सैन्यदलाच्या अधिकारी प्रशिक्षण केंद्र चेन्नई येथे शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन योजनेअंतर्गत महिलांसाठी संधी-  अर्जदार महिला कुठल्याही विषयातील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोमर्यादा : अर्जदाराचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जून व नोव्हेंबर प्रकाशित होणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत.
छात्रसेना प्रशिक्षित महिला उमेदवारांना सैन्यदलात संधी- अर्जदार महिला कुठल्याही विषयातील पदवीधर असाव्यात. त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० टक्के असावी व त्यांनी राष्ट्रीय छात्र सेनेची ‘बी’ व ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारी सैन्यदलाची जाहिरात पाहावी व त्यानुसार पात्रताधारक अर्जदारांनी संबंधित छात्र सेना मुख्यालयात अर्ज करावेत.
सैन्यदलात कायदा विषयातील पदवीधर महिला उमेदवारांना संधी- अर्जदार महिला पदवीधर व त्यानंतर कायदा विषयातील पदवीधर असाव्यात व त्यांच्या गुणांची टक्केवारी कमीत कमी  ५ ५ टक्के असून त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोमर्यादा : २१ ते २७ वर्षे.
अधिक माहिती व तपशील : अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जून व डिसेंबर महिन्यात प्रकाशित होणारी अ‍ॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत.
अधिकारी प्रशिक्षण केंद्र चेन्नई येथे महिलांना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात संधी- अर्जदार महिला इंजिनीअरिंगमधील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
अधिक माहिती व तपशील : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी साधारणत: जानेवारी व जून महिन्यात प्रकाशित होणारी अ‍ॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल रिक्रुटिंगची जाहिरात पाहावी व त्यानुसार अर्ज करावेत.
विशेष सूचना : वरील संधींच्या संदर्भातील जाहिराती निवडक प्रमुख वृत्तपत्रांशिवाय एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये प्रकाशित होत असतात.
याशिवाय इच्छुक व पात्रताधारक महिलांनी त्यांना सैन्यदलात अधिकारी पदासह आपले करिअर सुरू करायचे असल्यास सैन्यदलाच्या दूरध्वनी
क्र. ०११- २६१७३२१५ अथवा २६१७५४७३ वर संपर्क साधावा अथवा wwwjoinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.   

Story img Loader