नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी, कोलकाता येथे उपलब्ध असणाऱ्या होमिओपॅथीमधील साडेपाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या : या प्रवेश पात्रता परीक्षेद्वारा निवड करण्यात येणाऱ्या जागांची संख्या ९३ आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतिशास्त्र व इंग्रजी या विषयांसह व कमीत कमी ५०% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ४५%) उत्तीर्ण केलेली असावी.
वयोगट : अर्जदारांचे वय १७ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर १६ जून २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये मुंबई केंद्राचा समावेश असेल.
अर्जदारांची बारावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ५०० रु.चा डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथीच्या नावे असणारा व कोलकाता येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १२ ते १८ एप्रिल २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथीची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nih.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ होमिओपॅथी, ब्लॉक- जीई, सेक्टर-३, साल्ट लेक, कोलकाता- ७००१०६ या पत्त्यावर १२ मे २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा