साहस आणि राष्ट्रप्रेम अशा दोन्हीही गोष्टी साध्य होणारे स्फूर्तिदायी करिअर म्हणजे सैन्यदलांमध्ये प्रवेश करणे होय. देशाच्या भूदल आणि नौदलात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत जाणून घेऊया.
भारताच्या संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या मित्र-मत्रिणींनो, या लेखात आपण भारतीय भूदलातील आणि नौदलातील प्रगतीच्या संधी जाणून घेऊयात.
भारतीय भूदल
देशाचे परकीय आक्रमणांपासून रक्षण करून देशवासीयांची सुरक्षितता सांभाळणे, शांतता प्रस्थापित करणे हे भारतीय भूदलाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. पूर, भूकंप, दहशतवादी आक्रमणे, अंतर्गत यादवी किंवा टोळीयुद्धे अशा संकटात ही देशाची अंतर्गत सुरक्षा, सामंजस्य व नागरिकांच्या रक्षण कामात भूदल महत्त्वाची भूमिका बजावते. १९४७चा ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा, १९६२, १९६५, १९७१, १९९९ या सर्व युद्धांमध्ये भूदलाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. नि:स्वार्थ आणि प्रामाणिकपणे देशाच्या संरक्षणासाठी, अहíनश सेवारत असलेल्या भूदलाचे घोषवाक्यच आहे ‘सíव्हस बिफोर सेल्फ’.
बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एन.डी.ए. परीक्षेद्वारे तसेच पदवीधर उमेदवार सी.डी.एस.ई. परीक्षेद्वारे आणि तंत्रशिक्षणातील पदवीधर व्यक्ती टी.जी.सी., एस.एस.सी., यू.ई.एस. या शिक्षणक्रमाद्वारे भारतीय भूदलात प्रवेश करू शकतात. स्त्री उमेदवारही भूदलात सी.डी.एस.ई, एस.एस.सी. टेक. आणि स्पेशल एन्ट्रीद्वारे प्रवेश करू शकतात.
भूदलात प्रविष्ट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षांची माहिती खालीलप्रमाणे –
* टेक्निकल एन्ट्री स्कीम – १०+२
वय -१६ वष्रे सहा महिने ते १९ वष्रे.
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक अर्हता – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विषयात सरासरी ७० टक्क्य़ांसह बारावी उत्तीर्ण.
* नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी
वय – १६ वष्रे सहा महिने ते एकोणीस वष्रे (शिक्षणक्रम सुरू होताना)
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक पात्रता – १०+२, बारावी उत्तीर्ण
* कम्बाइण्ड डिफेन्स सíव्हस एक्झामिनेशन
वय – १९ ते २३ वष्रे (शिक्षणक्रम सुरू होताना)
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – स्त्री
शैक्षणिक अर्हता – कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (भौतिकशास्त्र व गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण)/ बी.ई./ बी.टेक्. अंतिम वर्ष/ सहामाही पार पडलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र विद्यापीठाकडून प्राप्त झालेले पदवी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र दिलेल्या वेळेत सादर करणे आवश्यक असते.
सी.डी.एस.ई. एण्ट्रीजसाठी गुणांची विशिष्ट टक्केवारी निर्धारित केलेली नाही.
* टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स
वय- २० वष्रे ते २७ वष्रे
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक अर्हता – बी.ई./ बी.टेक्. फायनलचे परीक्षार्थी आणि इंजिनीअिरगचे पदवीप्राप्त विद्यार्थी.
* शॉर्ट सíव्हस कमिशन (टेक्निकल)
वय – २० ते २७ वष्रे
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – स्त्री व पुरुष
शैक्षणिक अर्हता – अधिसूचित शाखेतून इंजिनीिरगची पदवी.
* युनिव्हर्सटिी एन्ट्री स्कीम
वय – १९ ते २५ वष्रे
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग- पुरुष
शैक्षणिक पात्रता – इंजिनीअरिंग शिक्षणक्रमाच्या तिसऱ्या वर्षांचे विद्यार्थी.
एन.सी.सी. (स्पेशल) एन्ट्री
वय – १९ ते २५ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
िलग – स्त्री व पुरुष
शैक्षणिक पात्रता – ५० टक्के गुणांसह तृतीय वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी/ पदवीधर, बी ग्रेड इन ‘सी’ सर्टिफिकेट एक्झाम आणि २ वर्षे एन.सी.सी. सीनिअर डिव्ह. आर्मीमधील सेवा आवश्यक.
भारतीय नौदल
भारतीय नौदल सेवेत दाखल होण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या टप्प्यांवर संधी मिळू शकतात. बारावी उत्तीर्ण असाल तर एन.डी.ए. शिक्षणक्रमाद्वारे. पदवीधर असाल तर सी.डी.एस.ई.द्वारे आणि तंत्रशिक्षणातील पदवीधर असाल तर एस.एस.सी.(टेक्.), एस.एस.सी.(आय.टी.), यू.ई.एस. या शिक्षणक्रमामार्फत तुम्ही नौदल सेवेत सहभागी होऊ शकता.
भारताच्या समुद्री सीमांचे रक्षण नौदलाकडून केले जाते. दर वर्षी ४ डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा केला जातो. आय.एन.एस. विक्रमादित्य हे विमानवाहू जहाज भारतीय नौदल सेवेत लवकरच दाखल होऊ घातले आहे.
सागर पवन हा चार विमानांचा समूह भारतीय नौदलाच्या हवाई कसरत संघात सामील आहे.
भारतीय नौदलाचे बोधवाक्य आहे ‘शं नो वरुण:’ याचे इंग्रजीत भाषांतर आहे ‘मे द लॉर्ड ऑफ ओशन्स बी ऑस्पिशिअस अनटू अस’.
* नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी
वय – १६ वष्रे सहा महिने ते १९ वष्रे (शिक्षणक्रमाच्या सुरुवातीला)
नागरिकत्व – भारतीय
िलग- पुरुष
शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र विषयांसह बारावी (१०+२) उत्तीर्ण
* कम्बाइन्ड डिफेन्स सíव्हस एक्झामिनेशन
वय – १९ ते २३ वष्रे शिक्षणक्रमाच्या सुरुवातीला
नागरिकत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतून, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर (भौतिकशास्त्र व गणित विषयांसह बारावी उत्तीर्ण) / बी.ई./ बी.टेक. अंतिम वर्ष/ सहामाही विद्यार्थी अर्ज करू शकतात (मात्र विद्यापीठाकडून प्राप्त झालेले पदवी उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र दिलेल्या वेळेत सादर करणे आवश्यक).
सी.डी.एस.ई एन्ट्रीजसाठी गुणांची विशिष्ट टक्केवारी निर्धारित केलेली नाही.
* नेव्हल आर्ममेंट इन्स्पेक्शन सेंटर
वय – १९ वष्रे सहा महिने ते २५ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ बी.टेक्. डिग्री इन इलेक्ट्रॉनिक/ इलेक्ट्रिकल/ मेकॅ. इंजिनीअिरग किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा भौतिकशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवीधर.
* लॉजिस्टिक कॅडर
वय – १९ वष्रे सहा महिने ते २५ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
िलग- पुरुष
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम./ एम.कॉम./ एम.ए.(इकोनॉमिक्स)/ बी.ए.(इकोनॉमिक्स)/ एम.बी.ए./ बी.बी.ए./ बी.बी.एम./ बी.सी.ए./ बी.एस.सी.(आय.टी.) बी.टेक/ बी.ई.(कोणत्याही शाखेतील)/ बी.आíकटेक्ट/ आय.सी.डब्ल्यू.ए./ सी.ए./ मटेरिअल मॅनेजमेंटमधील पदवीधारक (किमान ६० टक्के) वरील सर्व पदवीधारक प्रथम वर्गात उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे.
* एस.एस.सी.- एअर ट्राफिक कंट्रोल
वय – १९ वष्रे सहा महिने ते २५ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
िलग- स्त्री-पुरुष
शैक्षणिक पात्रता – भौतिकशास्त्र / गणित / इलेक्ट्रॉनिक या विषयातील पदवी प्रथम वर्ग किंवा एम.एस्सी. भौतिकशास्त्र / गणित / इलेक्ट्रॉनिक ५५% गुणांसह उत्तीर्ण.
* एस.एस.सी. पायलट
वय – १९ वष्रे सहा महिने ते २३ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह बी.ई./ बी.टेक. कोणत्याही शाखेतून, मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण (१०+२ बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयांसह)
* एस.एस.सी. ऑब्झव्र्हर
वय – १९ ते २३ वर्षे
नागरिकत्व – भारतीय
िलग – स्त्री-पुरुष
शैक्षणिक पात्रता – ६० टक्के गुणांसह बी.ई./ बी.टेक. कोणत्याही शाखेतून, मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण (१०+२ बारावी गणित व भौतिकशास्त्र विषयांसह)
* एस.एस.सी. इन्फॉम्रेशन टेक्नोलॉजी
वय – १९ वष्रे सहा महिने ते २५ वष्रे
नागरिकत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक पात्रता – बी.ई./ बी.टेक. कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर इंजिनीअिरग/ आय.टी किंवा बी.एस्सी. आय.टी., बी.सी.ए., एम.सी.ए., एम.एस.सी.(कॉम्प्युटर), एम.टेक. (कॉम्प्युटर सायन्स) कमीत कमी ५०% गुणांसह उत्तीर्ण.