जावे शोधांच्या गावा..
विविध विद्याशाखांमधील संशोधन संस्थांची सविस्तर ओळख करून देणारे
मासिक सदर..
गोवा हे पिकनिक डेस्टिनेशन म्हणून किती फॅन्टाब्युलस आहे, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. तिथले निसर्गसुंदर समुद्रकिनारे, सुखावणारी हिरवाई, लाटांची गाज, चवदार फिशप्लॅटर आपलं मन अगदी खूश करून टाकतात. पण गोव्याची आणखी एक ओळख म्हणजे गोव्यातील ‘दोना पावला’ येथील ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी’ (ठकड) ही संशोधन संस्था.
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (भारत) या स्वायत्त संस्थेच्या ३७ उपक्रमांपकी एक म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी.
या समुद्र विज्ञान संशोधन प्रयोगशाळेचे मुख्य कार्यालय गोव्याच्या किनारपट्टीवर आहे तर अन्य विभागीय कार्यालये कोची, मुंबई, विशाखापट्टणम येथे आहेत. या
िहदी महासागराच्या उत्तरेकडील सागरतळाचा, मौसमी वाऱ्यांचा सखोल अभ्यास, तेथील पाण्याच्या रासायनिक गुणधर्माची पडताळणी आणि खाण्यायोग्य जलजीवांची पदास या प्रमुख उद्दिष्टांसाठी ‘एनआयओ’ची निर्मिती झाली.
वरील संशोधनासाठी मोठय़ा प्रमाणावर उच्चशिक्षित संशोधक, कुशल तंत्रज्ञ आज संस्थेच्या मुख्य आणि अन्य शाखांत कार्यरत आहेत.
सागरतळातून खनिज तेलाचे शोधन, भूगर्भशास्त्र (ॠी’ॠ८), भूभौतिकीचा (ॠीस्र्ँ८२्रू२) अभ्यास, इंडियन टेक्टोनिक प्लेट्स आणि मौसमी हवामान, भारतीय उपखंडातील नद्या आणि त्यांचा समुद्री गाळावर होणारा परिणाम, समुद्राच्या पाण्यातील जैवविविधतेपासून औषध निर्मिती, मरीन इन्स्ट्रमेंटेशन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांचा समावेश आजवर संस्थेच्या संशोधनात झाला आहे.
‘एनआयओ’च्या संशोधक चमूने सेवा क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले, त्यातील एक म्हणजे वेगवेगळ्या बंदरांतून होणाऱ्या प्रवासी व मालवाहू जहाजांच्या वाहतुकीमुळे समद्रातील पर्यावरणावर आणि उपयुक्त जलचरांवरील होणारा प्रतिकूल परिणाम. या प्रश्नावरील ‘एनआयओ’च्या शास्त्रज्ञांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
‘एनआयओ’च्या ताफ्यात विविधांगी संशोधनासाठी उपयुक्त अशा सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, अद्ययावत उपकरणांनी युक्त समुद्र नौका, पाच हजार मीटर खोलीवर सागरतळाचा शोध घेणारी सागरी उपकरणे आणि अर्थात मोठय़ा संख्येने असणारे सागरी संशोधक (ूींल्ल २्रूील्ल३्र२३) समाविष्ट आहेत.
विद्यार्थ्यांसाठी खास कार्यक्रम (समर इंटर्नशिप प्रोग्राम)
या उपक्रमांतर्गत पीएच.डी. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, त्यांच्या विषयांशी संलग्न असणारे प्रकल्प या ठिकाणी करू शकतात. हा कार्यक्रम पूर्णपणे नि:शुल्क असून या कालावधीदरम्यान होणारा प्रयोगशाळेवरील खर्च ‘एनआयओ’कडून केला जातो. विद्यार्थ्यांच्या जाण्या-येण्याचा, राहण्याचा खर्च मात्र ज्याचा त्यालाच करावा लागतो.
विद्यार्थ्यांना किंवा इच्छुक व्यक्तींना, पूर्वपरवानगीने, एखाद्या कामाच्या दिवशी ‘एनआयओ’ला भेट देण्याचीही संधी मिळू शकते. यातून सागरी संशोधनाची तोंडओळख, विज्ञान विषयातील माहितीपट पाहायला मिळतात. तुम्हाला रस असलेल्या विषयातील प्रयोगशाळाही दाखवल्या जातात. यासाठी संपर्क पत्ता (मेल -:mahale@nio.org; cc to- sharon@nio.org, christin@nio.org)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा