विविध विद्याशाखांमधील उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये विविध शिष्यवृत्त्या उपलब्ध असतात. त्याविषयक माहिती देणारे पाक्षिक सदर..
जपानमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
जपानमधील टोकियोस्थित ‘युनायटेड नेशन्स युनिव्हर्सटिी (यूएनयू)’मध्ये २०१३ च्या पदव्युत्तर शिक्षणाच्या प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या विद्यापीठात सस्टेनेबिलिटी, डेव्हलपमेन्ट अॅण्ड पीस या विषयांत एम.एस्सी. करण्यासाठी जपानमधील जपान फाउंडेशनकडून विकसनशील देशांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. दोन वष्रे कालावधी असलेल्या या अभ्यासक्रमात ‘जागतिक स्थिरता, सद्यस्थितीतील होत असलेले हवामान परिवर्तन, वैश्विक शांतता निर्माण, विकास आणि मानवाधिकार’ आदी आंतरशाखीय मुद्दे मूलभूत विज्ञान, सामाजिक विज्ञान व कलाशाखेच्या घटकांचा अभ्यास करत पद्धतीने करायचे आहेत. पदवीमध्ये फक्त सद्धांतिक (ळँी१८ ुं२ी)ि अभ्यासावर अवलंबून न राहता प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.
प्रवेशासाठीचे निकष व अर्जप्रक्रिया :
वर उल्लेखिलेल्या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याबरोबरच टोफेल अथवा कएछळर या परीक्षांत किमान गुण मिळवणे गरजेचे आहे. अर्जदारांनी संबंधित वेबसाइटवर (ँ३३स्र्://्र२स्र्.४ल्ल४.ी४ि/) जाऊन हा अर्ज भरायचा आहे. ही अर्जप्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. ज्या अर्जदारांना शिष्यवृत्तीची गरज आहे त्यांच्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०१३ आहे. तर इतर अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल २०१३ आहे. विद्यापीठाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्ती व साहाय्यवृत्तींची (ं२२्र२३ंल्ल३२ँ्रस्र्२) संख्या मर्यादित आहे. विकसनशील देशांतील उच्चशिक्षित व कुशाग्र शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेल्या अर्जदारांना हे अर्थसाहाय्य देण्यात येईल. शिष्यवृत्ती अथवा साहाय्यवृत्तीसाठी कोणताही स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नाही. अर्जदाराला अर्जाबरोबरच दोन तज्ज्ञांची शिफारसपत्रे विद्यापीठाला मेल करावी लागतात. अर्थातच तज्ज्ञांचा मेल आयडी आपल्याकडून घेऊन विद्यापीठ त्यांना स्वतंत्रपणे संपर्क करते. या दोन तज्ज्ञांपकी एक अर्जदाराच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित म्हणजेच त्याचे प्राध्यापक असावेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा