अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती
केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातर्फे परदेशातील मूळ भारतीय वंशाच्या आणि अनिवासी भारतीयांच्या मुलांना भारतात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्याविषयी..
परदेशातील मूळ भारतीय वंशाच्या व्यक्तींच्या (Persons of Indian origin or PIO) आणि अनिवासी भारतीयांच्या(NRIs) मुलांना भारतात उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने एक शिष्यवृत्ती देण्यात येते. ही शिष्यवृत्ती योजना Scholarship programme for Diaspora Children (SPDC)  या नावाने ओळखली जाते. या शिष्यवृत्ती अंतर्गत विद्यार्थ्यांना भारतातील कुठल्याही विद्यापीठात किंवा शैक्षणिक अथवा संशोधन संस्थेमध्ये कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक वा इतर अभ्यासक्रमांना (केवळ वैद्यकीय व संबंधित इतर क्षेत्रे वगळता) प्रवेश दिला जातो आणि त्या संपूर्ण अभ्यासक्रमाच्या कालावधीतील सर्व खर्चाची पूर्तता केंद्र सरकारकडून केली जाते. SPDC  च्या या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सध्या परदेशस्थित असलेल्या मूळ भारतीय वंशाच्या आणि अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांकडून १० जून २०१३ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
पाश्र्वभूमी :
डायस्पोरा (Diaspora) या शब्दाचा अर्थ ‘जगाच्या निरनिराळ्या भागांत राहणाऱ्या व्यक्ती ज्यांचे पूर्वज एका ठरावीक देशात राहत होते,’ असा आहे. म्हणजे मूळ भारतीय वंशाची असलेली, पण सध्या इतर देशांमध्ये (फक्त पाकिस्तान व बांगलादेश वगळता) स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबामधील मुलांसाठी गेल्या काही वर्षांपासून ही शिष्यवृत्ती केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली. या शिष्यवृत्तीची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी EdCIL (India) limited कंपनी भारत सरकारच्या वतीने ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम पाहाते. SPDC  ची ही शिष्यवृत्ती फक्त पदवी अभ्यासक्रमांसाठीच दिली जाते.
शिष्यवृत्तीबद्दल :
अनिवासी भारतीय व भारतीय वंशाच्या मुलांना दिली जाणारी ही शिष्यवृत्ती परराष्ट्र मंत्रालयाने २००६-०७ सालापासून सुरू केलेली आहे. या शिष्यवृत्तीमध्ये विद्यार्थ्यांला पदवी अभ्यासक्रमास प्रवेश, टय़ुशन फी, प्रवेश फी, प्रवेशानंतरचा शैक्षणिक खर्च व पदवीच्या संपूर्ण कालावधीसाठी लागणारा इतर सर्व आíथक खर्च या सर्व बाबींचा समावेश आहे. मंत्रालयातर्फे एकूण १०० विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यापकी ५० विद्यार्थी अनिवासी भारतीय असतात तर उर्वरित ५० विद्यार्थी भारतीय वंशाचे परदेशस्थ विद्यार्थी असतात. अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्यासाठी प्रमुख निकष आíथक उत्पन्नाच्या ठरावीक मर्यादेचा आहे. त्याबाबतची अधिक माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर आहे. मूळ भारतीय वंशाच्या (PIO)  विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही आíथक मर्यादा नाहीत. संबंधित शिष्यवृत्ती ही या दोन्ही गटांमधील विद्यार्थ्यांना भारतात शिकण्यासाठी मिळणार असून त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना भारतातील कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा विद्यापीठामध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. अर्थातच हा प्रवेश त्याच्या याआधीच्या शैक्षणिक गुणवत्तेवर अवलंबून असेल.
आवश्यक अर्हता :-
SPDC साठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचा वयोगट १ ऑक्टोबर २०१३ रोजी १७ ते २१च्या दरम्यान असावा. म्हणजेच त्याचा जन्म १ ऑक्टोबर १९९२ पूर्वी व १ ऑक्टोबर १९९६ नंतर झालेला नसावा. त्या अर्जदाराच्या शालान्त अथवा समकक्ष परीक्षेच्या प्रमाणपत्रावरील जन्मतारीख ग्राह्य़ धरण्यात येईल. अर्जदाराचे उच्च माध्यमिक (आपल्याकडील अकरावी-बारावी ) किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण झालेले असावे; मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण झालेले नसावे. तसेच अर्जदाराचे हे शिक्षण गेल्या सहा वर्षांपकी कमीत कमी तीन वष्रे तरी परदेशामध्ये कुठेही झालेले असावे.
अर्ज प्रक्रिया :
SPDC च्या शिष्यवृत्तीसाठी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या स्वरूपात अर्ज भरून त्याबरोबर माध्यमिक- उच्च माध्यमिक अथवा समकक्ष पातळीच्या परीक्षेचे ट्रान्सक्रिप्टस  EdCIL (India) limited  पोस्टाने अंतिम मुदतीपूर्वी पाठवायचे आहेत. EdCIL (India) limited पत्ता वेबसाइटवर दिलेला आहे.
निवड प्रक्रिया :
अर्जदारांच्या अर्ज छाननी व पडताळणीनंतर पात्र अर्जदारांची प्रवेश परीक्षा घेतली जाईल. प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेनुसार अर्जदारांची शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येईल. निवड झालेल्या अर्जदारांची यादी मंत्रालयाच्या वेबसाइटवर ३० जून २०१३ रोजी प्रकाशित करण्यात येईल.
अंतिम मुदत: अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जून २०१३ आहे.
महत्त्वाचा दुवा – http://www.moia.gov.in/
itsprathamesh@gmail.com