आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे ५० मिनिटांच्या अभ्यासानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या.  पुढचा घटक अभ्यासण्याआधी मागच्या घटकातील किती गोष्टी लक्षात राहिल्या याचे मनन करा. दिवसाअखेरीस आपण किती वाचले आणि त्यापकी आपल्या किती लक्षात राहिले हे तपासून पाहा. प्रत्येक आठवडय़ाच्या शेवटी आणि प्रत्येक महिन्याअखेरीस आपण अभ्यासलेल्या प्रत्येक घटकाची उजळणी करा. परीक्षा जवळ आली असल्याने रोज किमान ५० ते १०० बहुपर्यायी शब्द सोडवण्याचा सराव करा. या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची पद्धत उपयुक्त आहे.
बुद्धिमत्ता : या घटकाच्या तयारीसाठी अधिकाधिक सराव गरजेचा असतो. परीक्षेपर्यंत गणित व बुद्धिमत्ता या विषयांची दररोज तयारी करावी.  संख्या सारणी, अक्षरांची सारणी, अक्षर मालिका, आकृत्यांवरील प्रश्न, दिनदíशका, घडय़ाळांवरील  प्रश्न याकडे अधिक लक्ष पुरवावे.
सामान्य विज्ञान : विक्रीकर निरीक्षक या पदासाठी सामान्य विज्ञानाचा जो अभ्यासक्रम  आहे, त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र यांचा समावेश केलेला आहे. हा घटक काही विद्यार्थ्यांना कठीण वाटतो. या घटकाची तयारी करताना सर्वप्रथम पाचवी ते दहावीची विज्ञान विषयाची पुस्तके वाचावीत.
* आरोग्यशास्त्र- या घटकावर प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारले जातात. यात मानवाला होणारे आजार, त्यांचा प्रादुर्भाव करणारे घटक, जीवनसत्त्व कुपोषण, मानवी शरीरातील अवयव, रक्ताभिसरण संस्था, दृष्टिदोष तसेच वैद्यक क्षेत्रात लागलेले शोध यांचा अभ्यास करावा.
* वनस्पतीशास्त्र- वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पती पेशी व ऊती, प्रकाश संश्लेषण, संप्रेरके, अन्नसाखळी, वनस्पतीजन्य रसायने (उदा. स्टार्च, सेल्युलोज इ.)
* प्राणीशास्त्र- प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांचे अवयव, पेशी शास्त्र.
* भौतिकशास्त्र- एकके, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युतशास्त्र, चुंबकत्व, खगोलशास्त्र, आण्विकशास्त्र यातील महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित काही गणिते, अवकाश विज्ञान आण्विक शास्त्र, दूरसंचार, रसायनशास्त्र, मित्रधातू, आम्लांचे प्रकार, विविध पदार्थाचे रासायनिक गुणधर्म, द्रावण, काचेचे रंग, कार्बन, इंधन इ.

भारताचा इतिहास- या घटकाचा अभ्यास करताना पुढील उपघटकांवर विशेष भर द्यावा-
* राष्ट्रीय सत्याग्रह चळवळ -१८५७ चा उठाव, त्याची कारणे, तो दाबून टाकण्यात यशस्वी झालेले इंग्रज अधिकारी, चले जाव चळवळ, मंदिर प्रवेश सत्याग्रह, भूदान चळवळ, मोपला चळवळ, भिल्लांचा उठाव इ. यांची कारणे, परिणाम या उठावात असणारे नेते आदींचा अभ्यास करावा.
* पक्ष संस्था व संस्थापक- १८५७ ते १९४७ दरम्यान स्थापन झालेले पक्ष, स्थापनेचे वर्ष, स्थापन केलेल्या संस्थापकांची नावे इ.
* सामाजिक प्रबोधन- समाजसुधारकांनी स्थापन केलेल्या संस्था, उदा. आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज इ.
* काँग्रेसचे अधिवेशन- अधिवेशनाचे स्थळ, अध्यक्ष व ठराव.
* वृत्तपत्र ग्रंथ व लेखक- दर्पण, ज्ञानप्रकाश, मूकनायक, केसरी, मराठा, आनंदमठ इ.
* क्रांतिकारक- स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, फडके इ.
* कायदे, परिषदा, करार- क्रिप्स मिशन, सायमन कमिशन, पुणे करार, वृत्तपत्र कायदा इ.
* प्रसिद्ध व्यक्ती राजकीय नेते व व्हाइसरॉय इ.- पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, डॉ. राधाकृष्णन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लॉर्ड कॅिनग, मेकॉले इ.
* ऐतिहासिक स्थळे, वर्ष, महत्त्वाच्या घटना- लाहोर, मुंबई, दिल्ली, पाटणा, फैजपूर, आवडी, सूरत. इतिहासाचा अभ्यास  महाराष्ट्राच्या संदर्भासह करावा.
भारताची राज्यघटना व राज्यव्यवस्था : या घटकाचा अभ्यास करताना पुढील उपघटकांवर विशेष भर द्यावा-
* राज्यघटनेची निर्मिती- भारतीय राज्यघटनेची उद्दिष्टय़े, भारतीय राज्यघटनेचे वैशिष्टय़, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, महत्त्वाची कलमे, कलम ३६८, कलम ३७०, कलम ३५२ व कलम ३१.
* कायदेमंडळ- विधान परिषदेची रचना, मुदत व काय्रे, राज्यसभेची रचना व काय्रे, महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या, अर्थ विधेयकांच्या मंजुरीबाबत, राज्यसभेचे अधिकार संसद राष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती, संसदेचे संयुक्त अधिवेशन, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, राजकीय पक्ष, त्यांचे संस्थापक.
* कार्यकारी मंडळ- राष्ट्रपती, राज्यपाल, त्यांचे अधिकार किंवा राष्ट्रपतीचा वटहुकूम, राष्ट्रपती करत असलेल्या नेमणुका.  
पंचायत राज / ग्रामप्रशासन- अभ्यासक्रमात ग्रामप्रशासन असा शब्द नमूद केलेला आहे. हा अभ्यास करताना पंचायत राजची सुरुवात, विविध समित्या उदा. बलवंतराव मेहता समिती, अशोक मेहता समिती, पी. बी. पाटील समिती इ.
* ग्रामपंचायत- ग्रामपंचायतीचे अध्यक्ष, ग्रामसभा पदाधिकाऱ्याचे वेतन, त्यांचे लेखा परीक्षण, अविश्वास ठराव, ग्रामसेवक इ.
* तालुका पंचायत समिती- सभापती, उपसभापतींची निवड, त्यांच्यावरील अविश्वास ठरावावरील पद्धत, गटविकास अधिकारी, लेखा अधिकारी, यांचे वेतन, त्यांची नेमणुकीची पद्धत यांचा अभ्यास.
* जिल्हा परिषद- जिल्हा परिषद अध्यक्ष, त्यांची निवडपद्धती, त्यांचे कार्य, अविश्वास ठराव, मुख्य कार्यकारी अधिकारी, वार्षकि अंदाजपत्रक, जिल्हा नियोजन व विकास मंडळ इ. अभ्यास.
जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल यांची कामे, तलाठीच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी, ७/१२ उतारा, पिकांची आणेवारी इ. अभ्यासक्रम.
भूगोल- अभ्यासक्रमात भूगोल  घटकाअंतर्गत ‘महाराष्ट्राचा भूगोल’ प्रामुख्याने अभ्यासावा. जरी अभ्यासक्रमात भारताच्या भूगोलासंदर्भात उल्लेख करण्यात आलेला नसला तरी त्यावर प्रश्न विचारले जातात. म्हणजे अभ्यास करताना भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल या दोन्हींचा अभ्यास करावा.
भूगोलाचा अभ्यास करताना भूगोल खालील प्रकारे विभाजीत केल्यास अभ्यास सोपा होतो-
* पृथ्वी- सूर्यमालेतील ग्रह, उपग्रह धूमकेतू, पृथ्वीवरील वारे इ.
* हवामान व पर्जन्य- हवामानाचे प्रकार, तापमान, उष्ण कटिबंधीय, शीत कटिबंधीय हवामान.
* अक्षांश व रेखांश- स्थानिक प्रमाणवेळ, अक्ष व रेखावृत्त, भौगोलिक वैशिष्टय़े.
* जमिनीचे प्रकार व पिके- काळी मृदा, रेगूर, जांभीय, तांबडी मृदा, पिके, पिकांची उत्पादने, त्यांचा क्रम इ.
* नद्या- राज्य, देश व जगातील प्रमुख नद्या, त्यांचा लांबीनुसार चढता व उतरता क्रम, नद्यांवरील प्रमुख धरणे इ. अभ्यास करावा.
* खनिजसंपत्ती- महाराष्ट्रातील व भारतातील प्रमुख खनिजसाठे. उदा. दगडी कोळसा, लोखंड इ.
* महत्त्वाची शहरे- देशातील व महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे. उदा. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, येवला, सावंतवाडी, कल्याण-डोंबिवली, कोटा, तारापूर, इंफाळ, चेन्नई इ.
* अर्थव्यवस्था- या घटकाचा अभ्यास करताना सर्वप्रथम अर्थव्यवस्थेसंबंधी महत्त्वाच्या संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्यात. गेल्या काही दिवसांपासून आयोग संख्यात्मक माहितीवर सहसा प्रश्न विचारत नाहीत तर मूलभूत संकल्पना व सिद्धांतांवर प्रश्न विचारले जातात. अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना राष्ट्रीय उत्पन्न शेती, बेरोजगारी व तिचे स्वरूप, उद्योगधंदे, परकीय व्यापार, आयात-निर्यात व्यापार, बँकिंग, रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, मुद्रा आणि राजकोषीय नीती, अर्थसंकल्प, लेखा आणि लेखापरीक्षण यांचा अभ्यास करावा.    
grpatils0s0@gmail.com

Story img Loader