अभियांत्रिकी पदविकाधारक, आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी राज्य पोलीस बिनतारी संदेश विभागात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.
साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (रेडिओ यांत्रिकी) – १९१ पदे. वयोमर्यादा २०-२७ वर्षे.
पोलीस हवालदार (बिनतारी यंत्रचालक) – ४३२ पदे.
वयोमर्यादा १९-२६ वर्षे.
पोलीस हवालदार (वीजतंत्री)- ५२ पदे, वयोमर्यादा १९-२६ वर्षे.
पोलीस शिपाई (कर्मशाळा मदतनीस)-५३ पदे.
वयोमर्यादा १८-२५ वर्षे.
सर्व पदांसाठीची वयोमर्यादा १.१२.२०१५ रोजी गृहित धरण्यात येईल. मागास प्रवर्गासाठी उच्चतम वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिलक्षम आहे.
शैक्षणिक पात्रता :
१) सा.पो. उपनि. (रेडिओ यांत्रिकी) :
अ) खालील विषयांतील अभियांत्रिकी पदविका इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ/ इलेक्टॉनिक्स आणि दूरसंचार/ औद्योगिक इलेक्ट्रॉनिक्स/ संगणक/ माहिती तंत्रज्ञान.
ब) अर्हतेशी संबंधित प्रत्यक्ष कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव.
२) पोलीस हवालदार (बिनतारी यंत्रचालक) :
अ) एसएससी उत्तीर्ण.
ब) खालील ट्रेड्समधील आयटीआय प्रमाणपत्र उत्तीर्ण-
मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स. कम्युनिकेशन सिस्टीम/ यांत्रिकी रेडिओ व दूरचित्रवाणी/ माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स/ वायरलेस मेकॅनिक कम ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक.
(क) अॅप्रेन्टिसशिप ट्रेिनग
प्रमाणपत्र किंवा १ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
३) पोलीस हवालदार (वीजतंत्री):
अ) एसएससी उत्तीर्ण.
ब) वीजतंत्री/ इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र.
क) अप्रेन्टिशिप प्रमाणपत्र किंवा
१ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव किंवा
अ) बारावी उत्तीर्ण ब) पीडब्ल्यूडी वायरमन लायसन्स ग्रेड- कक प्रमाणपत्र क) २ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
४) पोलीस हवालदार (कर्मशाळा मदतनीस) :
अ) एसएससी उत्तीर्ण.
ब) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) खालील ट्रेड्समधील प्रमाणपत्र- १. रंगारी
२.जोडारी
३. मेकॅनिक रेडिओ आणि टेलिव्हिजन ४. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा
५. सुतारकाम, ६. पत्रे कारागीर
७. कॉम्प्युटर हार्डवेअर.
पद क्रमांक (्र) ते (्र५)साठी अप्रेन्टिसशिप प्रमाणपत्र अथवा
१ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
पद क्रमांक (५) ते (५्र)साठी अनुभवाची अट नाही.
शारीरीक पात्रतेच्या अटी –
(सर्व पदांसाठी)
उंची पुरुषांसाठी- १६३ सेमी. महिलांसाठी- १५३ सेमी.
पुरुष छाती ७९ ते ८४ सेमी.
परीक्षा शुल्क – खुला प्रवर्ग रु. ५५०, मागास प्रवर्ग रु. ४५०.
निवड प्रक्रिया – अ) ऑनलाइन परीक्षा – माध्यम इंग्रजी. यामध्ये गणित, संगणक ज्ञान, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, सामान्य शास्त्र व संबंधित विषयातील तांत्रिक ज्ञान याचा समावेश असेल. कालावधी १०० मिनिटे.
ब) शारीरिक मोजमापे व प्रमाणपत्र पडताळणी.
सूचना- मुलाखत प्रक्रिया शासन निर्णयाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे.
परिवीक्षाधीन कालावधी २ वर्षांचा (नियुक्तीच्या दिनांकापासून)
अर्ज करण्यासाठी..
अर्ज खालील संकेतस्थळांवर ६६६.ेंँस्र्’६्र१ी’ी२२.ॠ५.्रल्ल किंवा ेंँं१ीू१४्र३ेील्ल३.ेंँंल्ल’्रल्ली.ॠ५.्रल्ल ऑनलाइन पद्धतीने दिनांक ६ जानेवारी २०१६ पर्यंत करावा.
उमेदवारांना अडचण भासल्यास महाऑनलाइन दूरध्वनी क्रमांक ०२२-६१३१६४०० या क्रमांकावर सकाळी साडेनऊ ते साडेसात या वेळेत संपर्क साधावा.
– सुहास पाटील