नॅशनल टेस्टिंग एजन्सीने २०२३ मध्ये होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार नीट युजी (National Eligibility cum Entrance Test Undergraduate) ७ मे रोजी होणार आहे. तर कॉमन युनिव्हर्सिटी इंटरन्स टेस्ट २०२३ (CUET) पुढच्या वर्षी २१ मे ते ३१ मे आणि १ जून या दिवसांमध्ये होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०२३ ते २०२४ या शैक्षणिक वर्षातील काही महत्त्वाच्या परीक्षांचे वेळापत्रक nta.ac.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात आले आहे. २०२३ मधील जेईई मेन परीक्षेची तारीखही यावर नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

आणखी वाचा- Talathi Bharti 2022: राज्यात ३६२८ तलाठी पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

२०२३ जेईई मेन परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. यातील पहिले सत्र जानेवारी २०२३ मध्ये असेल, तर दुसरे सत्र एप्रिल २०२३ मध्ये असेल. पहिले सत्र २४ जानेवारी ते ३१ जानेवारी यादरम्यान २४, २५,२७, २८, २९, ३० आणि ३१ या तारखांना असेल. तर दुसरे सत्र २०२३ मधील ६ एप्रिल ते १२ एप्रिलच्या दरम्यान ६,७,८,९,१०,११,१२ या तारखांना होणार आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रीकल्चर रिसर्च (ICER) आणि ऑल इंडिया इंटरन्स एक्झाम फॉर ॲडमिशन (AIEEA) या परीक्षा एनटीएअंतर्गत घेतल्या जातात. या परीक्षा २६,२७,२८,२९ एप्रिलला होतील.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nta releases timetable for 2023 exams neet jee icer aieea cuet pns