NEET PG Counselling Date: राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा पदव्युत्तर अर्थात नीट पीजी (NEET PG) समुपदेशन २०२१ ची प्रक्रिया १२ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी रविवार, ०९ जानेवारी रोजी नीट समुपदेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणाले की नीट समुपदेशन बुधवार, १२ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ जानेवारी २०२२ रोजी सुप्रीम कोर्टाने नीट पीजी समुपदेशन २०२१ (NEET PG 2021 Counselling) ला ग्रीन सिग्नल दिला होता. न्यायालयाच्या अंतरिम निर्णयानुसार ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. त्याच वेळी, यावर्षी EWS साठी १० टक्के आरक्षण प्रभावी ठेवण्याचे मान्य करण्यात आले. मात्र, भविष्यात हा कोटा कायम ठेवायचा की नाही, याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घ्यायचा आहे. यासाठी या प्रकरणाची पुढील सुनावणी ३ मार्च रोजी होणार आहे.

नीट पीजी २०२१ ची समुपदेशन प्रक्रिया ऑक्टोबर २०२१मध्ये सुरू होणार होती, परंतु OBC आणि EWS कोट्याच्या तरतुदींशी संबंधित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या स्थगिती आदेशामुळे ती लांबली आहे. या खटल्याला झालेल्या विलंबामुळे देशभरातील कनिष्ठ आणि निवासी डॉक्टरांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला.

TOPICSनीट
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neet pg counselling dates released check full schedule other details at mcc nic in ttg