साहस आणि राष्ट्रप्रेम अशा दोन्हीही गोष्टी साध्य होणारे स्फूर्तिदायी करिअर म्हणजे सैन्यदलांमध्ये प्रवेश करणे होय. देशाच्या भूदल आणि नौदलात प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत जाणून घेऊया.
भारताच्या संरक्षण दलात करिअर करू इच्छिणाऱ्या मित्र-मत्रिणींनो, या लेखात आपण भारतीय भूदलातील आणि नौदलातील प्रगतीच्या संधी जाणून घेऊयात.
भारतीय भूदल
देशाचे परकीय आक्रमणांपासून रक्षण करून देशवासीयांची सुरक्षितता सांभाळणे, शांतता प्रस्थापित करणे हे भारतीय भूदलाचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे. पूर, भूकंप, दहशतवादी आक्रमणे, अंतर्गत यादवी किंवा टोळीयुद्धे अशा संकटात ही देशाची अंतर्गत सुरक्षा, सामंजस्य व नागरिकांच्या रक्षण कामात भूदल महत्त्वाची भूमिका बजावते. १९४७चा ब्रिटिशांविरुद्धचा स्वातंत्र्य लढा, १९६२, १९६५, १९७१, १९९९ या सर्व युद्धांमध्ये भूदलाने लक्षणीय कामगिरी बजावली आहे. नि:स्वार्थ आणि प्रामाणिकपणे देशाच्या संरक्षणासाठी, अहíनश सेवारत असलेल्या भूदलाचे घोषवाक्यच आहे ‘सíव्हस बिफोर सेल्फ’.
बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एन.डी.ए. परीक्षेद्वारे तसेच पदवीधर उमेदवार सी.डी.एस.ई. परीक्षेद्वारे आणि तंत्रशिक्षणातील पदवीधर व्यक्ती टी.जी.सी., एस.एस.सी., यू.ई.एस. या शिक्षणक्रमाद्वारे भारतीय भूदलात प्रवेश करू शकतात. स्त्री उमेदवारही भूदलात सी.डी.एस.ई, एस.एस.सी. टेक. आणि स्पेशल एन्ट्रीद्वारे प्रवेश करू शकतात.
भूदलात प्रविष्ट होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परीक्षांची माहिती खालीलप्रमाणे –
* टेक्निकल एन्ट्री स्कीम – १०+२
वय -१६ वष्रे सहा महिने ते १९ वष्रे.
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक अर्हता – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित विषयात सरासरी ७० टक्क्य़ांसह बारावी उत्तीर्ण.
* नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी
वय – १६ वष्रे सहा महिने ते एकोणीस वष्रे (शिक्षणक्रम सुरू होताना)
राष्ट्रीयत्व – भारतीय
िलग – पुरुष
शैक्षणिक पात्रता – १०+२, बारावी उत्तीर्ण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा