विषय निवडताना..
एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एमबीएचा अभ्यास, विषयांची निवड यासंदर्भात माहिती देणारे पाक्षिक सदर आजपासून..
एमबीएसाठी विषयांचे पर्याय निवडताना स्वत:ची आवड, विषयाबद्दलचे ज्ञान तसेच उपलब्ध संधी या सर्वाचा विचार करणे गरजेचे असते.
रतीय अर्थव्यवस्थेची वाढ गेल्या काही महिन्यांपासून काहीशी मंदावली असली तरी कामकाजाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील संस्थांना प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज नेहमीच भासणार आहे. आज एम.बी.ए. अभ्यासक्रमाच्या अनेक जागा रिक्त राहतात, हे चित्र दिसत असले तरी याचे मूळ कारण एम.बी.ए. अभ्यासक्रम हे नसून तो योग्य रीतीने पूर्ण केला जात नाही, हे आहे. विद्यार्थीवर्गाचा या अभ्यासक्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्यास या क्षेत्राचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे.
एमबीए अभ्यासक्रम योग्य रीतीने पूर्ण करण्याची पहिली पायरी म्हणजे या अभ्यासक्रमाच्या दोन वर्षांत शिकविल्या जाणाऱ्या विविध विषयाची अत्यंत सखोल तयारी विद्यार्थ्यांनी करायला हवी.
एम.बी.ए. अभ्यासक्रमाची रचना सर्वसाधारणपणे अशी असते की, पहिल्या वर्षी सर्व विषय अनिवार्य आणि द्वितीय वर्षांपासून स्पेशलायझेशनची सुरुवात होते. अर्थात यालाही काही अपवाद आहेत. उदा. काही अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षांपासूनच स्पेशलायझेशनची सुरुवात होते. जसे की, एम. बी. ए. (एच. आर.), एम.बी.ए. (मार्केटिंग), एम. बी. ए. (इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी) इ.
पहिल्या वर्षांच्या विषयाचे अभ्यासक्रम हे साधारणपणे पायाभूत स्वरूपाचे असतात. यानंतर द्वितीय वर्षीच्या स्पेशलायझेशनची निवड करायची असते.
स्पेशलायझेशनची निवड करताना अनेक पर्याय उपलब्ध असतात. त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता, याचा विचार प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने करायला हवा. यासंबंधीचा पर्याय निवडताना स्वत:ची आवड, विषयाचे ज्ञान तसेच उपलब्ध संधी या सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे असते. विषयाची आवड व मेहनत घेण्याची तयारी असेल तर प्रत्येक स्पेशलायझेशनमध्ये समान संधी उपलब्ध आहेत, हेही लक्षात येत जाते. मात्र, यासाठी विषयाचे सखोल ज्ञान संपादन करणे आवश्यक ठरते.
स्पेशलायझेशनच्या बाबतीत प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळे नियम आहेत. काही विद्यापीठांमधून स्पेशलायझेशनचे दोन विषय निवडता येतात. उदा. मार्केटिंग व फायनान्स किंवा फायनान्स आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी इ. तसेच स्पेशलायझेशनच्या पेपर्सचे स्वरूपही प्रत्येक विद्यापीठामध्ये वेगवेगळे असू शकते. स्पेशलायझेशनमध्ये सर्वसाधारणपणे खालील पर्याय उपलब्ध आहेत-
१)विपणन व्यवस्थापन (मार्केटिंग मॅनेजमेंट)- या स्पेशलायझेशनमध्ये मार्केटिंग रिसर्च, ग्राहक प्रतिसाद, सव्र्हिसेस मार्केटिंग, इंटरनॅशनल मार्केटिंग, इंटिग्रेटेड मार्केटिंग कम्युनिकेशन आदी प्रमुख विषय असतात. तसेच मार्केटिंगविषयक कायदे, एक्स्पोर्ट डॉक्युमेन्टेशन इ. विषयांचासुद्धा समावेश होतो.
२) वित्तीय व्यवस्थापन : जसजसे उद्योगविश्व विस्तारत जाते, तसतशी वित्तीय क्षेत्राचे महत्त्व व भूमिका अधिकाधिक महत्त्वाची होत जाते. वित्तीय व्यवस्थापन म्हणजेच फायनान्स मॅनेजमेंट या स्पेशलायझेशनमध्ये कॉर्पोरेट फायनान्स, फायनान्स क्षेत्रातील रेग्युलेटरी पद्धत, वेगवेगळे कायदे, मर्चन्ट बँकिंग व फायनान्शिअल सव्र्हिसेस, आंतरराष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर इ. विभागांचा समावेश होतो.
३) ऑपरेशन्स मॅनेजमेंट : प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ऑपरेशन्स मॅनेजमेंट हे स्पेशलायझेशन उपयुक्त आहे. यातील प्रमुख विषय म्हणजे ऑपरेशन्स स्ट्रेटेजी, वल्र्ड क्लास मॅन्युफॅक्चरिंग, टोटल क्वॉलिटी मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, लीन मॅन्युफॅक्चरिंग इ.
४) ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट, ह्य़ुमन रिसोर्स मॅनेजमेंट हेसुद्धा एक महत्त्वाचे स्पेशलायझेशन आहे. यामध्ये कामगारविषयक कायदे, औद्योगिक संबंध, कर्मचाऱ्याच्या कामाचे मूल्यमापन आदी प्रमुख विषयांचा समावेश होतो.
५)इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट : सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उद्योग व्यवसाय चालवताना कशा प्रकारे व्यवस्थापन करावे याची जाण येण्यासाठी या स्पेशलायझेशनचा उपयोग होतो. यामध्ये शिकवले जाणारे प्रमुख विषय म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस एनव्हायरन्मेंट.
६) सप्लाय चेन मॅनेजमेंट : उद्योगविश्वातील पुरवठा साखळी म्हणजेच सप्लाय चेन. या कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन या स्पेशलायझेशनची सोय करण्यात आली आहे. यामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक सप्लाय चेन मॅनेजमेंट आदी प्रमुख विषयांचा समावेश होतो.
७) रुरल अॅण्ड अॅग्रि बिझनेस मॅनेजमेंट : आपल्या देशातील शेती क्षेत्राचे तसेच शेतीवर आधारित उद्योगांचे आणि ग्रामीण भागाच्या विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन या स्पेशलायझेशनचा अभ्यासक्रम ठरवण्यात आला आहे. यामधील प्रमुख विषय म्हणजे रुरल मार्केटिंग, रुरल क्रेडिट अॅण्ड फायनान्स, अॅग्रिकल्चर मॅनेजमेंट इ.
८)फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट : कित्येक वेळा लहान उद्योग, कौटुंबिक पातळीवर चालवले जातात. मॅनेजमेंट हे केवळ बहुराष्ट्रीय उद्योगानांच आवश्यक आहे, असे नसून अगदी लहान उद्योगांनासुद्धा त्याची तेवढीच गरज आहे हे ओळखून काही विद्यापीठांमध्ये हे स्पेशलायझेशन उपलब्ध आहे. यामध्ये फॅमिली बिझनेस मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स, इनोव्हेशन मॅनेजमेंट इ. विषय शिकवले जातात.
९) टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट : तुलनेने नवीन असे हे स्पेशलायझेशन काही विद्यापीठांमध्ये सुरू करण्यात आले आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन संबंधातील काही प्रमुख विषय शिकले जातात.
विविध स्पेशलायझेशनच्या विषयांची ओळख आजच्या प्रारंभीच्या लेखामध्ये करून दिली आहे. यानंतर प्रत्येक विशेषीकरणातील प्रमुख विषय व उपलब्ध संधी यांचा क्रमश: सविस्तर विचार करू. nmvechalekar@yahoo.co.in
तयारी एमबीएची!
एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एमबीएचा अभ्यास, विषयांची निवड यासंदर्भात माहिती देणारे पाक्षिक सदर आजपासून.. एमबीएसाठी विषयांचे पर्याय निवडताना स्वत:ची आवड, विषयाबद्दलचे ज्ञान तसेच उपलब्ध संधी या सर्वाचा विचार करणे गरजेचे असते.
First published on: 03-06-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preparing for mba