मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुक्यात २७ वर्षीय संतोष गर्जे या युवकाने सहारा अनाथालय सुरू केले आहे. या ठिकाणी तब्बल ४२ अनाथ मुलांचा सांभाळ तो करत आहे. परिस्थितीचे लक्ष्य ठरलेल्या या अनाथ मुलांचे पालकत्व पत्करलेल्या संतोषचे काम नक्कीच दखल घेण्याजोगे आहे.
सुमारे २५ वर्षांपूर्वी शेखर कपूर दिग्दर्शित एक चित्रपट आला होता- मिस्टर इंडिया! अनिल कपूर एका भाडय़ाच्या घरात काही अनाथ मुलामुलींना जगण्याची हिंमत देऊ करण्यासाठी तारेवरची कसरत करत असतो. तो चित्रपट पाहताना त्या मुलांबद्दल आणि अनिल कपूरबद्दल कणव दाटून येते. या चित्रपटाचा शेवट गोड होतो आणि ही एका चित्रपटाची कथा होते, अशी मनाची समजूत घालत आपण घरी परततो. पण अनिल कपूरची भूमिका वास्तवात निभावणारा एक युवक गेली आठ वष्रे अनाथ मुलांच्या सांभाळासाठी खरोखरीच तारेवरची कसरत करतोय.. त्याचे नाव संतोष गर्जे.
हल्लीच्या तरुणांना समाजभान नाही, असा आरोप सरसकट केला जात असतो. मात्र देशाच्या
कामाला सुरुवात केल्यापासून संतोषला अनेक बरे-वाईट अनुभव आले. २००७ साली बीडमधील केस तालुक्यामध्ये एका हॉटेलमध्ये राहिला असताना तिथे धाड पडली. त्या हॉटेलमध्ये अनतिक प्रकार चालत असत. पोलिसांनी संतोषलाही ताब्यात घेतलं. खिशात पसे नव्हते म्हणून इथे राहिलो अशी प्रांजळ कबुली संतोषने दिली, पण कुणीच ऐकून घेईनात. मग संस्थेच्या कामाच्या पावत्या, खर्च दाखवला तेव्हा कुठे पोलिसांनी सोडलं. ‘‘आज प्रकल्पामधल्या वाटीपासून टेबलपर्यंत सर्व गोष्टी मागून गोळा केलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मागे एक गोष्ट आहे. कधी कधी चार दिवस जेवलेलो नाही. एका वर्षी तर तब्बल १७ दिवस अनाथालयातील सर्वजण वरण-भात आणि खिचडीवर होते. साधी माचिसची काडी घ्यायला पसे नव्हते. मग माचिस चोरावी लागली. त्यानंतर संध्याकाळी जेवण बनवून खाता आलं सगळ्यांना,’’ संतोष सांगत होता.
संतोषने अनेक वेळा फक्त संध्याकाळच्या वेळेस चहा-बिस्किटं किंवा पाणी-बिस्किटं खाऊनही दिवस काढलेत. विजेचं बिल जास्त येईल म्हणून आठ वाजताच दिवे बंद करून झोपायचो, पण झोप लागायची नाही. एकदा माजलगावच्या एका ढाब्यावर एका चपातीचे पसे जास्त लावले, म्हणून त्याला भांडण करावं लागलं होतं, पण परिस्थितीच अशी होती की, इलाज नव्हता. नातेवाईकांकडे मदत मागायची, तर ते त्यांचीच रडगाणी सांगायचे. काही वर्षांपूर्वी बहिणींकडून घेतलेले कर्जाचे पैसे अजूनही संतोषला देता आलेले नाहीत. याचा सल रोज त्याला छळतोय. संतोष गेली सात र्वष दिवाळीला घरी गेलेला नाही. एका मातेच्या पोटी जन्माला आलेला कर्तृत्ववान मुलगा म्हणून गेल्या वर्षी संतोषच्या आईला ‘मातृत्व पुरस्कार’ मिळाला तेव्हा त्या पहिल्यांदा गेवराईला आल्या होत्या. पण आपला मुलगा नक्की काय काम करतो याची त्याच्या आईला अजूनही कल्पना नाही. तो फक्त मुलं सांभाळतो एवढंच तिला कळतं.
संतोषला फार मित्र कधीच नव्हते. मग पुस्तकं त्याचे मित्र बनली. भटकंतीमधून वेळ मिळाला किंवा प्रवासात पुस्तक वाचायचा. त्यातून खूप आधार मिळाल्याचं तो सांगतो. नगर परिषदेच्या वाचनालयात कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे वाचून काढल्या. पुस्तकामुळे कळलं की, आपल्याआधी अशा प्रकारे अनेकांनी आयुष्य व्यतीत केलं आहे आणि आजही जगत आहेत. या सर्व कामात संतोषला अनाथालयातील मुलांची खूप मदत मिळाली. त्यांची कशाबद्दल तक्रार नसते. संतोषही मुलांचा त्रास कमी कसा होईल, याची काळजी घेतो.
२००७ साली ‘आई’ नावाने ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि त्याच्या सहारा अनाथालय परिवाराचं काम पद्धतशीरपणे सुरू झालं. पण सरकारी फाइलींमध्ये तो अडकला. २०११ पासून सरकारी कायद्यानुसार या प्रकल्पाचं काम सुरू झालं. पण प्रकल्प कसा चालवायचा याची पद्धतशीर माहिती त्याला नव्हती. त्यामुळे संतोषने काही संस्थांना भेटी देऊन त्यांचं काम समजून घेतलं. आजच्या घडीला अनाथलयाला जे नियम असतात, ते सर्व त्याच्या प्रकल्पात पाळले जातात. मुलांना चांगल्या पद्धतीने वाढवायचं त्याने ठरवलं आहे. त्यामुळे मुलांना शिस्त लावली, पण ती उपदेश करून नव्हे. मुलांचे गट पाडून त्यांना संतोष काम वाटून देतो. अनाथालयातील बरीचशी कामं मुलं सांभाळतात. गेली दोन-अडीच वर्षे पहिली ते बारावीपर्यंतची मुलं या अनाथालयात आहेत. इथल्या मुलांमध्ये परस्परांमधील नात्याचे बंधही बळकट झाले आहेत. आपल्याच कृतीतून ती शिकत असतात.
या प्रकल्प उभारणीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये गोरक्षनाथ डोंगरे हा मित्र संतोषबरोबर आहे. संतोष कामासाठी बाहेरगावी असताना प्रकल्पाची जबाबदारी तो निभावायचा. सध्या स्वत: संतोष, गोरक्षनाथ, संभाजी सोनवणे, स्वयंपाकासाठी जाधव ताई, बायको प्रीती असे पाच जण प्रकल्पाचे पूर्णवेळ काम पाहतात. संतोषची बायको प्रीती फेब्रुवारीपासून सक्रिय झालेली आहे. त्याच्या कामाला समजून घेणारी बायको त्याला हवी होती. ती प्रीतीच्या रूपाने मिळाली. प्रीती सध्या कायद्याचं शिक्षण घेत आहे.
संतोषला त्याच्या वयाची मुलं उडानपणा करताना दिसायची. पण त्याचं त्याला काही विशेष वाटायचं नाही. सर्वच असे नसतात या मतावर संतोष ठाम होता. अशातच अभय बंग आणि राणी बंग यांच्या सर्चमधील निर्माणच्या शिबिराची माहिती झाली. तिथे अनेक चांगल्या समविचारी तरुणांशी त्याच्या ओळखी झाल्या. आता ते सर्वजण संतोषला कामात खूप मदत करतात. काहीजण भाजीपाला पाठवतात, पसे देतात. आणि ते नाही दिलं तरी मानसिक आधार खूप मिळतो, असं संतोष सांगतो. आता हरीष जाखेते, सुशील पिपाडा, महेंद जाखेटे या त्याच्याच काही मित्रांनी मिळून पसे काढून गेवराईपासून दोन-अडीच किलोमीटरवर संतोषला संस्थेसाठी जागा घेऊन दिली आहे. आज त्याचा प्रकल्प भाडय़ाच्या घरात सुरू आहे.
नवीन जागी तिथे येणाऱ्या मुलांना जीवनशैलीशी निगडित शिक्षण मिळेल अशा सुविधा येथे संतोषला उभारायच्या आहेत. भविष्यात त्या जागेत कमीत कमी दोनशे जण राहू शकतील अशी व्यवस्था करायची आहे. इथून बाहेर पडलेल्या मुलांना आपल्या हक्काच्या घरी कधीही येता येईल अशी सुविधा त्याला देऊ करायची आहे. त्याशिवाय छोटी झाडांची नर्सरी, हस्तकलेच्या वस्तू बनवायचा प्रकल्प, कार्यालय, ग्रंथालय यांचा प्रकल्पाच्या इमारतीमध्ये समावेश करण्याचा त्याचा मानस आहे. या संपूर्ण प्रवासात अमरावतीच्या ‘प्रयास’ संस्थेचे अविनाश सावजी, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग, गिरीश कुलकर्णी, प्रकाश आणि विकास आमटे यांसारख्या व्यक्तींचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे संतोष आवर्जून सांगतो.
संस्थेचे संकेतस्थळ – http://www.aaifoundation.org.in
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2012 रोजी प्रकाशित
प्रकाशाचे कवडसे : ४२ अनाथ मुलांचे पालकत्व निभावणारा खराखुरा मिस्टर इंडिया!
मराठवाडय़ातील बीड जिल्ह्य़ातील गेवराई तालुक्यात २७ वर्षीय संतोष गर्जे या युवकाने सहारा अनाथालय सुरू केले आहे. या ठिकाणी तब्बल ४२ अनाथ मुलांचा सांभाळ तो करत आहे. परिस्थितीचे लक्ष्य ठरलेल्या या अनाथ मुलांचे पालकत्व पत्करलेल्या संतोषचे काम नक्कीच दखल घेण्याजोगे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-12-2012 at 12:08 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Real mr india of 42 orphan children