सध्या बहुतांश रोगांवर खात्रीलायक औषधं उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर एकाच रोगावर वेगवेगळ्या कित्येक औषधांचे पर्यायसुद्धा आज उपलब्ध आहेत. एखादं औषध जर बाजारात उपलब्ध नसेल तर त्याला पर्याय म्हणून डॉक्टर इतरही औषधं सुचवतात. पण सुमारे १०० वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. १९०० सालापर्यंत अनेक रोगांवर औषधंही शोधली गेली नव्हती आणि जगभरातील लोकांना उपलब्ध असलेल्या औषधांचीही नीटशी माहिती नव्हती. त्या काळी माणसाचं सरासरी आयुर्मान होतं फक्त ४५ वष्रे! आता ते ६८ वर्ष इतकं आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धाच्या दिवसांत एक मोठी समस्या उभी ठाकली होती. युद्धात जखमी होणाऱ्या सनिकांनी वॉर्डस् खचाखच भरत होते. अत्याधुनिक सोयीसुविधा नसलेल्या त्या काळात जखमांमध्ये जंतुसंसर्ग होणे ही सर्रास बाब होती. जंतुसंसर्ग झाल्यामुळे जखमांमध्ये पू होणं, सेप्टिक होणं या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. जखमा साफ करण्यासाठी जालीम रसायनं वापरूनही शरीरात शिरलेल्या जंतूंविरुद्धचं युद्ध जिंकता येत नव्हतं.
त्यावेळी लंडनच्या सेंट मेरी रुग्णालयाच्या लसीकरण विभागात हंगामी तत्त्वावर अलेक्झांडर फ्लेिमग नावाचा युवक काम करत होता. धडपडय़ा स्वभावाच्या अलेक्झांडरचं बालपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. स्कॉटलंडच्या दऱ्याखोऱ्यांतून डोंगरमाथ्यांवरून भटकणं आणि निसर्ग अनुभवणं अलेक्झांडरच्या आवडीचं होतं. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अलेक्झांडरला सर्जन व्हायचं होतं. याच ईष्रेने त्याने सेंट मेरी रुग्णालयात उमेदवारी करण्याची संधी मिळवली होती. सेंट मेरी रुग्णालयातल्या लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. अल्मॉर्थ राईट यांच्या हाताखाली फ्लेिमग महायुद्धात जखमी झालेल्या सनिकांवर औषधोपचार करत होता. त्याचवेळी जंतुसंसर्गाविरुद्धची लढाई कशी जिंकायची, याचेही मनसुबे त्याच्या मनात सुरू होते. जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी त्या काळी जखमांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे सनिकांची रोगप्रतिकारशक्तीच नाहीशी होऊन काही दिवसात त्यांचा मृत्यू होत असल्याचं फ्लेिमगच्या निदर्शनास आलं. आपलं हे मत शोधनिबंधाच्या स्वरूपात फ्लेिमगने मांडलं आणि पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ‘द लँसेट’ या प्रसिद्ध वैद्यकीय शोधपत्रिकेत ते प्रसिद्ध झालं. जंतुसंसर्गावर मात करण्यासाठी वापरली जाणारी औषधं कसा घात करत आहेत, याविषयीच्या फ्लेिमगच्या मतांना डॉ. अल्मॉर्थ राईट यांनी पुष्टी दिली. युद्धामध्ये मरणाऱ्या सनिकांपेक्षा योग्य उपचारपद्धती अस्तित्वात नसल्याने मृत्युमुखी पडणाऱ्या सनिकांची संख्या जास्त होती. युद्धभूमीवर लढताना येणाऱ्या मृत्यूपेक्षा असा मृत्यू अत्यंत भयंकर आणि क्लेशदायी होता. युद्धभूमीवर समोर शत्रू दिसत होता, या शत्रूवर विजय कसा मिळवायचा हे समजत होते; पण डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या सूक्ष्मजीवांविरुद्धची लढाई कशी जिंकायची, हे समजत नव्हतं.
जंतुसंसर्गावर संशोधन करणाऱ्या फ्लेिमग यांना डोळ्यातले अश्रू आणि नाकातल्या चिकट स्रावामध्ये जंतुसंसर्गाला अटकाव करणारा घटक सापडला. या घटकाला फ्लेिमग यांनी नाव दिलं- ‘लायसोझाइम’. शरीराच्या प्रतिकारक्षमतेचा हा महत्त्वाचा घटक असल्याचं त्यांचं मत होतं.
१९२७ साली फ्लेिमग यांनी स्टॅफिलोकोकस या सूक्ष्मजीवावर संशोधन सुरू केलं. जखमांवर असणारा, पू आणि दूषित द्रव्य निर्माण करणारा, विषबाधेस कारणीभूत ठरणारा हा सूक्ष्मजीव. स्टॅफिलोकोकस जीवाणू खाद्यपदार्थावर वाढताना खाद्यपदार्थाच्या अपघटनातून हे जीवाणू एन्टेरोटॉक्झिन नावाचे रसायन तयार करतात. खाद्यपदार्थाबरोबर हे रसायन आपल्या पोटात गेलं की उलटय़ा आणि जुलाब सुरू होतात. संशोधन करण्यासाठी या जीवाणूंची मोठय़ा प्रमाणावर पदास करण्याचं काम फ्लेिमग यांनी हातात घेतलं होतं.
ऑगस्ट महिन्यातली तीन आठवडय़ांची सुट्टी संपवून ३ सप्टेंबर १९२८ या दिवशी फ्लेिमग आपल्या प्रयोगशाळेत रुजू झाले होते. स्टॅफिलोकोकस जीवाणूची पदास झालेल्या काचेच्या अनेक पेट्री डिश पडल्या होत्या. खरं म्हणजे सुट्टीवर जाण्यापूर्वी आपल्या साहाय्यकाला या सगळ्या डिशेस साफ करून ठेवायला सांगितल्या होत्या. पण, त्याने ते काम केलं नव्हतं. आता या सगळ्या पेट्री डिश धुऊन, साफ करून मगच पुढचं काम; असा विचार करून फ्लेिमग एकेक डिश धुवायला लागले. इतक्यात त्यांचं लक्ष एका डिशमधल्या स्टॅफिलोकोकसच्या पदाशीकडे गेलं. डिशमध्ये एका बाजूकडे स्टॅफिलोकोकसचं नामोनिशाण उरलं नव्हतं. त्या जागी वेगळी बुरशी आली असल्याचं फ्लेिमग यांच्या नजरेतून सुटलं नाही. म्हणजेच, या बुरशीने स्टॅफिलोकोकाय सूक्ष्मजीवांचा फन्ना उडवला होता. पेनिसिलीयम प्रकारातली ती बुरशी होती. या बुरशीला फ्लेिमग यांनी ‘मोल्ड ज्यूस’ असं संबोधलं आणि स्टॅफिलोकोकायचा नायनाट करणाऱ्या मोल्ड ज्यूसमधून स्रवणाऱ्या द्रव्याला ‘पेनिसिलीन’ असं नाव ठेवलं.
यानंतर फ्लेिमग यांनी केलेल्या संशोधनातून असं समजलं की, केवळ स्टॅफिलोकोकायच नव्हे तर पेनिसिलीयममुळे स्ट्रेप्टीकॉकस, न्युमोकॉकस, मेिनगोकॉकस, गोनेकॉकस अशा अनेक सूक्ष्मजंतूंचा नायनाट करता येतो. यामुळे स्काल्रेट फिवर, न्युमोनिया, मॅनिजायटिस, डिफ्थेरिया अशा रोगांवर मात करण्यासाठी रामबाण इलाज सापडला. १९२९ साली आपलं हे संशोधन फ्लेिमग यांनी ‘ब्रिटिश जर्नल ऑफ एक्सप्रिमेंटल पॅथोलॉजी’मध्ये शोधनिबंधाच्या स्वरूपात प्रसिद्ध केलं. पण फ्लेिमग यांचं हे संशोधन केवळ शास्त्रीय शोधनिबंधात बंदिस्त राहून कदाचित आजही आपल्याला या रोगांविरुद्ध उपाय सापडला नसता. कारण, फ्लेिमग यांनी आपल्या संशोधनाच्या चाचण्या घेतल्या नाहीत की ‘मोल्ड ज्युस’मधून पेनिसिलीन वेगळं काढून औषध तयार केलं नाही.
फ्लेिमग यांनी अर्धवट ठेवलेलं कार्य हॉवर्ड फ्लोरी आणि एन्रेस्ट चेन या संशोधक जोडगोळीने केलं. १९४० साली या दोघांनी उंदरांवर पेनिसिलीनच्या यशस्वी चाचण्या घेतल्या. त्यानंतर पेनिसिलीन औषध म्हणून वापरायला सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान सुरू झालेल्या संशोधनाचा उपयोग दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी कामी आला. अमेरिका आणि इंग्लड इथे पेनिसिलीनचं उत्पादन सुरू झालं आणि मित्रराष्ट्रांना महायुद्ध जिंकण्याचा जणू ‘पासवर्ड’ मिळाला. पहिल्या महायुद्धादरम्यान उद्भवलेली जंतुसंसर्गाची समस्या दूर झाली होती. मित्रराष्ट्रांच्या जखमी सनिकांवर हमखास इलाज होत होते.
पेनिसिलीनची उपयुक्तता जगभरात सिद्ध झाली. ‘पेनिसिलीन निसर्गाने दिले, मी फक्त ते शोधून काढले,’ हे उद्गार होते अलेक्झांडर फ्लेिमग यांचे. त्याच्यापुढे असं म्हणावंसं वाटतं की, शोधलेल्या पेनिसिलीनचा उपयोग कसा करायचा हे दाखवून दिले फ्लोरी आणि चेन या जोडगोळीने. म्हणूनच, १९४५ सालचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार पेनिसिलीनच्या शोधाबद्दल अलेक्झांडर फ्लेिमग, हॉवर्ड फ्लोरी आणि एन्रेस्ट चेन यांना संयुक्तपणे प्रदान केला गेला.
सेंट मेरी रुग्णालयात हंगामी तत्त्वावर रुजू झालेल्या फ्लेिमग यांनी पुढे तब्बल ४९ वष्रे या रुग्णालयात काम केलं. जंतुशास्त्राशी जिवाशिवासारखं नातं जुळलेल्या सर अलेक्झांडर फ्लेिमग या नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञाला १९५५ साली सेंट मेरी रुग्णालयात काम करत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
पेनिसिलीनचा हा शोध म्हणजे जगातलं एक जबरदस्त आश्चर्य म्हणावं लागेल. जर फ्लेिमग यांच्या साहाय्यकाने पेट्री डिश धुऊन ठेवल्या असत्या तर.. किंवा फ्लोरी आणि चेन यांनी शोधनिबंधात बंदिस्त असलेल्या फ्लेिमग यांच्या संशोधनाच्या चाचण्या घेतल्या नसत्या तर.. कदाचित प्रतिजैविकांच्या शोधाला आणखी कितीतरी काळ जावा लागला असता आणि मानवाचं सरासरी आयुर्मान इतकं वाढलं नसतं. खरोखरच हा शोध आणि त्यासाठी केलं गेलेलं संशोधन म्हणजे मानवासाठी तारणहार ठरलं आहे. ल्ल
ँीेंल्ल३’ंॠ५ंल्ल‘ं१@ॠें्र’.ूे
० वेगवेगळ्या रोगांवर कोणकोणती प्रतिजैविके वापरली जातात, याची माहिती डॉक्टरांकडून मिळवा.
० प्रतिजैविकांबरोबरच डॉक्टर काही औषधं आवर्जून घ्यायला सांगतात. ही औषधे कशासाठी घ्यावी लागतात? प्रतिजैविकांचा समावेश असलेली उपचारपद्धती सुरू असताना कोणती काळजी घेणं आवश्यक ठरतं?
० कोणतीही प्रतिजैविके डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत, असं का म्हटलं जातं?
० प्रतिजैविक औषधाच्या नावापुढे २५०, ५०० असे आकडे लिहिलेले असतात. या आकडय़ांचा अर्थ काय असतो?
० प्रतिजैविकांचे वेगवेगळे प्रकार पडतात. हे प्रकार कोणते आणि ते कशाच्या आधारे पाडले आहेत याची माहिती मिळवा.
० मानवाप्रमाणेच जनावरांनासुद्धा प्रतिजैविके दिली जातात. ही प्रतिजैविके मानवाला दिली जाणारी आणि इतर प्राण्यांना दिली जाणारी प्रतिजैविके सारखीच असतात का वेगळी असतात? ती कोणकोणत्या रोगांवर दिली जातात?
० प्रतिजैविकांमुळे रोगनिवारणाची प्रक्रिया कशी घडून येते, याविषयी माहिती मिळवा.
० सर्दी, खोकला अशा रोगांसाठी वारंवार प्रतिजैविके घेतली जातात आणि कालांतराने या प्रतिजैविकांचा प्रभाव कमी झाल्याचं आढळतं. मग जास्त तीव्रतेची प्रतिजैविके घ्यावी लागतात. कालांतराने त्यांचाही परिणाम कमी होत गेल्याचं जाणवतं. असं का होत असावं?
० प्रतिजैविके ही केवळ मानवानेच तयार केलेली आहेत, असं नाही. निसर्गतसुद्धा प्रतिजैविके तयार होतात. अशा प्रतिजैविकांच्या कार्यप्रणालीविषयी शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. परंतु, पारंपरिक प्रतिजैविकांच्या तुलनेत नसíगकरीत्या तयार होणारी प्रतिजैविके जास्त प्रभावी आणि दीर्घकाळापर्यंत परिणामकारक असल्याचं शास्त्रज्ञांचं मत आहे. नसíगकरीत्या तयार होणाऱ्या प्रतिजैविकांसंबंधी माहिती मिळवा.