Indian Railway Job 2022: दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ने सामान्य विभागीय स्पर्धा परीक्षा (GDCE) द्वारे कनिष्ठ अनुवादक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र उमेदवार २२ जून २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट rrchubli.in द्वारे दक्षिण पश्चिम रेल्वे कनिष्ठ अनुवादक भरती २०२२ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोणासाठी किती पदे?

अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे कनिष्ठ अनुवादक (राजभाषा सहाय्यक) च्या एकूण ७ रिक्त पदांची भरती केली जाईल. ज्यामध्ये अनारक्षित प्रवर्गासाठी १ पदे, ओबीसीसाठी २ पदे, एससी प्रवर्गासाठी २ पदे आणि एसटी प्रवर्गासाठी २ पदे भरण्यात आली आहेत. या पदांसाठी निवडल झालेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर ६ अंतर्गत वेतन दिले जाईल.

पात्रता काय ?

दक्षिण पश्चिम रेल्वेमध्ये कनिष्ठ अनुवादक पदाच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच भाषांतराचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे. याशिवाय या पदांसाठी भरतीसाठी कमाल वय ४२ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

कशी असेल निवड प्रक्रिया?

ऑनलाइन परीक्षा, भाषांतर चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवार रेल्वे ज्युनियर ट्रान्सलेटर भरती २०२२ साठी rrchubli.in या अधिकृत वेबसाइटवर २२ जून 2022 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक तपशीलांसाठी अधिकृत वेबसाइट तपासा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railway swr recruitment 2022 apply online for junior translator posts at rrchubli ttg