ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे देशांतर्गत ४०० व विदेशातील निवडक शैक्षणिक संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमबीए अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट एमएटी मे : २०१३ या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदार पदवीधर असावेत अथवा पदवी परीक्षेला बसलेले असावेत आणि त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक अथवा माहितीपर सीडीसाठी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या http://apps.aima.in/matmay 13 या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास १२०० रु.चा ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या नावे असलेला व दिल्ली येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अर्ज व माहितीपत्रक १२०० रु. रोखीने भरल्यास बँक ऑफ बडोदाच्या मुंबई, नागपूर व पुणे येथील, तर अ‍ॅक्सिस बँकेच्या कोल्हापूर, नागपूर व नाशिक येथील निर्धारित शाखांमध्ये मिळू शकतील.
निवड पद्धती : अर्जदारांना एमएटी- मे २०१३ अंतर्गत निवड पात्रता परीक्षा संगणकीय पद्धतीने ११ मे २०१३ रोजी व लेखी निवड परीक्षा स्वरूपात ५ मे २०१३ रोजी देता येईल.
अर्जदारांना त्यांची पात्रता व एमएटी २०१३ या प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकांच्या आधारे ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे संबंधित संस्थेतील एमबीए अभ्यासक्रमात प्रवेश दिला जाईल.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एआयएमएच्या दूरध्वनी क्र. ०११-४७६७३०३६ वर संपर्क साधावा, अथवा असोसिएशनच्या http://www.aima.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१३ असून, विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन, मॅनेजमेंट हाऊस, १४, इन्स्टिटय़ुशनल एरिया, लोधी रोड, नवी दिल्ली ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०१३.
ज्या पदवीधरांना व पदवीधर होणाऱ्यांना एमबीए अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घ्यायचा असेल, अशांसाठी हा अभ्यासक्रम फायदेशीर ठरेल.   

Story img Loader