Graduate Aptitude Test in Engineering, GATE 2022 Exam: कोविड-१९ च्या तिसर्‍या लाटेदरम्यान या वर्षीची अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE 2022) परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, गेट २०२२ परीक्षेला उशीर केल्याने विद्यार्थ्यांमध्ये ‘गोंधळ आणि अनिश्चितता’ निर्माण होऊ शकते. पूर्वनिश्चित परीक्षेच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता गेट २०२२ ची परीक्षा वेळापत्रकानुसार ५,६,७ आणि १३ फेब्रुवारीला होणार आहे.

गेट परीक्षा मुख्यत्वे अभियांत्रिकी आणि विज्ञानातील विविध पदवीपूर्व विषयांसाठी घेतली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कार्यक्रमाच्या प्रवेशासाठी आणि काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांद्वारे भरतीमध्ये समाविष्ट करता येईल. गुरुवारी (०३ फेब्रुवारी) सुनावणी करताना, न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांना सांगितले की, परीक्षा ही सरकारची धोरणात्मक बाब आहे.

TET, AI Technology TET, TET candidates,
टीईटी परीक्षेत एआय तंत्रज्ञान वापरल्याचा परिणाम काय? किती उमेदवारांनी दिली परीक्षा?
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
BCCI conducts 6 hour review meeting with Indian team management
BCCI : टीम इंडियाच्या पराभवावर सहा तास चालली बीसीसीआयची बैठक, रोहित-गंभीरला विचारले ‘हे’ तीन महत्त्वाचे प्रश्न
election day fun facts election day activities voting activities on Election Day
मतदान दिनाच्या गमतीजमती!
MPSC Mantra State Services Main Exam Science and Technology
MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान
JEE Advanced 2025 New Eligibility Rules
JEE Advanced 2025 : जेईई ॲडव्हान्स्डच्या विद्यार्थ्यांना आता तीन वेळा देता येणार परीक्षा; आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

(हे ही वाचा: SSC CHSL 2021: कर्मचारी निवड आयोगाने आवेदन केले जारी, जाणून घ्या तपशील)

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती

अलीकडेच, अकरा गेट उमेदवारांनी करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेट परीक्षा २०२२ पुढे ढकलण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. केंद्र सरकार आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), खरगपूर (GATE 2022 चे आयोजक) यांनी परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहनात करण्यात आले होते.

(हे ही वाचा: Ministry of Defence Recruitment 2022: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!)

याचिकेत म्हटले आहे की, “कोविड -१९ च्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारामुळे करोनाची सध्याची तिसरी लाट अनेक राज्ये आणि शहरांमध्ये तीव्रपणे पसरली आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या अभ्यासासह अनेक अभ्यासात असे भाकीत केले आहे की फेब्रुवारीच्या सुरुवातीला तिसरी लाट आपल्या पीकवर असेल आणि करोनाची तिसरी लाट एप्रिलमध्ये थांबेल. त्यामुळे गेट परीक्षेच्या तारखा वाढवण्यात याव्यात.

(हे ही वाचा: IOCL Recruitment 2022: ५७० पदांसाठी भरती! अर्ज प्रक्रिया जाणून घ्या)

याचिकेत म्हटले आहे की, “जर परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या गेल्या नाहीत, तर गेट २०२२ ला बसणाऱ्या उमेदवारांना करोनाची लागण होण्याचा आणि त्याचा प्रसार होण्याचा धोका आहे. ज्यामुळे त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा जीवही धोक्यात जाऊ शकतो.”