राज्य सरकारच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाद्वारे राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत राज्यातील मुस्लीम, ख्रिस्ती, बौद्ध, शीख, पारशी व जैन या अल्पसंख्याक समाजांतील पहिली ते दहावीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती संधी उपलब्ध आहेत-
आवश्यक पात्रता
अर्ज करण्यासाठी अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रताधारक असावेत-
० अर्जदार महाराष्ट्र राज्याचे निवासी व मुस्लीम, ख्रिस्ती, बौद्ध, शीख, पारशी आणि जैन समाजातील असावेत.
० विद्यार्थी राज्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित मान्यताप्राप्त शाळांमधून पहिली ते दहावी इयत्तेपर्यंत शिक्षण घेणारे असावेत.
० अर्जदार विद्यार्थी मागील वर्षीच्या परीक्षेत किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत.
० संबंधित विद्यार्थ्यांच्या इयत्ता पहिली ते आठवीकरता श्रेणी पद्धती असल्यास अशा विद्यार्थ्यांने क-१ व त्यावरील श्रेणी प्राप्त केलेली असावी.
० अर्जदार विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तींचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
० उपलब्ध शिष्यवृत्तींपैकी ३० टक्के शिष्यवृत्ती अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींसाठी राखीव आहेत.
० पात्रताधारक कुटुंबातील दोनपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
० वार्षिक उत्पन्न सर्वात कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राधान्य तत्त्वावर विचार करण्यात येईल.
० इतर शिष्यवृत्ती योजनेचे लाभार्थी असणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अधिक माहिती
या संदर्भात अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेली राज्य सरकार- अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालय, पुणे यांची जाहिरात पाहावी अथवा संचालनालयाच्या http://www.scholarships.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची मुदत
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर ३१ जुलै २०१५ पूर्वी अर्ज करावेत.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची शिष्यवृत्ती
राज्य सरकारच्या अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाद्वारे राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान योजनेअंतर्गत राज्यातील मुस्लीम, ख्रिस्ती, बौद्ध, शीख, पारशी व जैन
आणखी वाचा
First published on: 27-07-2015 at 01:02 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State government scholarship for minority students