बारावीनंतर सेल्समनशिप विषयामध्ये कोणते करिअर करता येईल?
                        – सुविधा तिनईकर
मार्केटिंग आणि सेल्समनशिपमध्ये चांगले करिअर करता येऊ शकते. थेट विक्री करण्याकडे अनेक कंपन्यांचा कल वाढतो आहे. त्यामुळे उत्तम संवादकौशल्य, विक्रीसाठी प्रदर्शनांचे आयोजन करण्याचे तंत्र, संगणकीय ज्ञान, जाहिरातीचे कौशल्य, ग्राहकांच्या गरजा आणि कल ओळखणे आदी गुण असणाऱ्या व्यक्ती या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतात. मोठे रिटेल शॉप्स, मॉल्समध्ये या व्यक्तींना सेल्स एक्झिक्युटिव्ह या पदावर संधी मिळू शकते. आपले कौशल्य आणि परिश्रमाच्या बळावर या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचण्याची संधी मिळू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 मी अभियंता म्हणून कार्यरत आहे.  मात्र मला मानसशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. काही वर्षांनी मला यात पूर्णवेळ करिअर
करायचे आहे.
         – प्रियांका चव्हाण
मानसशास्त्रज्ञ म्हणून करिअर करण्यासाठी सर्वात आधी मानसशास्त्र या विषयात आपण पदवी-पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम करावा. त्याचबरोबर मानवी स्वभाव, भोवतालची परिस्थिती, भावभावना  अभ्यासण्याची सवय करून घ्यावी. त्यामुळे या विषयाचा आपला पाया भक्कम होईल. मानसोपचारातील वेगवेगळ्या पद्धती आणि सिद्धांत यांचा परिचय होईल. प्रत्यक्षात मात्र, सरावानेच अधिक कौशल्य प्राप्त होऊ शकते.
(१) इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा एम.ए. इन सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरू शकतो. बी.ए. (सायकॉलॉजी) हा अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येतो. संकेतस्थळ- http://www.ignou.ac.in
(२) नागालँडच्या द ग्लोबल युनिव्हर्सटिीने एम.ए. इन सायकॉलॉजी हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. तो कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधारक विद्यार्थ्यांना करता येतो.  
वेबसाइट- http://www.nagaland.net.in.
(३) वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सटिीने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंडियन पॉझिटिव्ह सायकॉलॉजी हा एक वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. संकेतस्थळ – http://www.vmou.ac.in

मी पुणे विद्यापीठातून बी.ए. (राज्यशास्त्र) पूर्ण केले आहे. आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून एम.ए. (पब्लिक सíव्हस) करत आहे. मी नेट-सेट देऊ शकतो का?
                         -कौस्तुभ भोपले
 मुक्त विद्यापीठाचे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम हे नेट-सेटसाठी ग्राह्य़ धरले जातात.
 
मी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेतले होते. पण हेलिकॉप्टर व विमान चालविण्यासाठी गणित विषय लागतो. आता मला गणित पेपर देता येईल का?
                  -सूरज भोसले
 सध्या आपण नेमके काय शिकत आहात ही बाब आपल्या प्रश्नावरून लक्षात येत नाही. दहावीनंतर अकरावीमध्ये प्रवेश घेताना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र  अथवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित अथवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र आणि गणित असे विषय निवडता येतात. त्यामुळे केवळ याच विषयांची परीक्षा देता येते. आता स्वतंत्र फक्त एकाच विषयाची परीक्षा देता येणार नाही.

  नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचे असल्यास माझ्या मुलाने अकरावी-बारावीला कुठले विषय निवडावेत?
-मनीष घैसास, रत्नागिरी<br /> नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये निश्चितच मोठय़ा संधी आहेत, कारण हे भविष्याचे तंत्रज्ञान आहे. आपल्या मुलाने अकरावी-बारावीला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय घ्यायला हवेत. तसेच या विषयांचा पायाही भक्कम करावा.
 
 माझे शिक्षण बी.कॉम. झाले आहे. गेल्या १२ वर्षांपासून आयटीमध्ये ईडीपी-डाटा प्रोसेसिंग म्हणून काम करीत आहे. इंग्रजीतून संवाद साधता न येणं ही माझ्यातील त्रुटी आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मला काय करावे लागेल? ओरॅकल, पीएचपी, मायएसक्यूएल, जावा स्क्रिप्ट शिकण्यामध्ये मला रस आहे.
                  -दर्शन आमरे, भाईंदर
 माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी इंग्रजी उत्तम येत असेल तर त्याचा निश्चितच फायदा होतो. मात्र जर इंग्रजी चांगले येत नसेल तर करिअर घडत नाही, असेही नाही. कारण भाषेपेक्षाही तुम्ही तुमच्या विषयात किती ज्ञान संपादन केले आहे आणि त्याचा प्रत्यक्ष वापर किती करता येतो, हे महत्त्वाचे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात ते अधिक आवश्यक ठरते. त्यामुळे आपण सध्या जे काम करत आहात, त्यात कुठे कमी पडतो याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या त्रुटी लक्षात येतील. या त्रुटींकडे त्रयस्थपणे आणि वस्तुनिष्ठपणे बघा. त्यामुळे त्या सुधारता येतील. आपल्याला ज्या कोड लँग्वेजमध्ये रस आहे, त्या शिकायला काहीच हरकत नाही. पण त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवावे लागेल. शिवाय त्याचा वापरही करता यायला हवा.

मी बी.फार्मसीमध्ये शेवटच्या वर्षांत शिकत आहे. त्यानंतर एम.फार्म. करणे योग्य राहील की एमबीए योग्य राहील याबाबत मार्गदर्शन करावे.
    – गणेश घाडगे
एम.फार्म. आणि एमबीए या दोन वेगवेगळ्या ज्ञानशाखा आहेत. आपला रस व्यवस्थापन, विक्री, मनुष्यबळ विकास, वित्त या क्षेत्रात असेल तर एमबीए करायला काहीच हरकत नाही. मात्र हे एमबीए दर्जेदार आणि नामवंत महाविद्यालयामधून केले तरच पुढे चांगली संधी मिळू शकेल. त्यासाठी कॅट, सीइटी, मॅट, एक्समॅट आदी प्रवेश परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवणे आवश्यक आहे. एम.फार्म. केल्यावर आपल्याला औषध क्षेत्रातील संशोधन, शिक्षण, उत्पादन, दर्जा नियंत्रण आदी क्षेत्रांत करिअरच्या संधी मिळू शकतात.

मी फार्मसीच्या तिसऱ्या वर्षांत आहे. पदवीनंतर मी एम.फार्म. करावे की फार्म.डी. करावे. मला फार्मसी विषयातील यूपीएससी /एमपीएससीच्या परीक्षा द्यायच्या आहेत.
    – गीतेश गुथाले
 फार्म.डी.ला बारावीनंतर प्रवेश मिळतो. त्यामुळे आपण एम.फार्म. करावे. यूपीएससीमार्फत इंजिनीअिरग, मेडिकल, जिऑलॉजी, इकॉनॉमिक्स/स्टॅटिस्टिक्स या विषयांसाठी ज्याप्रमाणे स्वतंत्र स्पर्धा परीक्षा घेतली जाते, तशी प्रवेश परीक्षा फार्मसी या विषयासाठी घेतली जात नाही. मात्र, आपण ‘यूपीएससी’मार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेला बसू शकता. ‘एमपीएससी’मार्फत शासनासाठी आवश्यक असणारे औषध निर्माणशास्त्र विषयाचे प्राध्यापक निवडले जातात. ‘एमपीएससी’च्या नागरी सेवा परीक्षांनाही फार्मसी विषयातील पदवीधर बसू शकतो.

 मला भारतीय परराष्ट्र सेवेमध्ये दाखल व्हायचे आहे. त्यासाठी आवश्यक पात्रता कोणती? दरवर्षी ‘आयएफएस’च्या किती जागा भरल्या जातात?
    – समद बागवान
 भारतीय परराष्ट्र सेवेसाठी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते. यासाठी किमान पात्रता ही कोणत्याही विषयातील पदवी आहे. दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या जागांप्रमाणे ‘आयएफएस’च्या जागा भरल्या जातात. ही संख्या दरवर्षी बदलत जाते.

मी बीई मेकॅनिकलच्या अंतिम वर्षांला आहे. मला एमएस करायचे आहे. त्यासाठी मला कुठली परीक्षा द्यावी लागेल? एम.एस. कोणत्या विषयात करता येईल?
             – आम्रपाली नेरकर
अमेरिकेतील शैक्षणिक संस्थांमधील एमएस प्रवेशासाठी जीआरइ- ग्रॅज्युएट रेकॉर्ड इंजिनीअिरग ही परीक्षा द्यावी लागते. ही संगणक आधारित परीक्षा आहे. यामध्ये विश्लेषणात्मक लेखन, क्वान्टिटेटिव्ह रिझिनग, व्हर्बल रिझिनग यावर प्रश्न विचारले जातात. संकेतस्थळ-www.ets.org/gre
(२)  टोफेल या परीक्षेतील गुण १५० हून अधिक देशांतील साधारण नऊ हजार शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी गुण ग्राह्य़ मानले जातात. या परीक्षा द्याव्यात. मेकॅनिकल विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना डिझाइन अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चुिरग, डायनामिक्स अ‍ॅण्ड कंट्रोल, सॉलिड मेकॅनिक्स, व्हायब्रेशन्स अ‍ॅण्ड मटेरिअल्स, थर्मल फ्लुइड, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, रोबोटिक्स या क्षेत्रांत स्पेशलायझेशन करता येऊ शकते. मात्र, त्यासाठी आपल्याला कुठले विषय शिकण्यात रस  आहे, हे महत्त्वाचे. त्यानुसारच स्पेशलायझेशनचा विषय ठरवावा.
(करिअर अथवा अभ्यासक्रमासंबंधीचे आपले प्रश्न career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवावेत.)