|| दत्तात्रय आंबुलकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, औरंगाबाद येथे खाली नमूद केलेल्या विविध अभ्यासक्रमांसाठी खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत.

  • डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स प्रॉडक्शन अ‍ॅण्ड मेंटेनन्स – उपलब्ध जागांची संख्या ६०.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी १० वीची शालान्त परीक्षा उत्तीर्ण करून ते औद्योगिक शिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत अथवा त्यांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
  • बीटेक इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड सिस्टिम्स इंजिनीअरिंगमधील पदवी अभ्यासक्रम- उपलब्ध जागांची संख्या ६०

आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्स वा संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

  • एमटेक इन इलेक्ट्रॉनिक्स डिझाइन टेक्नॉलॉजीचा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम- उपलब्ध जागांची संख्या- नियमित अभ्यासक्रमासाठी २५ तर अंशकालीन अभ्यासक्रमासाठी २४.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदारांनी इलेक्ट्रॉनिक्समधील बीई/बी.टेक पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी ‘गेट’ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
  • अर्जासह भरावयाचे शुल्क- अर्जदारांनी अर्जासह भरावयाचे प्रवेश शुल्क म्हणून ५०० रु. भरणे आवश्यक आहे.
  • अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ जून २०१८ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, औरंगाबादची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://nielit.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर प्रवेश अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै २०१८ आहे.
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National institute of electronics and information technology