तुमच्यातील विशिष्ट प्रतिभा आणि तुम्ही जे करण्यासाठी विशेष योग्य आहात, ते ओळखण्याचे आणि निश्चित करण्याचे काही मार्ग आहेत.
तुम्हाला जी गोष्ट करायला आवडते, ती करण्यात तुम्ही नेहमी सवरेत्कृष्ट आणि आनंदी असता. ते विशिष्ट काम करण्यात मग्न असताना तुम्हाला समाधान आणि आनंद मिळतो.
तुम्ही ती गोष्ट चांगल्या प्रकारे करता. या क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची नैसर्गिक क्षमता तुमच्यामध्ये आहे, असे दिसून येते.
हे कौशल्य तुमच्या आतापर्यंतच्या आयुष्यातील बहुसंख्य आनंदासाठी कारणीभूत असते. ते शिकायला सोपं असतं, की तुम्ही ते कधी शिकलात, हेही तुम्हाला आठवत नाही. ती गोष्ट तुमचा ठाव घेते. त्याबद्दल विचार करायला, वाचायला, बोलायला आणि अधिक जाणून घ्यायला तुम्हाला आवडतं.
तुम्हाला आयुष्यभर त्याबद्दल शिकायला आवडेल. त्या क्षेत्रात प्रगती करण्याची तुमची आंतरिक इच्छा असते.
तुम्ही ती गोष्ट करता, तेव्हा वेळेचे भान तुम्हाला उरत नाही.
त्या क्षेत्रात ज्या व्यक्ती उत्तम कामगिरी करीत असतील, अशा व्यक्तींबद्दल तुम्हाला आदर वाटतो. हे वर्णन तुमच्या ज्या कौशल्यासाठी लागू पडत असेल तर ते करण्यासाठी तुम्ही पृथ्वीवर आला आहात असे समजा.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली माने, साकेत प्रकाशन,     पृष्ठे – २५६, मूल्य – २२५.