बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बँक ऑफ बडोदा (BOB) ने फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट, MSME आणि कॉर्पोरेट क्रेडिट विभागांमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ४ मार्चपासून सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १०५ पदे भरली जातील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ४ मार्च २०२२

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ मार्च २०२२

(हे ही वाचा: India Post Recruitment 2022: दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक)

रिक्त जागा तपशील

व्यवस्थापक – डिजिटल फ्रॉड (फसवणूक जोखीम व्यवस्थापन) – १५

क्रेडिट ऑफिसर (MSME विभाग) SMG/S IV – १५

क्रेडिट ऑफिसर (MSME विभाग) MMG/S III – २५

क्रेडिट – निर्यात / आयात व्यवसाय (MSME विभाग) SMG/SIV – ८

क्रेडिट – निर्यात/आयात व्यवसाय (MSME विभाग) MMG/SIII – १२

परकीय चलन – संपादन आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) MMG/SIII – १५

परकीय चलन – संपादन आणि संबंध व्यवस्थापक (कॉर्पोरेट क्रेडिट विभाग) MMG/SII – १५

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी भरती, महिला देखील करू शकतात अर्ज)

पात्रता निकष काय?

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित क्षेत्रात बॅचलर किंवा पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय २ ते ८ वर्षे कामाचा अनुभवही हवा. किमान २४ ते ३५ वर्षे वयोगटातील उमेदवार या भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

(हे ही वाचा: Oil India Limited Recruitment 2022: ऑइल इंडिया लिमिटेड विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या तपशील)

अर्ज फी किती?

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस- रु.६००/-

अनुसूचित जाती/जमाती/अपंग व्यक्ती (पीडब्लूडी)/ महिला – १००/-

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment 2022 job opportunities for graduates in bank salary more than 89 thousand ttg