नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर येथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. कॉलेजने यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२१ आहे.
या पदांसाठी होणार भरती
मुख्य प्रशिक्षक
वरिष्ठ प्रशिक्षक
( हे ही वाचा: Railway Recruitment 2021: नोकरीची सुवर्ण संधी; १६०० पेक्षा जास्त रिक्त पदे )
शैक्षणिक पात्रता काय?
मुख्य प्रशिक्षक या पदासाठी विज्ञान शाखेत पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. तसेच नॅशनल फायर सर्व्हिस कॉलजेमधून सब ऑफिसर कोर्स पूर्ण असणं आवश्यक आहे. शिकवण्याचा आणि ट्रेनिंग देण्याचा पाच वर्षांचा अनुभवही आवश्यक असणार आहे. शारीरिक पात्रता नियमांनुसार असणं आवश्यक.
(हे ही वाचा: IOCL Recruitment 2021: एकूण ७१ पदांसाठी भरती; पगार १,४०,००० रुपयांपर्यंत )
वरिष्ठ प्रशिक्षक या पदासाठीही विज्ञान शाखेत पदवी किंवा इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा आवश्यक आहे. अग्निशमन दलातील जवान म्हणून दोन वर्षांचा अनुभव आवश्यक असेल. शारीरिक पात्रता नियमांनुसार असणं आवश्यक आहे.
पगार किती?
मुख्य प्रशिक्षक या पदासाठी ४४,९०० ते १,४२,४०० रुपये प्रतिमहिना पगार असेल.
वरिष्ठ प्रशिक्षक या पदासाठी ३५,४०० ते १,१२,४०० रुपये प्रतिमहिना पगार असेल.
( हे ही वाचा: विप्रोमध्ये मेगाभरती; आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १७,००० फ्रेशर्सला मिळणार नोकरीची संधी )
अर्ज करण्यासाठीचा पत्ता
महानिर्देशालय अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्ड, पूर्व ब्लॉक -७, स्तर -७, आर. पुरमा, नवी दिल्ली – ११००६६
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत नोटिफिकेशन पाहा.