अंदाज; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत कसा पाऊस पडणार
Renew company Vijay wadettiwar
विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांबाबत स्पष्टीकरण, रिन्यू कंपनीची महाराष्ट्रातच गुंतवणूक