उत्तर भारतीय मदानी प्रदेश
हिमालयाच्या दक्षिणेकडे आणि भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे उत्तर भारतीय मदानी प्रदेश विस्तारलेला आहे. उत्तर भारतीय मदानी प्रदेश हा जगातील सर्वात मोठा गाळाचा मदानी प्रदेश असुन पश्चिमेकडे सिंधू नदीच्या मुखापासून पूर्वेकडे गंगा नदीच्या मुखापर्यंत साधारणत: ३२०० कि.मी. पसरलेला हा मदानी प्रदेश आहे. भारतामध्ये याची लांबी सुमारे २४०० किमी आहे. या भारतीय महामदानाचे क्षेत्रफळ, ७.८ लाख चौरस किमी इतके आहे. हे मदान प्रामुख्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आलेल्या गाळांमुळे तयार झालेले आहे. या मदानात पुढील प्रकारची भुरूपे आढळून येतात- भाबर मदान, तराई मदान, खादर, भांगर .
० भाबर मदान – शिवालिक टेकडय़ांच्या पायथ्याशी दक्षिणेकडे भाबर मदान असून हे मदान दगड-गोटय़ांनी तयार झालेले आहे. या ठिकाणी खडकांमध्ये असलेल्या सच्छिद्रतेमुळे बरचेसे पाण्याचे प्रवाह लुप्त होतात. यामुळे पावसाळा वगळता या प्रदेशात नद्यांचे प्रवाह कोरडे असतात. कृषीसाठी हा प्रदेश अनुकूल नाही.
० तराई मदान – िहदी भाषेत तर याचा अर्थ ओला असा होता. भाबर पट्टय़ात भूमिगत झालेल्या नद्यांचे प्रवाह तराई प्रदेशात पुन्हा वर येतात. यामुळे हा प्रदेश दलदलीचा झाला आहे. या प्रदेशात घनदाट वने आहेत. भाबर मदानाच्या दक्षिणेकडे १५ ते ३० किमी लांबीचा हा समांतर पट्टा आहे.
० भांगर मदान – जुन्या गाळामुळे जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला भांगर असे म्हणतात. सर्वसाधारणपणे भारतीय मदानी प्रदेशातील अत्यंत सुपीक असा हा प्रदेश आहे.
० खादर मदान – नद्यांच्या प्रवाहांमुळे नवीन गाळाचा जो प्रदेश तयार झालेला आहे त्याला खादर असे म्हणतात. खादर भूमीत वाळू, मृत्तिका आणि चिखल आढळतो. खादर मदानातील बरीचशी जमीन लागवडीखाली आलेली आहे. या जमिनीत तांदूळ, गहू, मका, तेलबिया यांची लागवड केली जाते.
उत्तर भारतीय मदानांची प्रादेशिक विभागणी खालीलप्रकारे केली जाते – राजस्थान मदान, पंजाब – हरियाणा मदान, गंगा मदान, ब्रह्मपुत्रा मदान.
० राजस्थान मदान – यालाच थरचे वाळवंट असे देखील म्हणतात. भारतामध्ये थरच्या वाळवंटाचे क्षेत्र सुमारे १.७५ लाख चौ.कि.मी इतके आहे. या वाळवंटाची विभागणी खालीलप्रकारे करतात- मरूस्थळी, राजस्थान बगर.
६ मरूस्थळी – वाळवंटाच्या मुख्य प्रदेशाला मरूस्थळी संबोधतात. यात वाळूच्या टेकडय़ा आढळतात. सर्वसाधारणपणे मरूस्थळीचा पूर्व भाग हा खडकाळ आहे तर पश्चिम भाग हा वाळूच्या स्थलांतरित टेकडय़ांनी व्यापलेला आहे.
६ राजस्थान बगर- पूर्वेला अरवली पर्वताच्या कडेपासून पश्चिमेस २५ सेंमी पर्जन्य रेषेदरम्यान राजस्थान बगर विस्तारलेला आहे. बगर हा सपाट पृष्ठभागाचा आहे. अरवली पर्वतातून वाहणारे लहान प्रवाह या बगरमधून वाहतात. या प्रदेशात काही वाळूच्या टेकडय़ादेखील आहेत.
सांभर सरोवर हे सर्वात मोठे व वैशिष्टय़पूर्ण सरोवर आहे. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
० पंजाब-हरियाणा मदान – पंजाब – हरियाणा मदानाचे क्षेत्रफळ १.७५ लाख चौ.किमी. इतके आहे. यांतील पंजाब मदानामधून झेलम, चिनाब, रावी, बियास व सतलज या पाच नद्या वाहतात. दोन नद्यांच्या दरम्यानच्या भूमीला दोआब असे म्हणतात.
० गंगा मदान- भारतीय मदानी प्रदेशातील हे सर्वात मोठे क्षेत्र आहे. याची पश्चिम-पूर्व लांबी १४०० किमी असून याची सरासरी रुंदी ३०० किमी इतकी आहे. गंगा मदानाचे उपविभाजन खालीलप्रकारे केले जाते- अ) ऊध्र्व गंगा मदान ब) मध्य गंगा मदान क) निम्न गंगा मदान.
० ब्रह्मपुत्रा मदान- या मदानाला आसाम मदान असेदेखील म्हणतात. ब्रह्मपुत्रा मदानाची पूर्व-पश्चिम लांबी ७२० किमी तर उत्तर दक्षिण लांबी जवळजवळ १०० किमी इतकी आहे. भारतीय महामदानाच्या पूर्वेकडील भाग ब्रह्मपुत्रा मदान म्हणून ओळखला जातो. हे मदान ब्रह्मपुत्रा नदीमुळे तयार झालेले आहे.
ब्रह्मपुत्रा व तिच्या उपनद्या – ही जगातील मोठय़ा नद्यांपकी एक नदी असून ती तिबेटमधून दक्षिणेकडे आसाममधून बांगलादेशात प्रवेश करते. ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रात माजुली बेट आहे. भारतातील नदी बेटांमध्ये याचा प्रथम
क्रमांक लागतो.
० भारतीय द्वीपकल्पीय पठार- भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा सर्वसाधारण आकार हा अनियमित व त्रिकोणाकृती असून उत्तर भारतातील महामदानाच्या दक्षिणेपासून कन्याकुमारीपर्यंत ही पठारे पसरलेली आहेत. या पठाराची उत्तर-दक्षिण लांबी सुमारे १६०० किमी तर पश्चिम-पूर्व रुंदी सुमारे १४०० किमी इतकी आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठाराचे भौगोलिक विभाग पुढीलप्रमाणे आहेत – मध्यवर्ती उंचवटय़ाचा प्रदेश, पूर्वेकडील पठार, दख्खनचे पठार, पश्चिमघाट, पूर्वघाट.
० मध्यवर्ती उंचवटय़ाचा प्रदेश- मध्यवर्ती उंचवटय़ाच्या प्रदेशात काही पर्वत, टेकडय़ा, पठारे, दऱ्या यांचा समावेश होतो.
* अरवली पर्वत – हा भारतातील सर्वात जुना वलित पर्वत आहे. याचा विस्तार दिल्लीपासून उत्तर गुजरातपर्यंत पालमपूपर्यंत पसरलेला आहे. सुरुवातीला अरवली पर्वत उंच होता. आता हवा, पाणी यांचा परिणाम होऊन याचा फार थोडा भाग शिल्लक राहिला आहे. म्हणून याला रिलिक्ट माऊंटन (Relict) असेदेखील म्हणतात. अरवली पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर गुरुशिखर हे आहे.
* पूर्व राजस्थानच्या उंचवटय़ाचा प्रदेश – अरवलीच्या पूर्वेला राजस्थानच्या उंचवटय़ाचा प्रदेश आहे. या प्रदेशाची उंची २८० ते ५०० मी. इतकी आहे. पूर्व राजस्थानच्या उंचवटय़ाच्या प्रदेशात चंबळ खोऱ्याच्या सखल प्रदेशाचा समावेश होतो. चंबळ नदीचे खोरे म्हणजे भारतामधील अपक्षरण कार्यामुळे होणारी झीज किती प्रमाणात होते याचे एक उदाहरण आहे.
* बुंदेलखंड उंचवटय़ाचा प्रदेश – बुंदेलखंड उंचवटय़ाच्या प्रदेशाची उत्तर सरहद्द यमुना नदी तर दक्षिणेस िवध्य पर्वत आहे व यांच्या सीमा वायव्येस चंबळ आणि आग्नेय दिशेला पन्ना- अजयगड यांनी निश्चित केलेल्या आहे. हा प्रदेश सपाट तसेच उंच-सखल आहे.
* माळवा पठार – या पठाराची निर्मिती लाव्हा रसापासून झालेली आहे. या पठाराचा बराच भाग काळ्या मृदेचा आढळतो. माळव्या पठाराची पश्चिम-पूर्व लांबी ५३० किमी तर उत्तर-दक्षिण रुंदी ३९० किमी इतकी आहे.
* िवध्य पर्वत – उत्तरेकडे गंगेच्या गाळाचा मदानी प्रदेश दक्षिणेकडे दख्खनचा पठार या दरम्यान िवध्य श्रेणी आहे. पूर्वेकडे िवध्य पर्वतरांगा भारनेर टेकडय़ांमध्ये विलीन होतात.
* छोटय़ा नागपूरचे पठार – भारतीय द्वीपकल्पीय पठाराच्या ईशान्येकडील भाग हा छोटय़ा नागपूरच्या पठाराने तयार झालेला आहे. छोटय़ा नागपूर पठारात झारखंड, छत्तीसगड, ओरिसा, आंध्र प्रदेशाचा ईशान्य भाग तसेच पश्चिम बंगालचा पुरोलिया जिल्हा यांचा समावेश होतो. या पठाराचे क्षेत्रफळ ८६२३९ चौ. किमी इतके आहे. या पठारावरून दामोदर सुवर्णरेखा, उत्तर कोयल, दक्षिण केयल इ. नद्या वाहतात. या प्रदेशांत खनिज संपत्ती मोठय़ा प्रमाणात आढळते, म्हणून या पठाराला भारताचे ऱ्हुर (Ruhr of India) असे म्हणतात. या पठारात अनेक लहान-मोठे पठारे आढळतात.
* मेघालय पठार – यालाच शिलाँग पठार असेदेखील म्हणतात. हे पठार द्वीपकल्पीय पठाराच्या मुख्य भागापासून गारो – राजमहल िखडमुळे मेघालय पठारापासून वेगळे झाले आहे. मेघालय पठाराचे क्षेत्रफळ सुमारे ३५ हजार चौ. किमी. आहे. या पठाराचा उतार उत्तरेकडे ब्रह्मपुत्रा दरीत तर दक्षिणेकडे सुरमा आणि मेघना दरीत आहे. या पठाराची पश्चिम सरहद्द बांगलादेशासोबत जोडते. या पठारावर गोरा- खाँसी व मिकिर टेकडय़ा आढळतात.
* दख्खनचे पठार – दख्खनच्या पठाराची निर्मिती ही लाव्हा रसापासून झालेली आहे. भारतीय द्वीपकल्पीय पठाराचा हा सर्वात मोठा भौगोलिक विभाग आहे. दख्खनच्या पठाराचे- उत्तर दख्खनचे पठार व दक्षिण दख्खनचे पठार असे दोन उपविभाग केले जातात.
उत्तर दख्खनचे पठार – उत्तर दख्खनच्या पठारात सातपुडा पर्वतरांगा व महाराष्ट्राचे पठार यांचा समावेश होतो.
१. सातपुडा पर्वतरांगा – यामुळे नर्मदा व तापीचे खोरे एकमेकांपासून अलग झालेले आहेत. सातपुडा पर्वतरांगेत धुपगड हे सर्वात उंचीचे शिखर आहे. सातपुडा पर्वतरांगेचा पश्चिम भाग हा दख्खनच्या पठाराचा असून या पर्वताची रुंदी २० ते ४० किमी इतकी आहे तर ९०० मी. उंचीपेक्षा जास्त काही शिखरे आहेत. उदा. तोरणमाळ (१,१५० मी.), अस्तंभा डोंगर (१,३२५ मी.) सातपुडा पर्वताच्या पूर्व भागास मकल पठार असे म्हणतात.
grpatil2020@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा