विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, ‘तयारी यूपीएससीची’ या लेखमालेत आजपर्यंत यूपीएससी परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपाची विस्तृत चर्चा केली आहे. त्याअंतर्गत सामान्य अध्ययनाचे वाढलेले महत्त्व, नव्याने समाविष्ट केलेला अभ्यासक्रम, त्यातही ‘सामान्य अध्ययन पे. क्र. ४’ नतिकता, सचोटी व दृष्टिकोन हा पूर्णत: नवा पेपर या बाबींविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महत्त्वाचे म्हणजे ‘सा. अ. ४’ मधील नतिकता, भावनिक बुद्धय़ांक, दृष्टिकोन, सचोटी, उत्तरादायित्व, नतिक तत्त्वज्ञान असे विविध अभ्यासघटक आणि त्यासंबंधी प्रकरणे (उं२ी र३४्िरी२) याकडे कसे पाहता येईल याचीही चर्चा केली. अर्थात या नव्या अभ्यासक्रमावर आधारित आयोगाची एकही प्रश्नपत्रिका उपलब्ध नव्हती. कारण या वर्षांपासूनच हा नवा बदल स्वीकारण्यात आला आहे. स्वाभाविकच त्या त्या विषयांच्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण करून त्यासंबंधी तयारी कशी करावी याचा ताíकक पद्धतीने अंदाज घेऊन लेखमालेत माहिती सादर करण्यात आली.
प्रस्तुत म्हणजे आजच्या लेखापासून मात्र केंद्र लोकसेवा आयोगाने या अभ्यासक्रमावर नुकत्याच म्हणजे मागील आठवडय़ात घेतलेल्या पहिल्या परीक्षेतील सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका संदर्भ म्हणून प्राप्त झालेल्या आहेत. त्यामुळे यूपीएससी मुख्य परीक्षेची तयारी नेमकी कशी करावी, या चच्रेत आणखी नेमकेपणा व अचूकता येईल यात शंका नाही. त्यादृष्टीने नुकत्याच पार पडलेल्या मुख्य परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ‘मार्गदर्शक’ म्हणून समोर ठेवून पुढील लेखांत सर्व विषयांच्या तयारीची दिशा कशी असावी याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत.
यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम व मागील प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाचे महत्त्व या आधीही अधोरेखित केले होते. अभ्यासक्रम तर आपल्यासमोर होताच; आता त्यावर आधारित पहिली प्रश्नपत्रिका आपल्या हाती आल्यामुळे अभ्यासाची व्याप्ती आणि दिशा ठरवणे अधिक सुलभ होईल. म्हणूनच निबंधाच्या पेपरपासून वैकल्पिक विषयांच्या पेपरसह सर्व प्रश्नपत्रिकांचे बारकाईने अवलोकन करणे उपयुक्त ठरेल. त्यात प्रश्न कोणत्या घटकांवरील आहे, प्रश्नाचे स्वरूप माहितीप्रधान आहे की विश्लेषणात्मक आहे, प्रश्न जुन्या माहितीची विचारणा करणारा आहे की अलीकडे घडलेल्या घडामोडींविषयी आहे, अशा विविध पद्धतीने प्रत्येक प्रश्न व प्रश्नपत्रिकेचे सखोल विश्लेषण करावे. या दृष्टिकोनातून विचार केल्यास नुकत्याच पार पडलेल्या  मुख्य परीक्षेतून काही प्राथमिक, परंतु अत्यंत निर्णायक स्वरूपाचे धडे घेणे महत्त्वाचे ठरते.
सर्वप्रथम, नवी प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर २५० गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या प्रत्येक पेपरमध्ये एकूण २५ प्रश्न विचारलेले  आहेत, हे लक्षात येते. म्हणजे प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. दुसरी बाब म्हणजे प्रत्येक प्रश्नाला १० गुण निर्धारित केलेले आहेत. प्रत्येक प्रश्न २०० शब्दांत लिहावा असा स्पष्ट निर्देश दिलेला आहे. याचा अर्थ तीन तासांत सुमारे पाच हजार शब्द लिहावयाचे आहेत. जुन्या पद्धतीशी तुलना करता नव्या पद्धतीत जवळपास पूर्वीपेक्षा ४० ते ५०% एवढय़ा अधिक प्रमाणात उतरे लिहावी लागणार आहेत. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आयोगाने प्रश्नपत्रिकेतील सर्वच्या सर्व प्रश्न अनिवार्य केले आहेत आणि कोणत्याही प्रकारचा अंतर्गत विकल्प शिल्लक ठेवलेला नाही.
उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता वेळेचे नियोजन करणे अत्यंत अवघड बनले आहे. त्यामुळे निर्धारित तीन तासांत जास्तीत-जास्त प्रश्नांची उत्तरे लिहिता यावीत यासाठी गतिमान लेखन कौशल्यच मध्यवर्ती बनले आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे माहिती असूनदेखील मोठी शब्दमर्यादा आणि भरपूर प्रश्न यामुळे २५० गुणांपकी कमाल १५० ते १७० गुणांचाच पेपर लिहिता आला अशी सर्वच विद्यार्थ्यांची दशा झाली. त्यामुळे या नव्या पॅटर्नमध्ये लेखनाकडे अभ्यासाइतकेच किंबहुना त्यापेक्षाही जास्त लक्ष देणे अत्यावश्यक बनले आहे. अर्थात त्यासाठी नियमित व प्रचंड सराव हेच उत्तर आहे. त्यामुळे लेखनाची गती तर वाढेलच परंतु त्याचबरोबर आपल्या मांडणीत नेमकेपणा व सुसंघटितपणा येईल आणि त्याद्वारेच जास्तीत जास्त प्रश्नांची दर्जेदार उत्तरे लिहिता येतील. थोडक्यात, प्रथमदर्शनी विचार करता नवी यूपीएससी विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यांची व त्यासंबंधी वेळेच्या नियोजनाची कसोटी पाहणारी आहे, यात शंका नाही.    
tukaramnjadhav@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा