हॉस्पिटॅलिटी फर्म OYO ने १९ ऑगस्ट रोजी सांगितले की ते पुढील सहा महिन्यांत ३०० टेक्नॉलॉजी प्रोफेशनल एंट्री-लेव्हलमध्ये ते सिनिअर लिडरशीप कामावर घेण्याचा विचार करीत आहे. OYO ने एका निवेदनात म्हटले आहे की, मशीन लर्निंग, डेटा इंजिनीअरिंग आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, अँड्रॉइड आणि आयओएस डेव्हलपर्स या क्षेत्रांमध्ये मुख्य कौशल्य आणि अनुभव असलेल्या पूर्ण-स्टॅक संघांची नेमणूक करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

कंपनी अनेक नवकल्पना सादर करण्यास सज्ज आहे आणि तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वचनबद्ध आहे. कंपनी हॉटेल मालकांसाठी महसूल अधिक अनुकूल करत आहे  तर ग्राहकांसाठी कस्टमर अनुभव सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. निवेदनात म्हटले आहे की, लहान आणि मध्यम आकाराच्या हॉटेल्स आणि घरांसाठी ग्लोबल फुल-स्टॅक टेक्नॉलॉजी प्रदात्यामध्ये OYO च्या रूपांतरणाला गती देण्यासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

कॉलेज, युनिव्हर्सिटीजमधूनही भरती

कंपनीने ५० मिड-लेव्हल टेक टॅलेंट आणि भारतातील टॉप युनिव्हर्सिटीजमधून सुमारे १५० कॅम्पस रिक्रूट्स ऑनबोर्डिंग सुरू केले आहे. “आम्हाला विविध तांत्रिक प्रतिभांचा आशीर्वाद मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक नवीन उज्ज्वल डोक टेबलावर आकर्षक कल्पना आणेल आणि शेवटी तंत्रज्ञानाचे पहिले जागतिक व्यासपीठ तयार करण्याच्या आमच्या ध्येयाकडे वाटचाल करेल. जे भविष्यासाठी खरोखरच एक लेव्हल सेट करेल.” असं OYO चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, अंकित माथुरिया म्हणाले.

OYO हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी तंत्रज्ञान उत्पादनांचा संच वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच्या टेक स्टॅकमध्ये OYO, OYO OS, Co-OYO सारखे ग्राहक आणि भागीदार अॅप्स, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता(Artificial Intelligence), मशीन लर्निंग आणि अॅनालिटिक्सच्या नेतृत्वाखालील अनेक अनुप्रयोग जसे की टेरिफ मॅनेजर, OTA (ऑनलाइन ट्रॅव्हल एजंट्स) नावाचे डायनॅमिक प्राइसिंग अॅप ट्राफिक व्यवस्थापक, OYO, परफॉर्मन्स मॅनेजमेंट, यो! चॅटबॉट असे अॅप समाविष्ट आहे.

युनिकॉर्न टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टकडून ९ अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनात अज्ञात निधी उभारण्याच्या प्रगत टप्प्यात आहे. जुलैमध्ये, जेव्हा OYO ने जागतिक संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ६६०  दशलक्षच्या टर्म लोन B (TLB) निधीची घोषणा केली, तेव्हा ते म्हणाले की, या निधीचा वापर मागील कर्ज फेडण्यासाठी, व्यवसाय मजबूत करण्यासाठी आणि उत्पादन तंत्रज्ञानातील गुंतवणुकीसह इतर व्यावसायिक हेतूंसाठी केला जाईल.