SSC MTS Recruitment 2022: कर्मचारी निवड आयोगाने मल्टी टास्किंग स्टाफच्या पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अधिसूचना जारी झाल्याने अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. उमेदवार ३० एप्रिल २०२२ पर्यंत अधिकृत वेबसाइट ssc.nic.in द्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेद्वारे एमटीएस आणि हवालदारांसह विविध पदांच्या ३ हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. अर्जाची प्रक्रिया २२ मार्च २०२२ पासून सुरू झाली आहे.
(हे ही वाचा: Recruitment 2022: दहावी पाससाठी नोकरीची संधी; जाणून घ्या अधिक तपशील)
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना तपासू शकतात.
(हे ही वाचा: Bank Of Maharashtra Recruitment 2022: ‘या’ पदासाठी होणार भरती! जाणून घ्या अधिक तपशील)
वायोमार्यदा किती?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते २५ वर्षे दरम्यान असावे. त्याच वेळी, काही पदांसाठी कमाल वय देखील २७ वर्षे आहे. उच्च वयोमर्यादा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३ वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्षे शिथिल आहे.
(हे ही वाचा: MMRCL Recruitment 2022: मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची संधी! जाणून घ्या अधिक माहिती)
अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील अर्जदारांना रु. १०० अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.