जावे शोधांच्या गावा..
विविध विद्याशाखांमधील संशोधन संस्थांची सविस्तर ओळख करून देणारे
मासिक सदर..
गोवा हे पिकनिक डेस्टिनेशन म्हणून किती फॅन्टाब्युलस आहे, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. तिथले निसर्गसुंदर समुद्रकिनारे, सुखावणारी हिरवाई, लाटांची गाज, चवदार फिशप्लॅटर आपलं मन अगदी खूश करून टाकतात. पण गोव्याची आणखी एक ओळख म्हणजे गोव्यातील ‘दोना पावला’ येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी’ (ठकड) ही संशोधन संस्था.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (भारत) या स्वायत्त संस्थेच्या ३७ उपक्रमांपकी एक म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी.
या समुद्र विज्ञान संशोधन प्रयोगशाळेचे मुख्य कार्यालय गोव्याच्या किनारपट्टीवर आहे तर अन्य विभागीय कार्यालये कोची, मुंबई, विशाखापट्टणम येथे आहेत. या संस्थेची स्थापना एक जानेवारी १९६६ साली झाली. गेल्या ४५ वर्षांच्या काळात संस्थेच्या संशोधन कार्याचा आवाका आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे.
िहदी महासागराच्या उत्तरेकडील सागरतळाचा, मौसमी वाऱ्यांचा सखोल अभ्यास, तेथील पाण्याच्या रासायनिक गुणधर्माची पडताळणी आणि खाण्यायोग्य जलजीवांची पदास या प्रमुख उद्दिष्टांसाठी ‘एनआयओ’ची निर्मिती झाली.
वरील संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणावर उच्चशिक्षित संशोधक, कुशल तंत्रज्ञ आज संस्थेच्या मुख्य आणि अन्य शाखांत कार्यरत आहेत.
सागरतळातून खनिज तेलाचे शोधन, भूगर्भशास्त्र (ॠी’ॠ८), भूभौतिकीचा (ॠीस्र्ँ८२्रू२) अभ्यास, इंडियन टेक्टोनिक प्लेट्स आणि मौसमी हवामान, भारतीय उपखंडातील नद्या आणि त्यांचा समुद्री गाळावर होणारा परिणाम, समुद्राच्या पाण्यातील जैवविविधतेपासून औषध निर्मिती, मरीन इन्स्ट्रमेंटेशन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांचा समावेश आजवर संस्थेच्या संशोधनात झाला आहे.
 ‘एनआयओ’च्या संशोधक चमूने सेवा क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले, त्यातील एक म्हणजे वेगवेगळ्या बंदरांतून होणाऱ्या प्रवासी व मालवाहू जहाजांच्या वाहतुकीमुळे समद्रातील पर्यावरणावर आणि उपयुक्त जलचरांवरील होणारा प्रतिकूल परिणाम. या प्रश्नावरील ‘एनआयओ’च्या शास्त्रज्ञांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
 ‘एनआयओ’च्या ताफ्यात विविधांगी संशोधनासाठी उपयुक्त अशा सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, अद्ययावत उपकरणांनी युक्त समुद्र नौका, पाच हजार मीटर खोलीवर सागरतळाचा शोध घेणारी सागरी उपकरणे आणि अर्थात मोठय़ा संख्येने असणारे सागरी संशोधक (ूींल्ल २्रूील्ल३्र२३) समाविष्ट आहेत.
विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम (समर इंटर्नशिप प्रोग्राम)   
या उपक्रमांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, त्यांच्या विषयांशी संलग्न असणारे प्रकल्प या ठिकाणी करू शकतात. हा कार्यक्रम पूर्णपणे नि:शुल्क असून या कालावधीदरम्यान होणारा प्रयोगशाळेवरील खर्च ‘एनआयओ’कडून केला जातो. विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च मात्र ज्याचा त्यालाच करावा लागतो.
विद्यार्थ्यांना किंवा इच्छुक व्यक्तींना, पूर्वपरवानगीने, एखाद्या कामाच्या दिवशी ‘एनआयओ’ला भेट देण्याचीही संधी मिळू शकते. यातून सागरी संशोधनाची तोंडओळख, विज्ञान विषयातील माहितीपट पाहायला मिळतात. तुम्हाला रस असलेल्या विषयातील प्रयोगशाळाही दाखवल्या जातात.  यासाठी संपर्क पत्ता (मेल -:mahale@nio.org; cc to- sharon@nio.org, christin@nio.org)

विद्यार्थी कार्यशाळा – याव्यतिरिक्त फक्त गोव्यातील रहिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा भरवल्या जातात. तर इतर भागांतील मुलांसाठी शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.
या सर्व कार्यक्रमांसाठी तसेच उन्हाळी शिबिरासाठी प्रमुख, एच.आर.एम., वेबसाइट- ६६६.ल्ल्र.१ॠ, शैक्षणिक भेटीसाठी संपर्क- प्रमुख, पब्लिक रिलेशन, ई-मेल : ूींल्ल@ल्ल्र.१ॠ
‘एनआयओ’तील संशोधनाच्या आणि उच्च शिक्षणाच्या संधी-
संस्थेतील नानाविध उपक्रमांच्या पूर्ततेसाठी तात्पुरत्या नेमणुका केल्या जातात . उदा. उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, प्रकल्प सहायक, पोस्ट डॉक्टरल फेलोज. मुख्यत्वेकरून ‘प्रोजेक्ट असिस्टंट स्कीम’मधून तात्पुरत्या काळासाठी नेमलेल्या अननुभवी पदवीधारकांना वेगवेगळ्या समुद्री संशोधनाचा प्रत्यक्षदर्शी अनुभव घेता येतो व त्यांच्या मदतीने संस्थेची कार्यक्षमताही सुधारते. यातीलच इच्छुक पदवीधारक विद्यार्थ्यांना ‘सीनिअर रिसर्च फेलो स्कीम’अंतर्गत अत्युच्च शिक्षणासाठी (डॉक्टरेट ) संस्थेत संशोधन करण्याची संधी मिळू शकते.(Refer : http://www.nio.org) देशातील अनेक विद्यापीठांनी संस्थेतील ५० हून अधिक शास्त्रज्ञांना पीएच.डी. अभ्यासक्रमांसाठी मार्गदर्शक म्हणून नेमले आहे.
द स्कूल ऑफ ओशनोग्राफी अंडर द अ‍ॅकेडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च या संस्थेत सागरी संशोधनाशी संलग्न सागरी विज्ञान, गणित व इतर विषय येथे संशोधन (ढँ..ि) करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात.
या उपक्रमांतर्गत होणारे संशोधन बहुशाखीय, व्यापक स्वरूपाचे असते, समुद्रतळाशी होणाऱ्या नसíगक हालचाली, जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी अटमॉस्फीअर, जीओस्फीअर, बायोस्फीअर यांचे एकत्रित ज्ञान दोन सत्रांच्या अभ्यासक्रमातून दिले जाते.
‘ओशनोग्राफी’मधील शिक्षणाचे पर्याय
सागर विज्ञानात प्रामुख्याने खालील विषयांचा समावेश होतो –
१.    बायोलॉजिकल ओशनोग्राफी – समुद्रातील जैवविविधतेचा अभ्यास व त्याचा पर्यावरणावरील परिणाम. जलचर, पाणवनस्पती यांची पदास संबंधातील वेगवेगळ्या प्रक्रियांचा अभ्यास. यालाच ‘मरीन बायोलॉजी’ असेही म्हणतात.
२.    केमिकल ओशनोग्राफी – समुद्रातील पाण्याचे रासायनिक गुणधर्म आणि त्याचा पर्यावरणावरील परिणाम यालाच ‘मरीन केमिस्ट्री’ असेही नाव आहे.
३.    जीओलॉजिकल ओशनोग्राफी – सागर तळाचा विविधांगी अभ्यास.
४.    फिजिकल ओशोनोग्राफी – समुद्रातील पाण्याचे तापमान, पाण्याची क्षार पातळी, सागराच्या पृष्ठभागावरील आणि सागरातील लाटा, भरती, ओहोटी, पाण्याचे प्रवाह या घटकांचा अभ्यास म्हणजेच मरीन फिजिक्स.
देशातील विविध महाविद्यालयांमधून खालील विषय अभ्यासले जातात.
– प्रिन्सिपल्स ऑफ ओशोनोग्राफी
– मरीन इकॉलॉजी, झूऑग्राफी
– मरीन पोल्युशन
– मरीन पेलबायोलॉजी  
 रोजगाराच्या संधी
भारताच्या तिन्ही भौगोलिक सीमा समुद्राने वेढलेल्या आहेत. साहजिकच ओशनोग्राफी क्षेत्रात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या सहभाग असलेल्या इंडस्ट्रीजमध्ये नोकरीच्या, व्यापाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. तसेच जीओलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, मेटरोलॉजिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडिया, ओशनोग्राफी डिपार्टमेंट ऑफ इंडिया अशा सरकारी आस्थापनांमधून रोजगार संधी मिळू शकतात. खासगी क्षेत्रात मुख्यत्वे मरीन इंडस्ट्रीजमधून परदेशातही अशाच प्रकारच्या नोकऱ्या मिळू शकतात. उदा. मरीन पोलिसी एक्स्पर्ट, मरीन अँड ओशन इंजिनीअर, मरीन बायोलॉजिस्ट, मरीन आर्केऑलॉजिस्ट, मरीन एन्व्हायरन्मेन्टलिस्ट, फिजिकल ओशनोग्राफर्स, मरीन टेक्निशिअन, प्रोजेक्ट असिस्टंट.  
उद्योग क्षेत्रे
इंडस्ट्रिअल रिसर्च प्रयोगशाळा, नेव्ही, ऑइल अँड गॅस इंडस्ट्री, कन्सल्टन्सी, सेफ्टी ऑर्गनायझेशन्स, मरीन वर्कशॉप्स, एन्व्हायरन्मेन्टल प्रोटेक्शन इंडस्ट्रीज, मरीन इक्विपमेंट इंडस्ट्री, शििपग कंपनीज.
तेव्हा मित्र-मत्रिणींनो, पुढील आयुष्यात समुद्रातील भटकंतीचा भरपूर अनुभव घ्यायचा असेल तर ‘करिअर इन ओशनोग्राफी’ हा करिअरसाठी उत्तम पर्याय आहे. मुख्य म्हणजे पुढच्या वेळी गोव्यात गेल्यावर ‘एनआयओ’ला आवर्जून भेट द्या.  
ओशनोग्राफी क्षेत्रातील निरनिराळे प्रशिक्षणक्रम
१.    बी.एस्सी. इन मरीन सायन्स
    पात्रता – १० + २ केमिस्ट्री + मॅथ्स + फिजिक्स विषयांसह
    कालावधी – तीन वष्रे  
२.     एम.एस्सी. इन ओशनोग्राफी
    पात्रता – सायन्स विषयाच्या कोणत्याही शाखेतील पदवी
    कालावधी – दोन वष्रे   
३.     एम.एस्सी. मरीन बायोलॉजी  
    पात्रता – सायन्स विषयाच्या कोणत्याही शाखेतील पदवी
    कालावधी – दोन वष्रे    
४.     एम.टेक. इन ओशनोग्रफी
    पात्रता – एम.एस्सी. आणि काही वेळा ‘गेट’ परीक्षेचा स्कोअर  
५.     एम.फिल. मरीन बायोलॉजी
    पात्रता – एम.एस्सी. / समकक्ष विषयातील पदवी
६.     एम.फिल. केमिकल ओशनोग्राफी  
    पात्रता – एम.एस्सी. / समकक्ष विषयातील पदवी  
७.     पीएच.डी. ओशनोग्राफी
    पात्रता- नेट / गेट परीक्षेतील उत्तीर्णता
८.     एम.बी.ए. (लॉजिस्टिक्स अँड शििपग मेनेजमेंट )
ओशनोग्राफी विषयात करिअर करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबरच समुद्रातील भटकंतीची आवड, पर्यावरण, भूगोल या विषयांमधील रुची, धाडसी वृत्ती, चिकाटी, उत्तम प्रतिकारशक्ती, प्रसंगी एकटेपणाशी जुळवून घेण्याची तयारी अशा अंगभूत गुणांची, आणि थोडय़ाफार तांत्रिक कुशलतेची गरज असते.

Story img Loader