भारतीय टपाल विभागात ९८ हजारांहून अधिक पोस्टमन, मेल गार्ड आणि एमटीएस पदांसाठी भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
डिपार्टमेंट ऑफ पोस्ट रिकृटमेंट २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारे उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून या भरतीची सर्व माहिती मिळवू शकतात. याबाबतचा पीडीएफ देखील उमेदवारांसाठी अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.
आणखी वाचा- KVS Recruitment 2022: केंद्रीय विद्यालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या कुठे करायचा अर्ज
रिक्त पदांची संख्या
- पोस्टमॅन – ५९,०९९
- मेल गार्ड – १४४५
- मल्टीटीस्कींग स्टाफ – ३७,५३९
शैक्षणिक पात्रता
- पोस्टमॅन पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आवश्यक आहे.
- मेलगार्ड पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.
- एमटीएस पद: मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असणे आणि संगणकाची सामान्य माहिती असणे आवश्यक आहे.