सैन्यदलात थेट भरती योजनेअंतर्गत महिला इंजिनीअर्सची नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
जागांची संख्या : एकूण उपलब्ध जागांची संख्या १९.
शैक्षणिक पात्रता : अर्जदार महिलांनी सिव्हिल इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, मेकॅनिकल, प्रॉडक्शन, ऑटोमोबाइल, एरोनॉटिकल, मेटॅलर्जिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यासारख्या विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्या शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हव्यात.
वयोगट : अर्जदारांचे वय २० ते २६ वर्षांच्या दरम्यान असायला हवे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना सैन्यनिवड मंडळातर्फे लेखी निवड परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी व मुलाखतीसाठी अलाहाबाद, भोपाळ वा बंगळुरू येथे बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व लाभ : निवड झालेल्या महिला इंजिनीअर्सना सैन्यदलाच्या तांत्रिक विभागात लेफ्टनंट म्हणून दरमहा १५६००-३९१००-५४०० या वेतनश्रेणीत इतर भत्ते व लाभांसह नेमण्यात येईल. याशिवाय त्यांना सैन्यदलाच्या नियमांनुसार भविष्यकालीन बढतीच्या संधी पण उपलब्ध असतील.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २५ ते ३१ जानेवारी २०१४च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची इंजिनीअरिंगविषयक जाहिरात पाहावी अथवा सैन्यदलाच्या http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०१४.
सैन्यदलात महिला इंजिनीअर्ससाठी विशेष संधी
सैन्यदलात थेट भरती योजनेअंतर्गत महिला इंजिनीअर्सची नेमणूक करण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत-
First published on: 17-02-2014 at 07:31 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special opportunities for women engineers in army