भारतीय विद्यार्थ्यांना आणि प्रशिक्षित (Highly skilled) व्यक्तींना कॅनडियन सरकारने केलेल्या नवीन नियमांमुळे कॅनडामध्ये स्थायिक होणे शक्य होणार आहे. कॅनडियन सरकारने नुकतेच यासंबंधीच्या नियमात बदल करून ते अधिक शिथिल केले आहेत. या बदलाचा फायदा कॅनडामध्ये जाऊ इच्छिणाऱ्या लाखो तरुणांना तसेच अनेक क्षेत्रांतील प्रशिक्षित कुशल व्यक्तींना होईल,   असा अंदाज उमाकांत तासगावकर यांनी व्यक्त केला आहे.
 कॅनडियन सरकारचा ‘कॅनडा एक्सपिरियन्स क्लास’ हा ‘इमिग्रेशन प्रोग्राम (स्थलांतर कार्यक्रम)’ कॅनडा सरकारने सप्टेंबर २००८ साली जाहीर केला होता. परंतु, या नियमांमध्ये या वर्षी आकर्षक बदल करण्यात आले असून त्यामुळे १० हजार लोकांना कॅनडात कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळू शकेल. भारतीय विद्यार्थ्यांना आणि कुशल तंत्र प्रशिक्षित व्यक्तींना याचा प्रामुख्याने फायदा होऊ शकेल. यामध्ये भारतीय आयटी तज्ज्ञ, इंजिनीअर्स, मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचारी तसेच इतर अनेक क्षेत्रांतील व्यक्तींना याचा लाभ घेता येईल.
जानेवारी २०१३ पासून भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडामध्ये एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर एक वर्षांचे वर्क परमिट (काम करण्याचा परवाना) मिळेल आणि कॅनडात एकूण दोन वष्रे झाली की त्यांना ‘कॅनडा एक्सपिरियन्स क्लास’ या कार्यक्रमांतर्गत कॅनडाकरिता कायमस्वरूपी राहण्यासाठी (Permanant Residency) अर्ज करता येईल. एरवी भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडामध्ये दोन किंवा तीन वष्रे शिक्षण घ्यावे लागत असे आणि अर्थातच तेवढे शुल्क आणि निवासाचा खर्च करावा लागत असे. नवीन नियमांमुळे एक वर्षांच्या प्रशिक्षणानंतरही वर्क परमिट मिळणार असल्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी आणि खास करून मराठी विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यायला हवा, अशी माहितीही उमाकांत तासगावकर यांनी दिली.    
२०११ साली कॅनडामध्ये २५ हजार भारतीय विद्यार्थी आणि १६ हजार तात्पुरते कर्मचारी (Temperary Work Permit) कॅनडामध्ये होते. कॅनडामधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कॅनडामधील एकूण विद्यार्थी संख्येपकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि २०११ साली सुमारे १२ हजार भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडामध्ये प्रवेश घेतला. १० हजार ही निर्धारित मर्यादा संपण्याआधीच भारतीय तरुणांनी याचा लाभ घ्यायला हवा.       

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा