उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे.
राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वष्रे व जास्तीत जास्त २५ वष्रे (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वष्रे शिथिल) असावे. शैक्षणिक अर्हता- बारावी उत्तीर्ण (उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा)
शारीरिक पात्रता- महिला संवर्गासाठी उंची किमान १५५ सें.मी.तर पुरुष संवर्गासाठी उंची किमान १६५ सें.मी. असावी. नक्षलग्रस्त भागातील उमेदवार आणि खेळाडू यांना उंचीत अडीच सें.मी.ची शिथिलता दिलेली आहे. त्याचप्रमाणे शारीरिक मोजमापाचे आणखीही काही निकष आहेत. पोलीस बॅन्ड पदांसाठी वयोमर्यादा ही १८ वष्रे ते २५ वष्रे असून शासन निर्णयानुसार पाच वष्रे मागासवर्गीयांसाठी शिथिल आहे. परंतु त्यांची शैक्षणिक अर्हता ही दहावी पास (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) पोलीस बॅन्ड पदासाठी शारीरिक पात्रतेचे निकष वेगळे आहेत. मात्र, वाद्याची माहिती आणि वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
राज्य पोलीस शिपाई पदासाठी विद्यार्थ्यांना २०० गुणांच्या लेखी चाचणीला सामोरे जावे लागते. त्यात १०० गुण मदानी चाचणीसाठी तर १०० गुण लेखी चाचणीसाठी असतात. १०० गुणांची मदानी चाचणीची गुणविभागणी पुरुष व महिला संवर्गानुसार खालीलप्रमाणे होते.
शारीरिक चाचणी (महिलांसाठी)- धावणे (तीन कि.मी.) – २५ गुण, धावणे (१०० मीटर) – २५ गुण, गोळाफेक (४ किलो वजन) – २५ गुण, लांब उडी – २५ गुण.    शारीरिक चाचणी (पुरुषांसाठी)- अ) धावणे (पाच कि.मी.) – २० गुण., धावणे (१०० मीटर) – २० गुण,  गोळाफेक (७.२६० किलो वजन)- २० गुण, लांब उडी- २० गुण. पुलअप्स – २० गुण, मदानी चाचणीत चांगले गुण मिळविण्यासाठी सराव आणि फिटनेस महत्त्वाचा ठरतो.
लेखी परीक्षा – शारीरिक पात्रता चाचणीत किमान ५० % गुण मिळवणारे उमेदवार १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरतात.
परीक्षेचा अभ्यासक्रम- पोलीस शिपाई पदासाठी अभ्यासक्रमात अंकगणित, सामान्यज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी व मराठी व्याकरण या चार घटकांचा समावेश असतो. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बहुपर्यायी असून त्यात १०० प्रश्न दिलेले असतात. वेळ – ९० मिनिटे. हा अभ्यासक्रम दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.
१) अंकगणित – लेखी परीक्षेत या घटकावर साधारणत: २० प्रश्न अपेक्षित असतात. अंकगणित अभ्यासताना पाढे, सूत्र, क्षेत्रफळ, घनफळ व महत्त्वाचे सूत्रे, संख्याज्ञान व त्यावरील क्रिया, दशांश अपूर्णाक व व्यवहारी अपूर्णाक, घन व घनमूळ, घातांक, वर्ग व वर्गमूळ, काळ, काम व वेग, लसावी व मसावी, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, शेकडेवारी, नफा-तोटा, सरासरी इत्यादी घटकांचा अभ्यास करावा.
२) सामान्यज्ञान व चालू घडामोडी- या घटकावर साधारणत: ४० प्रश्न अपेक्षित आहेत. त्यात भारत व जागतिक भूगोलासंदर्भातील प्रश्नही विचारले जातात.  
देशाच्या इतिहासासंबंधातील प्रश्नांची संख्या कमी असली तरीही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना व व्यक्ती, आंदोलने, चळवळी, अहवाल, वृत्तपत्रे, समाजसुधारक यांचा अभ्यास करावा.
विज्ञान घटकात महत्त्वाचे शोध- संशोधक, अणुशक्ती आयोग व अणुऊर्जा केंद्रे, संशोधन संस्था, संरक्षण क्षमता, मानवी आहारातील घटक, मानवी श्वसन संस्था, नियोजित अवकाश कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र चाचण्या याकडे लक्ष पुरवावे.
३) बुद्धिमत्ता चाचणी-  बुद्धिमत्ता चाचणी विषयाच्या अभ्यासासाठी सराव महत्त्वपूर्ण ठरतो. परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न अंकमालिका, अक्षरमालिका, अक्षरमाला, सांकेतिक लिपी, सांकेतिक चिन्ह, भाषिक संकेत, सम आणि व्यस्त संबंध, वेळ, दिशा, रांगेतील क्रम, नातेसंबंध यावर बेतलेले असतात.
४) मराठी व्याकरण-  पोलीस शिपाईपदासाठी घेण्यात येणाऱ्या लेखी परीक्षेमध्ये सुमारे २० प्रश्न विचारले जातात.
उमेदवारांची निवड (विविध संवर्ग व आरक्षणानुसार)-  निवड करताना मदानी चाचणीचे १०० गुण व लेखी परीक्षेचे १०० गुण मिळून २०० गुणाच्या तुलनेत विचार केला जातो.  निवड झालेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते.
केंद्रीय पोलीस :
स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत दरवर्षी शिपाई (जी.डी) व रायफल मॅन (जी.डी.) साठी मोठय़ा प्रमाणात भरती होत असते. याअंतर्गत आय.टी.बी.पी.एफ, बी.एस.एफ, सी.आय.एस.एफ, सी.आर.पी.एफ व सशत्र सीमाबल, शिपाई (जी.डी.) पदासाठी भरती होते. प्रत्येक राज्य व केंद्रशासित प्रदेशानुसार ही भरती होते.
दहावी  उत्तीर्ण उमेदवारांसाठी  शारीरिक मोजमाप चाचणी, मदानी चाचणी, आरोग्य तपासणी व लेखी परीक्षा होत असते. या सर्व प्रक्रियेतून सक्षम व योग्य परीक्षार्थ्यांची निवड होत असते. प्रत्येक वर्षी हजारोंच्या संख्येने प्रवेशजागा उपलब्ध असतात. अपंगत्व असलेले उमेदवार पात्र ठरत नाहीत. या पदासाठी पे स्केल- ५२०० रु. ते २०२०० असून वाढीव वेतन श्रेणी २००० रुपये आहे. शैक्षणिक अर्हता- दहावी उत्तीर्ण. वय- १८ ते २३ वष्रे.  या परीक्षेचा अर्ज ऑफलाइन व ऑनलाइन करता येतो.  ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://ssconline.ssc.nic.in आणि http://ssconline2.gov.in या दोन्ही संकेतस्थळावर भेट द्यावी. परीक्षा शुल्क हे नेटबँकिंग किंवा एस.बी.आय. चलनाद्वारे भरावे लागते. अ.जा. व अ.ज. महिला व माजी सनिक यांना परीक्षा शुल्क भरावे लागत नाही. इतर संवर्गातील परीक्षार्थींनी भरलेले परीक्षा शुल्क कोणतेही कारणासाठी परत केले जात नाही. परीक्षा केंद्र – महाराष्ट्र, गुजरात व गोवा परीक्षार्थीसाठी औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पणजी, पुणे, अहमदाबाद, बडोदा, राजकोट, नाशिक, अमरावती व सुरत ही परीक्षा केंद्रे आहेत. रिजनल डायरेक्टर (वेस्ट रिजन) स्टाफ सिलेक्शन, कमिशन फर्स्ट फ्लोअर, साऊथ िवग, प्रतिष्ठा भवन, १०१ एम.के.रोड मुंबई, महाराष्ट्र- ४०००२० येथे अर्ज पाठवावेत. अर्जात नमूद केलेल्या परीक्षा केंद्रात बदल होत नाही.
उमेदवारांसाठी शारीरिक मोजमाप चाचणीचे काही निकष आहेत. शारीरिक चाचणी : धावणे- ५ कि.मी. अंतर २४ मिनिटात (पुरुष) व महिलांसाठी १.६ कि.मी. अंतर साडेआठ मिनिटांत धावणे आवश्यक असते.  शारीरिक मोजमाप चाचणीदरम्यान कागदपत्रांची तपासणी होत असते. त्यासाठी रहिवास प्रमाणपत्र , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रमाणपत्र, केंद्रीय जात प्रमाणपत्र, मराठा प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दहावी गुणपत्रक, परीक्षा मंडळाचे दहावीचे प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला महत्वाचा ठरतो. असल्यास क्रीडाविषयक प्रमाणपत्रे, एन.सी.सी. प्रमाणपत्र  व इतर आरक्षण प्रमाणपत्रे जोडावीत. शारीरिक चाचणी व वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० गुणांच्या लेखी परीक्षेला (वेळ – दोन तास) सामोरे जावे लागते. िहदी व इंग्रजीमध्ये बहुपर्यायी होत असते.
लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम :
१) सामान्य बुद्धिमत्ता चाचणी : २५ प्रश्न – २५ गुण २) सामान्य ज्ञानासह व चालू घडामोडी- २५ प्रश्न – २५ गुण ३) दहावीस्तरीय अंकगणित- २५ प्रश्न – २५ गुण ४) इंग्लिश व िहदी भाषाज्ञान- २५ प्रश्न – २५ गुण. लेखी परीक्षेत प्रावीण्य मिळविल्यानंतर गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची निवड होते.
संदर्भग्रंथ : १) दहावी स्तरीय इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्राची पाठय़पुस्तके २) सी.बी.एस.सी. परीक्षा मंडळाची दहावीपर्यंतची पाठय़पुस्तके, चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची पुस्तके आणि एन.टी.एस. गाइड  ३) सराव प्रश्नसंच.
नियमित अभ्यास, योग्य दिशेने अभ्यास, शारीरिक फिटनेस ही यश संपादन करण्याची त्रिसूत्री आहे.                       
 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा