न्यूझीलंड सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून म्हणजेच ‘एज्युकेशन न्यूझीलंड’तर्फे कोणत्याही विषयातील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी संशोधन करता यावे यासाठी न्यूझीलंड इंटरनॅशनल डॉक्टरल रीसर्च स्कॉलरशिप्स- NZIDRS हा पीएच.डी. कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी १५ जुल २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीविषयी..
जागतिक स्तरावरील विविध क्षेत्रांतील गुणवान व्यक्तींद्वारे न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेवर विविध घटकांच्या सकारात्मक परिणामांचा व प्रभावाचा अभ्यास करून त्याद्वारे न्यूझीलंडची अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रीय व्यापार व उद्योगांच्या विकासाला चालना देणे, हा या शिष्यवृत्तीचा हेतू आहे. ही शिष्यवृत्ती न्यूझीलंड शासनाच्या ‘एज्युकेशन न्यूझीलंड’द्वारे सर्व विद्याशाखांमधील आंतरराष्ट्रीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी राबवली जाते. या शिष्यवृत्तीत शिकवणी शुल्काचा समावेश आहे. या शिष्यवृत्तीअंतर्गत एकूण वार्षकि भत्ता २५ हजार न्यूझीलंड डॉलर किंवा प्रतिमहिना दोन हजार डॉलर एवढा मिळेल. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांच्या तीन वर्षांच्या वैद्यकीय विमासुरक्षेचाही समावेश असेल. या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी न्यूझीलंडमधील िलकन विद्यापीठ, मॅसे, ऑकलंड, एयूटी, कंटरबरी, ओटागो, वैकाटो आणि व्हिक्टोरिया विद्यापीठ या आठ विद्यापीठांपकी कोणत्याही एका विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा