संरक्षण सेवेमध्ये महाराष्ट्रातील युवकांना अधिकारी स्तरावर वाव मिळावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था-औरंगाबाद येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनपर तयारी अभ्यासक्रमासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी-उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक पात्रता :
* अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असायला हवेत.
* त्यांचा जन्म १ जानेवारी १९९८ ते ३१ डिसेंबर १९९९च्या दरम्यान झालेला असावा.
* अर्जदार विद्यार्थी सध्या दहावीच्या परीक्षेला बसणारे असावेत व त्यांनी सातवी, आठवी आणि नववीच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत.
* ते शारीरिकदृष्टय़ा पात्र असायला हवेत.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलविण्यात येईल. ही निवड परीक्षा एप्रिल २०१४ मध्ये नागपूर, पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
अर्जदार विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी निवड परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांना मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना या विशेष मार्गदर्शनपर अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
प्रवेश अर्ज व माहितीपुस्तिका : अर्जदारांनी प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिकेसाठी ४३५ रु. रोखीने व चलनद्वारा बँक ऑफ महाराष्ट्राच्या कुठल्याही शाखेत भरावेत व चलनाची प्रत विनंती-अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावी.
अधिक माहिती व तपशील : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबादच्या दूरध्वनी क्र. ०२४०-२३८१३७० वर संपर्क साधावा अथवा संस्थेच्या ६६६.www.spiaurangabad.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख :
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज संचालक, सैनिकी सेवा-पूर्व शिक्षण संस्था, सेक्टर एन-१२, सिडको,
औरंगाबाद- ४३१००१ या पत्त्यावर १५ फेब्रुवारी २०१४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
राज्यातील शालान्त परीक्षा देणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण अकादमीत दाखल होऊन सैनिकी करिअर करायचे असेल अशांनी या विशेष मार्गदर्शनपर अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.          

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा