डिसेंबर २०१३ मध्ये झालेल्या केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सर्वाधिक कुतूहल असणारा पेपर होता तो म्हणजे पेपर- Content of answer is more important than length – उत्तर असे लिहिल्यामुळे एका अर्थाने काम सुलभच मानावे लागेल. यूपीएससीने आधी प्रकाशित केलेल्या नमुना प्रश्नपत्रिकेप्रमाणे ही मुख्य प्रश्नपत्रिका आली, हे बरे झाले.
या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न हे अगदीच अपेक्षित असे विचारले गेले.
उदा.  
* What do you understand by ‘Values’ and ‘Ethics’? In what way is it important to be ethical along with being professionally competent?
या लेखामध्ये आपण अशा प्रश्नांविषयी चर्चा करू, जे बऱ्यापकी अनपेक्षित आणि किचकट अशा स्वरूपाचे होते. उदा.-
* Some people feel that values keep changing with time and situation, while others strongly believe there  are certain universal and eternal human values. Give your perception in this regard with due justification.
हा प्रश्न नतिक तत्त्वज्ञानातील फी’Relative Ethics सापेक्ष नतिकता आणि Objective/Ethics/ वस्तुनिष्ठ (निरपेक्ष) नतिकता यांमधील द्वंद्वाशी निगडित आहे. नतिकतेची संकल्पना ही Spatio-temporal आहे (स्थळ-काळ सापेक्ष) की Universal (वैश्विक) आहे? अशा पद्धतीचा हा प्रश्न होता.
काही तत्त्ववेत्त्यांच्या मतानुसार नतिकता ही स्थल-कालपरत्वे बदलणारी असते. एका काळात एका समाजामध्ये असणारी नतिकतेची संकल्पना ही दुसऱ्या समाजामध्ये असेलच असे नाही. तसेच एकाच समाजाच्या नतिकेच्या संकल्पना कालपरत्वे बदलणाऱ्या असतात. उदा. आफ्रिकेतील बऱ्याच जमातींमध्ये Female Genital Mutilation नावाचा अघोरी प्रकार आहे. मुलींच्या कौमार्याचा भंग होऊ नये म्हणून असा प्रकार केला जातो. अत्यंत अमानुष, अमानवी आणि त्रासदायक अशा या प्रकाराला त्या समाजात नतिक मानले जाते. मात्र आधुनिक समाजाकडून याची सदैव निर्भर्त्सना होत आहे. म्हणजेच नतिकतेची संकल्पना ही स्थळ आणि काळ यांवर अवलंबून आहे. आणखी उदाहरण द्यायचे झालेच तर नतिक सापेक्षतावाद्यांच्या मतानुसार एखादी कृती योग्य की अयोग्य, हे त्या समाजाच्या स्वत:च्या अशा नतिक संकल्पनांवर अवलंबून असते. एका समाजामध्ये नतिक असणारी संकल्पना दुसऱ्या समाजात नतिक असेलच,  असे नाही. याच्या अगदी उलट म्हणजे Ethical Objectivism होय. यांनुसार जर Ethical Relativism चे म्हणणे ग्राह्य़ मानले तर दोन समाजांमध्ये नतिकतेची कोणतीच समानता राहणार नाही आणि एक वैश्विक समाज या नात्याने जगणे अवघड होऊन जाईल. सर्वच संस्कृतीमध्ये काही समान अशा नतिक मूल्यांना महत्त्व दिलेले असते/ दिले जावे. उदा. एखाद्याचा खून करणे हे अनतिक, तर पालकांचा आदर करणे हे नतिक मानले गेले आहे आणि सर्वच समाजामध्ये/ संस्कृतींमध्ये याबाबतीत एकवाक्यता आहे.
काही तत्त्वांबद्दल सापेक्षता असली तरी ही काही नतिक तत्त्वे मात्र सार्वकालिक आणि वैश्विक असायलाच हवीत. नतिकतेची सापेक्ष संकल्पना एकूणच वैश्विक मानवतावादासाठी धोकादायक ठरू शकते. एक मनुष्यप्राणी या नात्याने विश्वातील सर्वच समाजांमध्ये नतिकतेची किमान काही आधारभूत तत्त्वे असावीत, वाढवली जावीत; जेणेकरून काही अनतिक प्रथा-परंपरांविरोधात वैश्विक समाजाकडून प्रतिरोध केला जाऊ शकतो. मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, लंगिक अत्याचार/ छळवणूक,Female Genital Mutilation  सारख्या अघोरी प्रकारांना विरोध करणारी ‘नतिकता’ सर्वच समाजांसाठी सर्व काळांमध्ये असायलाच हव्या आहेत. मुळात नतिकतेची संकल्पना ही विश्वातील सर्वच मानवजातीचे कल्याण व्हावे आणि अन्याय दूर व्हावा यासाठीच आहे/असायला हवी. या दृष्टीने विचार करताना नतिकतेचे उद्दिष्ट, संकल्पना अधिक योग्य आहे/ असायला व्हावी.
(५) What do you understand by the term ‘Voice’ of ‘Conscience’? How do you prepare yourself to heed to voice of conscience? प्रश्न असा विचारला आहे की, ‘अंत:करणाचा आवाज म्हणजे काय? आणि ‘अंत:करणाच्या आवाजाकडे तुमचे लक्ष जावे यासाठी तुम्ही कशा पद्धतीने तयारीत आहात?’
अशा प्रश्नांची उत्तरे ही बऱ्यापकी सापेक्ष असू शकतात. अशा प्रश्नांचा विचार करताना पहिली बाब ध्यानात ठेवायची असते, ती म्हणजे आपण Ethics in Governance या विषयाचा पेपर सोडवत असून तो ‘Ethics in Philosophy’ असा विषय नाही. प्रशासनातील Ethics मध्ये Voice of Conscience काय असणार आहे, असा विचार करायला हवा. मुळात Conscience/ अंत:करणाचा आवाज म्हणजे काय, हे आधी लिहावे लागेल. Conscience म्हणजे अशी Quality/ Attitude जी मानवाला चांगले काय आणि वाईट काय यामधील भेद ओळखण्यासाठी आणि चांगल्याकडे वाटचाल करण्यासाठी प्रवृत्त करेल. मराठीत यालाच आपण ‘सदसद्विवेकबुद्धी’ असे म्हणतो. आता सदसद्विवेकबुद्धी किंवा सदसद्विवेकाच्या आवाजाकडे लक्ष जावे, यासाठी आपण काय, कसे, का करायला हवे, असा प्रश्न विचारला गेला आहे. या ठिकाणी उत्तर लिहीत असताना आपणाला सदसद्विवेकबुद्धीचे विविध आयाम विचारात घ्यावे लागतील. न्यायबुद्धी, समतेचे तत्त्व, विषमताविरहित विचार, मानव अधिकारांची जाणीव.. इ. घटकांचा त्यात समावेश करावा लागेल.
आता या बाबींची जाणीव निर्माण होण्यासाठी काय करावे लागेल, तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ‘स्वार्थी’ भाव सोडून आपण या समाजाचे घटक आहोत; मी, माझे, मला यासोबतच माझी समाजाप्रति काय कर्तव्ये आहेत, याची मला जाणीव असणे गरजेचे आहे. राग, लोभ, दंभ, मोह-मत्सर दूर ठेवण्याचा प्रयत्न केला की आपोआप सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येतो.
समाजामध्ये वावरताना व्यावसायिक जीवनामध्ये आपली कर्तव्ये, जबाबदाऱ्या; आपले आणि आपल्या पदाचे औचित्य याची जाणीव असणे हीच बाब सदसद्विवेकाचा आवाज ऐकू येण्यासाठी आवश्यक ठरते, अशा पद्धतीने उत्तर लिहिता येईल.
यापुढील प्रश्नदेखील याच स्वरूपाचा होता. What is meant by Crisis of Conscience? ‘विवेकाचे संकट म्हणजे काय?’ असा प्रश्न विचारला आहे. विवेकाचे संकट हे दोन प्रकारचे असू शकते. एकतर विवेकवादी भूमिका काय आहे हेच न कळणे किंवा दोन विवेकवादी भूमिकांमध्ये कशाला प्राधान्य द्यावे यामध्ये गोंधळ उडणे.
तसेच बऱ्याचदा विवेकवादी भूमिका काय आहे, हे कळत असूनदेखील ती केवळ बदल्याची भावना (Revenge), परंपरा (Tradition), पूर्वग्रह (Prejudice) आदी कारणास्तव आपण त्या विवेकवादी भूमिकेवर ठाम राहू शकत नाही. एक वेळेस विवेकवादी भूमिका माहीतच नसेल तर निर्णय घेणे सोपे असते, विवेकवादी भूमिका काय आहे हे जाणून त्यावर निर्णय घेणे हे त्यापेक्षा अवघड आहे आणि विवेकवादी भूमिका माहीत आहे, पण केवळ वैयक्तिक आकसामुळे तिचे अवलंबन करणे अडचणीचे वाटणे ही सर्वात अवघड बाब आहे. या नतिक पेचाचे नुकत्याच घडलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भातील उदाहरण देऊन स्पष्टीकरण करता येईल. या निवडणुकांत आम आदमी पक्षाने काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना प्रचलित भ्रष्ट व्यवस्थेसाठी जबाबदार धरत संबंध निवडणूक प्रचारात त्यांच्या अध:पतनाची विविध रूपे जनतेसमोर मांडून आपल्या रूपाने स्वच्छ, प्रामाणिक राजकारणाचा पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला. स्वाभाविकच निवडणूक प्रचार आणि निकालानंतरही त्रिशंकू विधानसभेच्या स्थितीतदेखील ‘आम्ही कुणाला समर्थन देणार नाही आणि कुणाचे समर्थन घेणार नाही’ अशी भूमिका घेतली.
तथापि, भाजपने सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असूनदेखील जेव्हा सरकार स्थापनेस नकार दिला आणि त्यानंतर काँग्रेसने आम आदमी पक्षाला बिनशर्त पािठबा देण्याचे जाहीर केले तेव्हा ‘आप’पुढे जणू विवेकाचा पेच निर्माण झाल्याचे दिसते. एका बाजूला निवडणुकीपूर्वी व त्यानंतरदेखील घेतलेली भूमिका आणि दुसऱ्या बाजूला सरकार स्थापन करून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी शिरावर घ्यावी, यासाठी वाढणारा दबाव व अपेक्षा अशा कात्रीत हा पक्ष सापडल्याचे चित्र दिसते. अशी समर्पक उदाहरणे देऊन नतिक पेचाचा उलगडा करता येईल.
अर्थात हा पेच व्यक्तिगत, संस्था, संघटनात्मक वा सार्वजनिक जीवनातील अशा कोणत्याही स्वरूपाचा असू शकतो. प्रश्नाला अनुरूप उदाहरण देऊन उत्तर विकसित करावे.
थोडक्यात, मूलभूत नतिक संकल्पनांचे अचूक, नेमके आकलन आणि त्या बळावर सोदाहरण स्पष्टीकरण देण्याची क्षमता या बाबी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यासाठी चिंतन विचाराबरोबर लिखाणाचा नियमित सराव अत्यंत गरजेचा ठरतो.           
admin@theuniqueacademy.com

justice shekhar yadav controversial statement
अन्वयार्थ : ‘सांविधानिक भावना दुखावण्या’पल्याड…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
constitution of india credit loksatta
चतु:सूत्र : संविधाननिर्मितीचे श्रेय कोणाला?
News About Loksabha
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे?
issue of Kashmir
संविधानभान : संविधानसभेत काश्मीरचा मुद्दा
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य
Story img Loader