जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळ (JKSSB) ने जम्मू आणि काश्मीर पोलीस मध्ये उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज जारी करण्यात आली आहे. सर्व इच्छुक उमेदवार १० डिसेंबर २०२१ पर्यंत अधिकृत वेबसाइट ssbjk.org.in वर JKSSB SI भर्ती २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रिक्तपदे
या प्रक्रियेद्वारे, जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये उपनिरीक्षकांच्या एकूण ८०० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये ओएम प्रवर्गातील ४०० पदे, एससी प्रवर्गातील ६४ पदे, एसटी प्रवर्गातील ८० पदे, ओएससी प्रवर्गातील ३२ पदे, एएलसी प्रवर्गातील ३२ पदे, आरबीए प्रवर्गातील ८० पदे, पीएसपी संवर्गातील ३२ पदे आणि ईडब्ल्यूएस संवर्गातील ८० पदे आहेत.
मासिक वेतन
या पदांवरील निवडलेल्या उमेदवारांना स्तर ६C अंतर्गत ३५,७०० रुपये ते १,१३,१०० रुपये प्रति महिना वेतन उमेदवारांना देण्यात येणार आहे. लेखी परीक्षा, शारीरिक मानक चाचणी, शारीरिक सहनशक्ती आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे उपनिरीक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड केली जाईल.
ESIS Recruitment 2021: महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा रुग्णालय ठाणे इथे भरती; पगार ५० हजार रुपये
शैक्षणिक पात्रता
जम्मू आणि काश्मीर पोलिसांमध्ये उपनिरीक्षक पदांच्या भरतीसाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पुरुष उमेदवाराची किमान उंची ५’६ फूट असावी. तर महिला उमेदवारांची किमान उंची ५’२ फूट असावी.
वयोमर्यादा
वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, या पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. तसेच अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईड जाऊन पाहू शकतात.
सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवार ssbjk.org.in येथे जम्मू काश्मीर सेवा निवड मंडळाच्या ऑनलाइन पोर्टलवर १० डिसेंबर २०२१ पर्यंत जम्मू काश्मीर SI भर्ती २०२१ साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना ५५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी त्यांची पात्रता तपासने महत्वाचे आहे.