केंद्र सरकारचे विविध विभाग आणि कार्यालयांतर्गत कर्मचाऱ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील पदवीधर निवड परीक्षा- २०१४ या निवड परीक्षेसाठी कर्मचारी निवड आयोगातर्फे खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत-
आवश्यक शैक्षणिक पात्रता : अर्जदारांनी अर्थशास्त्र, गणित, सांख्यिकी अथवा सांख्यिकी या मुख्य विषयासह अथवा गणित किंवा अर्थशास्त्र या मुख्य विषयासह पदवी पात्रता पूर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय २७ वर्षांहून अधिक नसावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा २७ एप्रिल व ४ मे २०१४ रोजी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुण मिळविणाऱ्या उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगातर्फे मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क : अर्जासह भरावयाचे शुल्क म्हणून १०० रु.ची निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणारी केंद्र सरकारची रिक्रुटमेंट टपाल तिकिटे अर्जावर लावणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क : यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १८ ते २४ जानेवारी २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या http://ssconline.nic.in किंवा http://ssconline2.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : महाराष्ट्रातील उमेदवारांनी संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे आपले अर्ज क्षेत्रीय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, साऊथ विंग, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०१४.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा