केंद्रीय लोकसेवा आयोगाने अभ्यासक्रमात व परिक्षेच्या संरचनेत केलेल्या निर्णायक बदलांमुळे अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे. तथापि यातून उद्भवलेल्या वादंगात गुंतण्यापेक्षा या नवीन परीक्षेच्या स्वरूपाचा नेमका वेध घेणे व तिला सामोरे जाण्यासाठी लागणारा दृष्टीकोन विकसित करणे अधिक श्रेयस्कर ठरेल.  
केंद्रीय लोकसेवा आयोगाने अलीकडेच अभ्यासक्रमात केलेल्या निर्णायक बदलांमुळे गोंधळून न जाता त्यामागील आयोगाच्या अपेक्षा समजून घेणे रास्त ठरेल. या बदलांचा सकारात्मक दृष्टीने वेध घेतल्यास या अपेक्षा समजून घेणे शक्य होते. तद्वतच अभिप्रेत असलेली तयारी करता येते व दृष्टिकोनसुद्धा विकसित करता येतो.
कदाचित आयोगाच्या अपेक्षा खालीलप्रमाणे असाव्यात, असे वाटते.
१. उमेदवाराची जलद आकलन क्षमता.
२. कमी वेळेत साकल्याने विचार करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता.
३. कमी वेळेत आपला विचार नेमकेपणाने मांडण्याची क्षमता.
प्रशासनाचे वाढणारे, वरचे वर गुंतागुंतीचे व आव्हानात्मक होणारे कामकाज लक्षात घेता या क्षमतांचा कस लागतो, यात शंका नाही. अशा व्यक्तिमत्त्वांचा शोध या निवड प्रक्रियेद्वारे आयोगाने केला आहे की काय असे वाटते. वैकल्पिक  (Optional) विषयाव्यतिरिक्त निबंध, सामान्य ज्ञानाचे चार पेपर निर्णायक ठरतात. या सर्वच विषयांना लागू होणारे काही ठळक मुद्दे विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. वरील अपेक्षांचा विचार करता सुसंगत मुद्दे खालीलप्रमाणे असावेत-
१. अभ्यास ज्ञानाधिष्ठित/ज्ञानाभिमुख असावा (निव्वळ परीक्षाभिमुख नव्हे).
२. मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग आपली विचारांची क्षमता व कक्षा रुंदावण्यासाठी जाणीवपूर्वक करावा.
३. ज्ञान व विचार यांचे उपयोजन करण्याची क्षमता वृिद्धगत करावी.
वरीलपकी एकेक मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करू. सांप्रतची शिक्षण व्यवस्था परीक्षेला केंद्रस्थानी ठेवून विकसित झाली. तिचा उद्देश हाच आहे, असे म्हणणे मात्र धाडसाचे ठरेल. एकूणच परीक्षेसाठी व परीक्षेपुरता अभ्यास हा दृष्टिकोन आयोगाच्या निवड प्रक्रियेमध्ये धोकादायक ठरू शकतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या मुख्य परीक्षेमधील प्रश्नांचे स्वरूप. त्यातून प्रामुख्याने ‘ज्ञानाचे उपयोजन’ करणाऱ्या उत्तरांची अपेक्षा स्पष्ट दिसून येते.
परंतु ज्ञानाचे उपयोजन ही शेवटची पायरी ठरते. तत्पूर्वी ज्ञानाधिष्ठित अभ्यास अपरिहार्य ठरतो. सर्वप्रथम ज्ञानाधिष्ठित अभ्यास याचा नेमका अर्थ समजून घेणे महत्त्वाचे. कोणत्याही विषयाचा अभ्यास ‘विषय समजून घेण्यासाठी’ असावा. उदाहरणार्थ, ‘वित्तीय तूट नेमकी आहे काय याचा मला शोध घ्यायचा आहे,’ ही भावना असावी. ‘अभ्यासक्रमात समाविष्ट आहे म्हणून नव्हे तर देशाचा सुजाण नागरिक म्हणून मला वित्तीय तूट समजली पाहिजे.’ ज्ञानाधिष्ठित अभ्यास प्रक्रियेची सुरुवात होते ती यातून. पण या प्रक्रियेची तार्किक पूर्तता घडवून आणणे ही तितकेच महत्त्वाचे ठरते. ही प्रक्रिया पूर्ण होते ती ‘विकसित विचारांच्या उपयोजनातून’. यात दोन घटक समाविष्ट आहेत. ‘विचार विकसित करणे’ व ‘विचारांचे उपयोजन करणे.’
वाचन करत असताना आपण केवळ वाचन करतो की वाचता वाचता थबकतो, विचारमग्न होतो? दुसऱ्या भागात विचार विकसित होतो. याचा नेमका अर्थ काय? पुस्तकातील प्रत्येक वाक्य ‘वेदवाक्य’ आहे का? नाही, पुस्तकातील प्रत्येक वाक्याला स्वत: पडताळून पाहता येते. पुस्तकाला प्रश्न विचारा. उत्तरासाठी आजूबाजूला, समाजात पाहा. सूक्ष्म निरीक्षणाशिवाय केलेले वाचन ज्ञानापासून फारकत घेते, मग त्याचे रूपांतर पुन्हा माहितीमध्ये होते. पुन्हा तीच माहिती साठविण्याचा संघर्ष! असा संघर्ष विचारांचा, जिज्ञासेचा पुढील सर्व संघर्ष संपवू शकतो. वाचन-प्रश्न-निरीक्षण-पडताळणी यातून ज्ञान मिळवता येते. विचारांची कक्षा रुंदावणे म्हणजे यापेक्षा दुसरे काही नाही, परंतु महत्त्वाची बाब अशी की ही प्रक्रिया जाणीवपूर्वक सतत राबवावी लागते. बाहेरून ती लादता येत नाही. मार्गदर्शन मिळवता येईल, उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे समाधान मार्गदर्शकाकडून करून घेता येईल. पण ही प्रक्रिया मात्र आंतरिक  (internal) असून ती प्रत्येकाला स्वत:हून विकसित करावी लागेल.
दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे ज्ञानाचे दृढीकरण. याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ज्ञानाचे उपयोजन किंवा वापर. एखादी संकल्पना समजल्यानंतर तिचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. किंबहुना, या संपूर्ण प्रक्रियेची ती एक मूलगामी गरज आहे. ज्या तीन बाबींचा आपण ऊहापोह केला, त्या तिन्ही बाबी ‘शिक्षण’ नावाची संकल्पना स्पष्ट करतात. म्हणून शिक्षित असणे ही सर्वच परीक्षांची गरज ठरते. म्हणूनच सुशिक्षित व सजग व्यक्तीला या परीक्षेसाठी वेगळा अभ्यास करावा लागत नाही, असे आयोग म्हणते. पण आपल्या शिक्षणव्यवस्थेने ज्ञानाशी घेतलेली फारकत लक्षात घेता पुन्हा बारावीपर्यंतचा अभ्यास ‘एनसीईआरटी’च्या (NCERT)  पुस्तकांतून करावा लागतो. परीक्षांच्या दबावाखाली ज्ञानप्राप्तीचा आनंद हिरावला जातो. त्यामुळेच या पुस्तकांद्वारे त्या त्या विषयांच्या मूलभूत विचार व संकल्पनाची नव्याने व डोळसपणे उजळणी करावी लागते.
ज्या तीन मुद्दय़ांची आपण चर्चा केली, ती यावर्षी विचारल्या गेलेल्या प्रश्नांच्या माध्यमातून समजून घेऊयात. सर्वप्रथम निबंधाच्या विषयांचा विचार करू. साधारणपणे एका विषयात दोन, तीन संकल्पना व त्यांचा अन्योन्य संबंध असा रोख दिसतो. तद्वतच एक विषय नेहमीच तत्त्वज्ञानाच्या अंगाने दिलेला असतो. तात्त्विक वाचन व विचार यांची पाश्र्वभूमी असल्याशिवाय असे विषय निवडू नयेत. इतर विषयांवर बहुशाखीय दृष्टिकोन असेल तर चांगला निबंध लिहिता येऊ शकतो. यावर्षी परीक्षेत विचारलेल्या विषयांचा पुढीलप्रमाणे विचार करता येईल-
१. Is Colonial mentality  hindering India’s success?
० वसाहतवादी मानसिकता म्हणजे काय?
० वसाहतवादी मानसिकतेची भूमिका व तिचा परिणाम ० सामाजिक, राजकीय, आíथक, सांस्कृतिक परिणाम  ० सामाजिक – समाजाचे स्तरीकरण, सामाजिक अभिसरण, विषमता, शोषण, जातीय/धार्मिक तेढ/दंगली; ‘सामाजिक न्यायाचा अभाव’ इत्यादी.
० राजकीय – अभिजन स्तराचा प्रभाव, लोकशाहीची परिणामकारकता, जातीचे/धर्माचे झालेले राजकारण, राजकीय सर्वसमावेशकतेचा अभाव, राजकीय हेतूने प्रेरित विभाजनवाद.
० आíथक – विकासाचा असमतोल (प्रादेशिक, सामाजिक, नागरी-ग्रामीण) सर्वसमावेशकतेचा अभाव, अनुसूचित प्रदेशांचा विकास (शोषण?), गरिबीचे प्रमाण इ.
० सांस्कृतिक – विविध अस्मितांचे अधोरेखन व राजकीयकरण, अस्मितेतून तेढ, असहिष्णुता, संस्कृतीचे राजकारण.
० मूठभर लोकांचे यश संपूर्ण भारताचे यश मानता
येईल का?
२. GDP (Gross Development Product), along with GHP (Gross Happiness Product), would be the right indices for judging well-being of a country.
० संकल्पना – GDP, GHP,, विकास, मानवी सुख व समाधान (सौख्य), विकास व मानवी सौख्यातील संबंध किंवा द्वंद्व, आíथक विकास-मानवी विकास, सर्वसमावेशकता, रोजगारहीन विकास (Jobless growth),विकास- आíथक? सामाजिक?
० मानवी समाधानाविना (सौख्य) झालेला विकास – एक विरोधाभास.
३. Science & Technology is panacea for the Growth and Security of the Nation.
० संकल्पना- वृद्धी  (growth), सुरक्षा (security), राष्ट्र (nation)  
० मुख्य विषय – (Sci. & Tech)  विज्ञान व तंत्रज्ञान – स्वरूप, रामबाण उपाय?
० विज्ञान-तंत्रज्ञानाचे योगदान.
० वाढ – शेती, उद्योग, आरोग्य, शिक्षण-प्रसार, शासन, संदेश व दळणवळण, सेवा व नवी क्षितिजे (उदा. जैव तंत्रज्ञान), जागतिकीकरण.
० सुरक्षा – निसर्गावरील वाढते मानवी नियंत्रण, आधुनिक उपकरणे, जलद संदेश क्षमता इ.
० विज्ञान-तंत्रज्ञानातून निर्माण होणाऱ्या समस्या
० वाढीशी संबंधित – विषमता, मक्तेदारी,
नतिकतेचे प्रश्न.
० सुरक्षेशी संबंधित – सर्वसंहारक अण्वस्त्रे, दहशतवाद व आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण हानी, सायबर सुरक्षा, सायबर युद्ध (संवेदनशील माहितीचे अपहरण व गरवापर) इ.
० विज्ञान व तंत्रज्ञान-तटस्थ
० मानवी वापरावर परिणामाचे अवलंबित्व.
० पर्याय – विध्वंस की विकास?
विज्ञान, तंत्रज्ञान स्वत: रामबाण उपाय नाही, परंतु अनेक समस्यांचे समाधान; विधायक वापर ही पूर्वअट.
वरील निबंधांचे आराखडे ‘सूचक’ आहेत. यापेक्षा अनेक आयाम जोडता येतील. महत्त्वाचा धागा ठरतो तो उपयोजनेचा. त्यादृष्टीने अनेक विषयांतील ज्ञानाचे उपयोजन करणे क्रमप्राप्त ठरते. यासाठी व्यापक दृष्टिकोन, सुरुवातीला उल्लेख केलेल्या तीन मुद्दय़ांच्या अनुषंगाने विकसित करणे आवश्यक ठरते.
सामान्य अध्ययन पेपर १ मधील प्रश्नसुद्धा ‘बहुआयामी’ आहेत. उदा. संगम साहित्यातून राजकीय घडामोडींपेक्षा तत्कालीन सामाजिक-आíथक अवस्थेचे विविधांगी दर्शन घडते. अभ्यास करत असताना हा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा ठरतो. संगम साहित्य दक्षिण भारतातील सामाजिक-आíथक परिस्थिती व हळूहळू वाढणारा आर्य प्रभाव प्रतििबबित करते. साहित्य अभ्यासताना साहित्य प्रकार, नाव व विषय यापलीकडे जाऊन त्याचा समाजावरील व समाजाचा साहित्यावरील परिणाम लक्षात घेणे आवश्यक ठरते. साहित्यच नव्हे तर कोणतीही कला तत्कालीन समाज प्रतििबबित करत असते.
प्रादेशिकवाद व स्वतंत्र राज्याच्या मागण्या यावरील प्रश्नाचे उत्तरसुद्धा सामाजिक-आíथक मुद्दय़ांशी निगडित आहे. प्रादेशिक अस्मितेच्या पलीकडे जाऊन या घटकांचा शोध घेतला पाहिजे. भूगोल विषयावरील प्रश्न आकलन क्षमतेचा वेध घेणारे दिसतात. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात उष्ण वाळवंटी प्रदेशाचे वैशिष्टय़पूर्ण स्थान कोणत्या घटकांमुळे आहे यांचा ऊहापोह करणे एका प्रश्नाच्या उत्तरात अपेक्षित होते. तापमान, वारे, समुद्राचे स्थान, भूप्रदेशाचे वितरण, दाब, coriolis effect  या घटकांचा साकल्याने केलेला अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
पेपर २ मधील खाद्यान्न सुरक्षा विधेयकावरील प्रश्नाच्या उत्तरामध्ये भुकेच्या व कुपोषणाच्या समस्येव्यतिरिक्त अंमलबजावणीतील समस्या व जागतिक व्यापार संघटनेमधील (WTO)  भारताची भूमिका समजणे आवश्यक ठरते. तसेच पेपर ३ मधील भू-सुधारणा, शेतीची उत्पादन क्षमता व गरिबीचे उच्चाटन यावर आधारित प्रश्न ‘बहुआयामी’ ठरतो. या तीन घटकांचा संबंध, समस्या व उपाययोजना याची चर्चा उत्तरामध्ये अपेक्षित आहे. अर्थात यासाठी शेतीवरील अवलंबित्व, दरडोई क्षेत्र, तंत्रज्ञान अशा अनेक घटकांचा अभ्यास आवश्यक आहे. तद्वतच इतर क्षेत्रांतील रोजगार निर्मितीचा अभाव शेतीवरील अवलंबित्व वाढवितो, याचाही विचार करणे
गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय संबंधाचे आकलन करत असताना देशांतर्गत घटकांचे भान ठेवणे आवश्यक असते हे स्पष्ट करतात भारत-श्रीलंका यांच्या संबंधावरील प्रश्न. चिनी प्रभाव, तामीळ वंश व मानवी हक्कांची पायमल्ली याबरोबरच भारतीय संघराज्याचे स्वरूप व आघाडी राजकारण हेही महत्त्वाचे घटक ठरतात. विज्ञान – तंत्रज्ञानावरील प्रश्न (Fixed Dose Drug Combination; Digital Signature; 3D printing)  हे व्यापक सामाजिक समस्यांशी निगडित आहेत. ‘मानवी जीवनावर परिणाम करणारे नवे शोध’ हा मुख्य धागा ठरतो.
सामान्य अध्ययनाचे पहिले तीन पेपर जुन्या संरचनेतील बदल दर्शवितात. परंतु पेपर- ४ नतिकता हा पूर्णपणे नवीन विषय आहे. चाकोरीबद्ध अभ्यासाच्या मर्यादा सर्वाधिक स्पष्ट होतात ते या पेपरमध्ये. एका रात्रीतून याची तयारी होऊ शकत नाही. याचे स्वरूप कल-चाचणी असे आहे. बहुतांश प्रश्न kWhat do you understand byl या प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या संज्ञाचा अर्थ व त्याबद्दलची आपली धारणा स्पष्ट करावी लागते. नतिकता या विषयाशी निगडित संज्ञा, विचारवंत यांचा अभ्यास व ‘चर्चासत्रे’ या माध्यमातून तयारी करता येऊ शकेल. केस स्टडीजची काही उदाहरणे पाहून सराव करता येईल.
या परीक्षेत सर्वाधिक महत्त्वाचा घटक ठरतो तो ‘कमी वेळेत नेमकेपणाने विचार मांडण्याचा.’ आपला अभिव्यक्ती बरोबरचा संघर्ष परीक्षेपर्यंत ताणणे धोकादायक ठरू शकते. आपले विचार योग्य शब्दांत मांडता येणे आवश्यक आहे. भाषा कोणतीही असो, ‘योग्य अभिव्यक्ती’ महत्त्वाची असते. परंतु आयोगाने ज्या प्रकारे इंग्रजी भाषेच्या ज्ञानाची अपेक्षा व्यक्त केली आहे ती पाहता चांगली इंग्रजी शिकणे भाग आहे. याला वेगळा वेळ देण्यापेक्षा इंग्रजी पुस्तके वाचताना शब्द शिकणे व ते शब्द आणि त्या वाक्यरचना वापरण्याचा प्रयत्न करणे यातून इंग्रजी भाषा घडवता येते.
एकंदर विचार करता या परीक्षेसाठी ‘एनसीईआरटी’ची पुस्तके, निवडक संदर्भग्रंथ व नियमित वर्तमानपत्राचे वाचन पुरेसे ठरते. पण हा संपूर्ण अभ्यास विभागलेला नसावा, तर परस्परांशी संबंध निर्माण करत समग्रपणे करावा. पुस्तके वाचताना मिळवलेले ज्ञान वर्तमानपत्र वाचताना लक्षात ठेवले पाहिजे. त्यांचा संबंध जोडता आला पाहिजे. तद्वतच वर्तमानपत्राचे वाचन करत असताना अभ्यासक्रमाशी संबंधित लेख वाचावेत. यातून ज्ञानाचे उपयोजन व अभिव्यक्ती दोहोंची वृद्धी होते.                         
admin@theuniqueacademy.com

Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
Public sector recruitment process, marks, transparency,
सार्वजनिक क्षेत्रातील भरती प्रक्रिया पारदर्शक असणे आवश्यक, गुण रोखून धरणे पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करणारे, उच्च न्यायालयाची टिप्पणी
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता