दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, SECR ने गट सी पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. पॅरा मेडिकल स्टाफ पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार खाली दिलेल्या तारखांना मुलाखत देऊ शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ७५ पदे भरण्यात येणार आहेत.
पॅरामेडिकल कर्मचारी सेंट्रल हॉस्पिटल, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, बिलासपूर येथे कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जातील. पात्रता, निवड प्रक्रिया, मुलाखतीच्या तारखा आणि इतर तपशील जाणून घ्या.
रिक्त जागांचा तपशील
स्टाफ नर्स (Staff Nurse) : ४९ पदे
फार्मासिस्ट (Pharmacist) : ४ पदे
ड्रेसर (Dresser) : ६ पदे
एक्स-रे तंत्रज्ञ (X-Ray technician) : ३ पदे
डेंटल हायजिनिस्ट (Dental Hygienist) : १ पद
लॅब असिस्टंट (Lab Superintendent) : २ पदे
लॅब असिस्टंट (Lab Assistant) : ७ पदे
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : १ पद
ऑडिओ-कम-स्पीच थेरपिस्ट (Audio-cum-Speech Therapist): १ पोस्ट
रिफ्रॅक्शनिस्ट (Refractionist): १ पोस्ट
(हे ही वाचा: ESIC Recruitment 2022: नोकरीची संधी! ८० हजारांहून अधिक पगार, दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज)
पात्रता निकष काय?
वर नमूद केलेल्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
मुलाखतीच्या तारखा
स्टाफ नर्स: १८, १९, २०, २१ जानेवारी २०२२
फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्निशियन आणि ड्रेसर: २२ जानेवारी २०२२
लॅब सुपरिटेंडंट, लॅब असिस्टंट, डेंटल हायजिनिस्ट, फिजिओथेरपिस्ट, ऑडिओ-कम-स्पीच थेरपिस्ट, रिफ्रॅक्शनिस्ट: २४, २५ जानेवारी २०२२
(हे ही वाचा: PCMC Recruitment 2022: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती; पगार ५० हजारांपर्यंत)
निवड प्रक्रिया कशी असेल?
निवड प्रक्रियेमध्ये वैद्यकीय संचालक, सेंट्रल हॉस्पिटल, एसईसी रेल्वे, बिलासपूर यांच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीचा समावेश असेल.
इतर तपशील
उमेदवारांना बायोडेटा फॉर्म डाउनलोड करावा लागेल आणि तो योग्यरित्या भरावा लागेल. वॉक-इन मुलाखतीसाठी गेल्यावर, उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांच्या एका संचासह भरलेला अर्ज सादर करावा लागेल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.