AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणने कनिष्ठ कार्यकारीच्या रिक्त पदांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या aai.aero या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जुलै आहे.
महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: १५ जून २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १४ जुलै २०२२
(हे ही वाचा: NHM Nanded Bharti 2022: नांदेडमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक तपशील)
रिक्त जागांचा तपशील
कनिष्ठ कार्यकारी (एअर ट्रॅफिक कंट्रोल) – ४००
(हे ही वाचा: ECIL Recruitment 2022: नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अन्य तपशील)
पात्रता निकष
कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून भौतिकशास्त्र आणि गणितासह बी. एस.की. किंवा कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी पदवी असावी. तसेच, उमेदवाराला १० + २ इयत्तेच्या स्तरावर बोलले जाणारे आणि लिखित इंग्रजी दोन्हीमध्ये किमान प्रवीणता असणे आवश्यक आहे.
वय श्रेणी
उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी.