नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट, कर्नाल (हरियाणा) येथे दुग्धोत्पादन व दुग्ध-व्यवसाय विषयांतर्गत उपलब्ध असणाऱ्या संशोधनपर पीएच.डी.साठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार विद्यार्थ्यांनी दुग्ध व्यवसाय व दुग्धोत्पादन क्षेत्राशी संबंधित अशा डेअरी मायक्रोबायोलॉजी, डेअरी केमिस्ट्री, डेअरी टेक्नॉलॉजी, डेअरी इंजिनीअरिंग, अ‍ॅनिमल बायोकेमिस्ट्री, अ‍ॅनिमल जिनॅटिक्स अँड ब्रीडिंग, अ‍ॅनिमल न्युट्रीशन, कृषी व्यवस्थापन, कृषी विस्तार वा पशुविज्ञान विषयातील पदव्युत्तर पात्रता चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रावर १० मे २०१३ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पदव्युत्तर परीक्षेतील गुणांची टक्केवारी व लेखी परीक्षेतील गुणांकांच्या आधारे त्यांची संबंधित विषयातील संशोधनपर शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास १२०० रु.चा आयसीएआर युनिट, एनडीआरआय- कर्नाल यांच्या नावे असणारा व कर्नाल येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंतीअर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहितीसाठी संपर्क : या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूटच्या http://www.ndri.res.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज अ‍ॅकॅडॅमिक कोऑर्डिनेटर, युनिव्हर्सिटी ऑफिस, नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिटय़ूट, कर्नाल (हरियाणा) १३२००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २० मार्च २०१३.
दुग्ध व्यवसाय वा कृषी क्षेत्राशी संबंधित विषयातील ज्या पदव्युत्तर पात्रताधारकांना संशोधनपर पीएच.डी. करायची असेल अशांनी या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करावी.    career.vruttant@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा