आगामी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि विक्रीकर निरीक्षक पूर्वपरीक्षेची तयारी करताना उजळणीला फार महत्त्व आहे. अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा निवडक संदर्भग्रंथांचा सखोल अभ्यास करा. सर्वसाधारणपणे ५० मिनिटांच्या अभ्यासानंतर पाच मिनिटांचा ब्रेक घ्या. पुढचा घटक अभ्यासण्याआधी मागच्या घटकातील किती गोष्टी लक्षात राहिल्या याचे मनन करा. दिवसाअखेरीस आपण किती वाचले आणि त्यापकी आपल्या किती लक्षात राहिले हे तपासून पाहा. प्रत्येक आठवडय़ाच्या शेवटी आणि प्रत्येक महिन्याअखेरीस आपण अभ्यासलेल्या प्रत्येक घटकाची उजळणी करा. परीक्षा जवळ आली असल्याने रोज किमान ५० ते १०० बहुपर्यायी शब्द सोडवण्याचा सराव करा. या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची पद्धत उपयुक्त आहे.
बुद्धिमत्ता : या घटकाच्या तयारीसाठी अधिकाधिक सराव गरजेचा असतो. परीक्षेपर्यंत गणित व बुद्धिमत्ता या विषयांची दररोज तयारी करावी. संख्या सारणी, अक्षरांची सारणी, अक्षर मालिका, आकृत्यांवरील प्रश्न, दिनदíशका, घडय़ाळांवरील प्रश्न याकडे अधिक लक्ष पुरवावे.
सामान्य विज्ञान : विक्रीकर निरीक्षक या पदासाठी सामान्य विज्ञानाचा जो अभ्यासक्रम आहे, त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र यांचा समावेश केलेला आहे. हा घटक काही विद्यार्थ्यांना कठीण वाटतो. या घटकाची तयारी करताना सर्वप्रथम पाचवी ते दहावीची विज्ञान विषयाची पुस्तके वाचावीत.
* आरोग्यशास्त्र- या घटकावर प्रत्येक परीक्षेत प्रश्न विचारले जातात. यात मानवाला होणारे आजार, त्यांचा प्रादुर्भाव करणारे घटक, जीवनसत्त्व कुपोषण, मानवी शरीरातील अवयव, रक्ताभिसरण संस्था, दृष्टिदोष तसेच वैद्यक क्षेत्रात लागलेले शोध यांचा अभ्यास करावा.
* वनस्पतीशास्त्र- वनस्पतींचे वर्गीकरण, वनस्पती पेशी व ऊती, प्रकाश संश्लेषण, संप्रेरके, अन्नसाखळी, वनस्पतीजन्य रसायने (उदा. स्टार्च, सेल्युलोज इ.)
* प्राणीशास्त्र- प्राण्यांचे वर्गीकरण, त्यांचे अवयव, पेशी शास्त्र.
* भौतिकशास्त्र- एकके, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युतशास्त्र, चुंबकत्व, खगोलशास्त्र, आण्विकशास्त्र यातील महत्त्वाच्या संकल्पनांवर आधारित काही गणिते, अवकाश विज्ञान आण्विक शास्त्र, दूरसंचार, रसायनशास्त्र, मित्रधातू, आम्लांचे प्रकार, विविध पदार्थाचे रासायनिक गुणधर्म, द्रावण, काचेचे रंग, कार्बन, इंधन इ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा