करिअर मंत्र. अभ्यासक्रमांसंदर्भातील तुमच्या शंका आम्हांला कळवा. तुमचे प्रश्न, शंका आम्हाला career.vruttant@expressindia.com या पत्त्यावर जरूर कळवा अथवा करिअर वृत्तान्त, लोकसत्ता, संपादकीय विभाग, ईएल-१३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१० या पत्त्यावर लिहून पाठवा.
नामांकित खासगी अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रवेश घेणे योग्य की शासकीय अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश घेणे उचित ठरते?
– प्रज्ञा गायकवाड, नांदेड.
खरे तर हा प्रश्न कुणासही पडू नये. केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा आणि गुणवत्ता बहुतांश खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांपेक्षा निर्वविादपणे उत्तम आहे. या महाविद्यालयांमध्ये चांगल्या प्रयोगशाळा आणि अनुभवी प्राध्यापकवर्ग असतो. या महाविद्यालयांना सर्वोत्तम कंपन्या कॅम्पस रिक्रुटमेंटसाठी प्राधान्यक्रम देतात. या महाविद्यालयांचे शुल्कसुद्धा खासगी महाविद्यालयांपेक्षा निम्म्याहून कमी असते. त्यामुळे घरापासून अथवा गावापासून अथवा परराज्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळत असेल तर तो नक्कीच घ्यायला हवा. असे निदर्शनास येते की, अनेक महाराष्ट्रीय पालक परराज्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांच्या पाल्यास प्रवेश मिळत असूनही त्याऐवजी घराच्या आसपास असणाऱ्या वा पुण्या-मुंबईतल्या किंवा आसपासच्या खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पाल्यासाठी प्रवेश घेतात. आपल्या पाल्याचे हित कशात आहे, हे पालकांना अधिक कळते, यात शंका नाही. मात्र शासकीय अभियांत्रिकी आणि खासगी अभियांत्रिकी संस्थांमधील शिक्षण आणि संबंधित क्षेत्रातील या संस्थांचे स्थान लक्षात घेतले तर शासकीय अभियांत्रिकी संस्था या नेहमीच उजव्या ठरतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा