एसयू फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे निवडक पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत –
शिष्यवृत्तींची संख्या व तपशील :
एकूण उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या २० असून या शिष्यवृत्ती अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व वैद्यकशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी देण्यात येतील.
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
अर्जदारांनी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान वा वैद्यकशास्त्र यांसारख्या विषयातील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी याच विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.
निवड पद्धती :
अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थी- अर्जदारांची लेखी निवड परीक्षा घेण्यात येईल. ही निवड परीक्षा राष्ट्रीय स्तरावर देशांतर्गत निवडक शहरांमधील परीक्षा केंद्रावर संगणकीय पद्धतीने २५ जानेवारी २०१४ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व संगणकीय निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांची वरील शिष्यवृत्तीसाठी अंतिम निवड करण्यात येईल.
शिष्यवृत्तीची रक्कम व तपशील :
योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी त्यांचा संबंधित अभ्यासक्रम व शैक्षणिक आलेखानुसार २५ हजार ते ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क :
या शिष्यवृत्ती योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एसयू फाऊंडेशन ऑफ इंडिया’ अंतर्गत नेहान एज्युकेशन अँड स्कॉलरशिप ट्रस्टच्या ६६६.ल्ली२३.ल्ली३.्रल्ल या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख :
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१३.
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान वा वैद्यकशास्त्र विषयातील पदवीधर विद्यार्थ्यांना त्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल.
राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक शिष्यवृत्ती परीक्षा
एसयू फाऊंडेशन ऑफ इंडियातर्फे निवडक पदवीधर विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी देण्यात येणाऱ्या शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी
आणखी वाचा
First published on: 28-10-2013 at 07:37 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National level academic scholarship exam