मुंबई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत एक वर्ष कालावधीचा मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कुठल्याही विद्याशाखेतून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. सतत बदलत्या माध्यमविश्वाशी गती राखणारा हा अभ्यासक्रम असून माध्यमक्षेत्राचा इतिहास शिकवताना त्यात झालेले बदल आणि होऊ घातलेल्या बदलांची सखोल माहिती या अभ्यासक्रमात दिली जाते. २०१४-२०१५च्या अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून रविवार, २० जुलै रोजी स. ११ ते १२ या वेळेत लेखी परीक्षा आणि नंतर तोंडी परीक्षा घेऊन २६ जुलैपासून या अभ्यासक्रमाला प्रारंभ होईल.
दररोज सायं. साडेसहा ते साडेआठ या वेळेत गरवारेत हे अभ्यासक्रम होतील.
दूरस्थ नोकरीधर विद्यार्थ्यांसाठी तसेच रायगड जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी दर शनिवार, रविवार ११ ते ६ या वेळेत
खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात या वर्गाची एक शाखा चालवली जाते. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी २६५३०२५९ या दूरध्वनी क्रमांकावर तसेच सीकेटीच्या ९३२४३७२९७० या क्रमांकावर संपर्क साधावा.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा