नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट-फरिदाबाद येथे उपलब्ध असणाऱ्या एमबीए-पॉवर मॅनेजमेंट या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१४-१६या सत्रात प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा कमीत कमी ६०% गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ५५%) उत्तीर्ण केलेली असावी व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. याशिवाय त्यांनी ‘कॉमन एन्ट्रन्स टेस्ट’ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
प्रवेश पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व ‘सीएटी’मधील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची या अभ्यासक्रमासाठी अंतिम निवड करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या उमेदवारांनी १००रु.चा (राखीव गटातील विद्यार्थ्यांनी ५०० रु.चा) नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूटच्या नावे असणारा व फरिदाबाद येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट विनंती-अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमून्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज प्रिन्सिपल डायरेक्टर (मॅनेजमेंट स्टडीज), नॅशनल पॉवर ट्रेनिंग इन्स्टिटय़ूट, एनपीटीआय कॉम्प्लेक्स, सेक्टर-३३ फरिदाबाद-१२१००३ या पत्त्यावर १५ मार्च २०१४ पर्यंत पोहोचतील, अशी बेताने पाठवावेत.

Story img Loader