‘मार्केटिंग’ या कार्यक्षेत्राचे स्वरूप आणि त्यासाठी आवश्यक ठरणारी कौशल्ये आणि त्यातील संधींची ओळख-

विपणन या खरेदी-विक्री संबंधित क्षेत्रातील प्रगतीच्या वैविध्यपूर्ण संधींचा अंदाज आपल्याला या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या करिअरच्या पर्यायांवरून सहज येऊ शकतो. जाहिरात क्षेत्रापासून जनसंपर्क, विक्री संशोधन (मार्केटिंग रिसर्च), उत्पादन व्यवस्थापन अशा बहुविध विषयांचा यात अंतर्भाव होतो. आजकाल कारखानदार, सल्लागार (कन्सल्टिंग फम्र्स), जाहिरात कंपन्या, व्यापारी या पूर्वापार चालत आलेल्या उद्योगांबरोबरच आरोग्य सेवा, वित्त व्यवसाय, कलाक्षेत्र आणि सरकारी विभाग कार्यालये या कार्यक्षेत्रांतही विपणन संधींना (मार्केटिंग) भरपूर वाव आहे.

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Mazagon Dock Shipbuilders limited
नोकरीची संधी : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये भरती
Pune builders , Pune air pollution, Pune,
बांधकाम व्यावसायिकांवर का होणार कारवाई?
t Plus zero transaction system
आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये ३१ डिसेंबरपासून ‘टी प्लस शून्य’ व्यवहार प्रणाली
Kolkata Metro Railway to recruit for 128 Apprentice posts, registration begins on Dec 23 at mtp.indianrailways.gov.in
कोलकाता मेट्रोमध्ये भरती; नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

काही युवा पदवीधर व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रमांपासून सुरुवात करून उत्पादन व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन, जाहिरात, विक्री सल्लागार किंवा संशोधन या क्षेत्रांतील संधींद्वारा विपणन क्षेत्रात पाय रोवतात.

उत्पादन व्यवस्थापन

अनेक कंपन्या विशिष्ट उत्पादनाची उत्पादन किंवा समूहाची विक्री वाढवण्यासाठी एकच व्यवस्थापक नेमतात. उदा.  प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बल या कंपनीत कॉफीच्या प्रत्येक ब्रॅण्डसाठी वेगळा व्यवस्थापक नेमलेला आहे. तसेच बायर कंपनीतही ‘चिल्ड्रन्स व्हिटामिन्स’, ‘अ‍ॅडल्टस विटामिन्स’ अशा वेगवेगळ्या उत्पादनांसाठी वेगवेगळे उत्पादन व्यवस्थापक नेमले आहेत. कंपनीचे दलाली व्यवहार, बाजारपेठेचा विक्रीविषयक आढावा, कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीबद्दलची माहिती,  ग्राहकांचा कल अभ्यासणे, निरनिराळ्या जाहिरात कंपन्यांशी कंपनीच्या उत्पादनाच्या जाहिरातीबाबत चर्चा अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये प्रॉडक्ट मॅनेजरला (उत्पादन व्यवस्थापकाला) लक्ष घालावे लागते. अननुभवी पदवीधर, उत्पादन व्यवस्थापनाच्या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी खुद्द उत्पादन व्यवस्थापकाच्या हाताखाली कामाचा अनुभव घेतात. काही वेळा उत्पादन व्यवस्थापनासाठी विक्रीविषयक अनुभवही आवश्यक असतो.

विक्री व्यवस्थापन

या क्षेत्रातील जवळजवळ सर्वच नोकऱ्यांमध्ये योग्य परिणामकारकता साधण्यासाठी कामातील स्वातंत्र्य अध्याहृत असते. विक्री क्षेत्रात काम करताना स्वतचा कार्यभार आणि त्यासाठीचा वेळ यांचा ताळमेळ साधण्याची जबाबदारी सर्वस्वी विक्री कर्मचाऱ्यांचीच असते. कोणत्याही उद्योगातील विक्री व्यवस्थापनाचे, या व्यक्तींच्या ग्राहक आणि वितरकांशी असलेल्या संबंधांचे महत्त्व ओळखून, विक्री क्षेत्रातील नोकऱ्यांमधील मोबदला बऱ्यापकी आकर्षक असतो. म्हणूनच बरेच उमेदवार या क्षेत्राचा करिअरसाठी विचार करतात.

प्रत्येक उद्योग क्षेत्रात विक्री आणि विक्री व्यवस्थापनाचे कार्य वेगवेगळे असते. उदा.  ग्राहकांच्या अडचणी सोडवणे, वितरकांना मार्गदर्शन व सल्ला देणे. इतर स्पर्धक उद्योजकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नवीन उत्पादनाची ग्राहक, वितरकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करणे. ग्राहकोपयोगी उत्पादनांचे कारखानदार तसेच सेवाक्षेत्रातील उद्योगांनाही विक्री व्यवस्थापकांची गरज असते.

जाहिरात क्षेत्र

जाहिरात क्षेत्रातील करिअरबद्दल तरुणाईमध्ये एक वेगळेच आकर्षण असते. साहजिकच या क्षेत्रात स्पर्धाही खूप आहे. जाहिरात क्षेत्रासंबंधीचे शिक्षण घेताना शैक्षणिक अभ्यासक्रमाला पूरक म्हणून विद्यार्थ्यांनी जाहिरात कंपन्यांतून ‘समर इंटर्नशिप’द्वारा कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला पाहिजे. असा या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला असतो.

जाहिरात क्षेत्रात प्रामुख्याने जाहिरातदार, प्रसारमाध्यमे, जाहिरात कंपन्या येथे नोकरीच्या संधी मिळू शकतात. जाहिरातदार अनेक प्रकारचे असू शकतात. उदा. उत्पादक, किरकोळ मालाचे दुकानदार, सेवा क्षेत्रातील कंपन्या वगरे सुबक, अर्थवाही जाहिराती बनवणे व निरनिराळ्या माध्यमांतून त्या प्रसिद्ध करणे ही सर्व जबाबदारी पेलण्यासाठी बहुतांश वेळा कंपनीचा स्वत:चा असा जाहिरात विभाग असतो. दूरदर्शन, रेडिओ, मासिके, वृत्तपत्रे या प्रसारमाध्यमातून असणाऱ्या जाहिरात विभागातही नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. खुद्द जाहिरात एजन्सीजमधूनही अकाऊंट मॅनेजमेंट, प्रसारण विभाग किंवा उच्च दर्जाच्या क्रियाशील कामांसाठी नोकऱ्या मिळू शकतात.

जाहिरात क्षेत्रातील करिअरच्या सुरुवातीच्या काळात मुख्यत्वेकरून योग्य प्रसारमाध्यमे निवडून त्यावर जाहिरात प्रसारित करणे या कामाने सुरवात होते. असिस्टन्ट अकाऊंट एक्झिक्युटिव्ह या पदांवरील व्यक्ती ग्राहक व जाहिरात कंपनी यांच्यातील दुवा असतो. काही तुरळक जाहिरात कंपन्या महाविद्यालयातील कॅम्पस इंटरव्ह्य़ूद्वारे नेमणुका करतात. 

रिटेिलग

या अंतर्गत व्यवस्थापनाचे दोन पर्याय असतात. (र्मकडाइज मॅनेजमेंट) व्यापारी मालाचे व्यवस्थापन आणि स्टोअर मॅनेजमेंट. खरेदी-विक्रीच्या व्यापार व्यवसायात माल विकत घेणारा महत्त्वाची भूमिका बजावतो. खप होऊ शकेल असा माल निवडणे, त्याची विक्री होण्यासाठी योजना आखणे, मालाची किंमत निश्चित करणे, मालाच्या उत्पादकांबरोबर चर्चा करणे, कंपनीच्या विक्री विभागातील कर्मचाऱ्यांना योग्यरीत्या प्रशिक्षित करणे तसेच प्रतिस्पर्धी व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर नजर ठेवणे. या तुलनेत स्टोअर मॅनेजमेंट या करिअरक्षेत्रात कंपनीतील सर्वच विभागांवर लक्ष ठेवणे तसेच कंपनीत पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा वापर यांकडे लक्ष देणे. सर्व विभागांच्या आíथक प्रगतीवर नजर ठेवणे या जबाबदाऱ्या असतात. करिअर क्षेत्रातील वरिष्ठ पदांवरील  किंवा अनुभवी व्यक्तींना या दोन्ही बाबी एकाचवेळी समर्थपणे हाताळाव्या लागतात.

रिटेिलगमधील करिअरमध्ये शिरकाव करायचा असेल तर सुरुवातीला शिकाऊ उमेदवार म्हणून काम करावे लागते. या व्यक्तींना सामान्यत: व्यवस्थापकीय प्रशिक्षणक्रमांना (मॅनेजमेंट ट्रेिनग प्रोग्राम्स) पाठवले जाते व नंतर त्यांची असिस्टन्ट बायर किंवा असिस्टन्ट डिपार्टमेंट मॅनेजर अशा पदांवर नेमणूक होते. या क्षेत्रात योग्य उमेदवारांची कमतरता असते,  तसेच कर्मचाऱ्याची उत्तम कामगिरी वाढणाऱ्या विक्री आणि नफ्याच्या आकडय़ांवरून सहज पडताळता येते. याचाच अर्थ या क्षेत्रात स्वतला सिद्ध करणे तुलनेने सोपे जाते.

बाजारपेठेचे अभ्यासपूर्ण अवलोकन व तत्संबंधी सल्ला

अनेक कंपन्यांमधून सल्लागार आणि मार्केटिंग संशोधक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी काढलेल्या निष्कर्षांवरूनच त्या त्या उद्योगातील विक्रीविषयक धोरणे ठरवणे सोपे जाते. थोडक्यात, मार्केट रिसर्चर्स आणि कन्सल्टंट हे उद्योगाच्या बाजारविषयक अडचणींचे निराकरण करण्यास मदत करतात. या कार्यक्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बाजारपेठेतील चढ-उतारांचा अभ्यास, त्यांचे संख्याशास्त्रीय पद्धतीने सादरीकरण आणि संगणकीय ज्ञान यांच्या जोडीने ग्राहकांची मानसिकता ओळखण्याचे कसब आणि कंपनीच्या व्यवस्थापनातील वरिष्ठाशी संवाद साधण्याचे कौशल्य अत्यावश्यक असते. चौकस वृत्तीच्या, विश्लेषणात्मक व सकारात्मक विचारांच्या व्यक्ती या क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात. या क्षेत्रात मार्केटिंग रिसर्च कन्सल्टंट फम्र्स, मोठमोठय़ा उद्योजकांशी त्यांच्या उत्पादनासंबंधी बाजारपेठविषयक अभ्यासपूर्ण माहिती देण्याचा करार करतात. काही कंपन्यांमधून स्वतच्या उत्पादनांच्या विक्रीविषयक अभ्यास व त्यानुसार सुधारणा करणारी स्वयंपूर्ण व्यवस्था कार्यरत असते.

मार्केट रिसर्चसाठी लागणाऱ्या सर्वेक्षणाची आखणी करणे, मुलाखती घेणे, बाजारपेठेचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या ग्राहक कंपन्यांना दिलेल्या भेटींचा वृत्तान्त लिहिणे या सगळ्या कार्यपद्धतीतून खूप काही शिकण्यासारखे असते. या व्यतिरिक्त ग्राहकांचे उत्पादन खरेदीविषयक प्रश्न, उत्पादनाची किंमत निश्चित

करणे, बाजारपेठेतील समकक्ष उत्पादकांशी स्पर्धा अशा अनेक विषयांचा समावेश ‘मार्केट रिसर्च’ अंतर्गत होत असतो.

एकंदरीत ‘मार्केटिंग’ संबंधित कार्यक्षेत्रांमध्ये कल्पक आणि आव्हानात्मक कामगिरीसाठी भरपूर वाव आहे, हे निश्चित.     ल्ल

अनुवाद – गीता सोनी

 

 

 

 

Story img Loader