हाँगकाँगमध्ये पीएच.डी.साठी शिष्यवृत्ती
हाँगकाँगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Council) २००९ सालापासून दिल्या जाणाऱ्या ‘हाँगकाँग पीएच.डी. शिष्यवृत्ती योजने’अंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना हाँगकाँगमधील विविध विद्यापीठांमध्ये (संबंधित विद्यापीठात उपलब्ध असलेल्या विषयांत) पीएच.डी.साठी प्रवेश व शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व त्याच विषयात हाँगकाँगमध्ये पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून २०१४-१५ साठी देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी संशोधन अनुदान परिषदेकडून २ डिसेंबर २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आलेले आहेत.
पाश्र्वभूमी :
आंतरराष्ट्रीय स्तरावरील बुद्धिमत्तेला हाँगकाँगमध्ये आकर्षति करून घेण्यासाठी सन २००९ साली ‘हाँगकाँग पीएच.डी. शिष्यवृत्ती योजना’ हाँगकाँगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Councilसुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत विज्ञान शाखेतील मूलभूत विज्ञान, वैद्यकीय व अभियांत्रिकी- तंत्रज्ञान तसेच कलाशाखेतल्या कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या व त्याच विषयात हाँगकाँगमध्ये पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हाँगकाँगमधील परिषदेशी संलग्न असलेल्या आठपकी कोणत्याही विद्यापीठात (संबंधित विद्यापीठात संशोधनाचा विषय उपलब्ध असल्यास) पीएच.डी.साठी प्रवेश व शिष्यवृत्ती देण्यात येते. या आठ विद्यापीठांची विस्तृत माहिती परिषदेच्या वेबसाइटवर दिलेली आहे.
शिष्यवृत्तीबद्दल :
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना खुली असलेली ही शिष्यवृत्ती हाँगकाँगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून दरवर्षी दिली जाते. सन २०१४-१५ साली दिल्या जाणाऱ्या एकूण आंतरराष्ट्रीय प्रवेश व शिष्यवृत्त्यांची संख्या दोनशेपेक्षाही जास्त आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांला निवासासहित इतर खर्चासाठी परिषदेकडून २,४०,००० हाँगकाँग डॉलर्स म्हणजे साधारणत: ३० हजार अमेरिकी डॉलर्स एवढा वार्षकि भत्ता मिळणार आहे. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा आहे. एखाद्या विद्यार्थ्यांचा पीएच.डी. कालावधी जर त्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्या उर्वरित कालावधीसाठी आवश्यक असणारा भत्ता संलग्न विद्यापीठाकडून दिला जाऊ शकतो.
आवश्यक अर्हता :
संशोधन परिषदेच्या या शिष्यवृत्तीबरोबर अर्जदाराला हाँगकाँगमधील एका विद्यापीठात पीएच.डी.साठी प्रवेशसुद्धा मिळणार आहे. म्हणूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणारा अर्जदार किमान पदव्युत्तर पदवीधर असावा. त्याबरोबरच अर्जदाराने TOEFL अथवा IELTS या इंग्रजी भाषेच्या दोन्हीपकी एका परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जर एखाद्या अर्जदाराचे संशोधनाचे माध्यम चिनी भाषेमधून असेल तर अशा अर्जदाराला TOEFL व IELTS या परीक्षांची आवश्यकता शिथिल करण्यात आलेली आहे. अर्जदाराची शैक्षणिक व संशोधन पाश्र्वभूमी अतिशय उत्तम असावी. उमेदवाराचे संवादकौशल्य व नेतृत्व क्षमता उत्कृष्ट दर्जाचे असावे. अर्जदार सध्या जर कुठे पीएच.डी. करत असेल, तर त्याला या शिष्यवृत्तीसाठी नव्याने पीएच.डी.साठी अर्ज करावा लागेल.
अर्ज प्रक्रिया :
अर्जदाराने शिष्यवृत्तीसाठी त्याचा अर्ज प्रथम ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून विद्यापीठाच्या वेबसाइटवर जमा करावा. तिथे अर्ज जमा केल्यावर अर्जदाराला त्याच्या अर्जाचा संदर्भ क्रमांक मिळेल. तो संदर्भ क्रमांक वापरून अर्जदार परिषदेशी संलग्न असलेल्या आठपकी कोणत्याही एका विद्यापीठाला पीएच.डी. प्रवेशासाठी अर्ज करू शकतो. शिष्यवृत्तीची अंतिम मुदत व या आठ विद्यापीठांच्या प्रवेशासाठीच्या अंतिम मुदती वेगवेगळ्या आहेत. परिषदेने वेबसाइटवर ही सर्व माहिती दिलेली आहे. अर्जदाराने त्याच्या अर्जाबरोबर त्याच्या आतापर्यंतच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस. ओ. पी. (Statement of Purpose), त्याचा सी.व्ही., त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापक किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती इत्यादी गोष्टी पाठवणे आवश्यक आहे.
अंतिम मुदत :
या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०१३ आहे.
महत्त्वाचा दुवा :
https://cerg1.ugc.edu.hk/hkpfs/index.html
itsprathamesh@gmail.com
देशोदेशींच्या शिष्यवृत्त्या
हाँगकाँगमधील संशोधन अनुदान परिषदेकडून (Research Grant Council) २००९ सालापासून दिल्या जाणाऱ्या ‘हाँगकाँग पीएच.डी. शिष्यवृत्ती
First published on: 21-10-2013 at 08:14 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarships from the variouse countries